Monday, June 19, 2023

 निरोगी, सक्षम आयुष्यासाठी तायक्वॉदो खेळ महत्वाचा

-         जिल्हा क्रीडा अधिकारी मारावार

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- सक्षम व निरोगी आयुष्यासाठी ऑलम्पीक मान्यता प्राप्त तायक्वांदो खेळाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी व्यक्त केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा तायक्वॉदो संघटनेच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुलक्रीडा वसतीगृह इमारतस्टेडीयम परिसरात आयोजित मोफत तायक्वॉदो प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय स्वीमर तथा माजी जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव किशोर पाठकजिल्हा सचिव मास्टर बालाजी पाटीलजोगदंडएन.आय.एस प्रशिक्षक ओमप्रकाश आळणेमारोती चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मारावार यांनी खेळांडुना मिळणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. मानवी जीवन जगत असताना शारिरीक तंदुरुस्ती महत्वाची असल्याचे गंगालाल यादव यांनी सांगितले. सर्वागाने सक्षमस्वावलंबनशिक्षणशिष्टाचार शिकविणाऱ्या तायक्वॉदो खेळाचा नांदेडकरांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा सचिव किशोर पाठक यांनी केले.

 

तायक्वॉदो क्षेत्रात शालेय राज्यस्तर स्पर्धेत नांदेडला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या कृष्णा तिरमतदार व बैंगलोर येथे आयोजित इंडीया कोरीया एक्सपोमध्ये सुवर्ण ट्रिपल धमाका करणाऱ्या युवराज अभिजीत (मुन्ना) कदमचा सन्मान करण्यात आला. मुखेड येथील हर्षराज मारोती चव्हाण हा खेळाडू प्रशिक्षणाचे धडे घेण्यासाठी आला असता त्याला क्रीडा वसतीगृहात मोफत राहण्याची सोय जिल्हा क्रीडा अधिकारी मारावार यांनी करुन दिली. याबाबत त्यांचे पालक मारोती चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.

 

या शिबिरातील विद्यार्थ्यांना तायक्वॉदो मार्शल आर्टसह उत्तम नागरीक बनण्याचे धडे देण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्षातील स्पर्धेसाठी तयार करण्यावर भर देणात येणार आहे. हे प्रशिक्षण शिबिर  पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षाणार्थीना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उत्कृष्ट 5 खेळाडू दत्तक घेणार असून त्यांचा संपूर्ण खर्च तायक्वॉदो जिल्हा संघटनेमार्फत करणार असल्याचे प्रशिक्षक बालाजी जोगदंड यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...