Friday, July 12, 2019


मराठवाड्यात 122 मि.मी. पाऊस
नांदेड, परभणी, जिल्ह्यात पावसाचे आगमन
औरंगाबाद,दि. 12 (विमाका) :- मराठवाडा विभागात सकाळपर्यंतच्या 24 तासात नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात 15.57 मि.मी., लातूर जिल्ह्यात 14.43 मि.मी. तर परभणी जिल्ह्यात 12.77 मि.मी. पावसाची नोंद झाली. इतर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. विभागात आजपर्यंतची पावसाची सरासरी 122.13 मि.मी. आहे.
विभागात आज नोंदला गेलेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी दि.1 जून पासून आजवर पडलेल्या पावसाची सरासरी आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 0.10 (144.30), फुलंब्री 0.00 (205.75), पैठण 0.40 (68.37), सिल्लोड 0.00 (212.19), सोयगाव 0.00 (182.67), वैजापूर 0.60 (142.00), गंगापूर 0.00 (120.56), कन्नड 0.50 (130.25), खुलताबाद 0.00 (102.00). जिल्ह्यात एकूण 145.34 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 1.88 (102.31), बदनापूर 0.00 (140.80), भोकरदन 0.00 (235.88), जाफ्राबाद 0.00 (152.80), परतूर 10.40 (118.10), मंठा 11.25 (132.50), अंबड 0.00 (90.14), घनसावंगी 2.86 (98.86),. जिल्ह्यात एकूण 133.92 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 14.50 (105.73), पालम 2.00 (90.33), पूर्णा 21.80 (124.20), गंगाखेड 2.75 (128.50), सोनपेठ 20.00 (138.00), सेलू 9.20 (74.00), पाथरी 12.67 (103.67), जिंतूर 20.33 (128.33), मानवत 11.67 (144.00), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 115.20 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 3.71 (127.00), कळमनुरी 2.17 (162.92), सेनगाव 5.17 (112.17), वसमत 9.86 (76.71), औंढा नागनाथ 27.75 (179.25). जिल्ह्यात एकूण 131.61 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 27.95 (116.25), मुदखेड 10.67 (126.67), अर्धापूर 11.33 (110.32), भोकर 2.25 (104.25), उमरी 9.33 (111.12), कंधार 8.50 (97.00), लोहा 3.20 (81.98), किनवट 12.29 (145.90), माहूर 7.25 (208.94), हदगाव 2.00 (119.71), हिमायत नगर 0.00 (100.33), देगलूर 34.67 (89.33), बिलोली 38.40 (135.80), धर्माबाद 12.33 (96.67), नायगाव 19.60 (115.60), मुखेड 49.29 (146.86), जिल्ह्यात एकूण 119.17 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 2.00 (101.18), पाटोदा 0.00 (128.75), आष्टी 0.00 (102.43), गेवराई 7.40 (73.60), शिरुर कासार 1.33 (70.00), वडवणी 10.50 (89.00), अंबाजोगाई 1.80 (68.40), माजलगाव 13.27 (127.93), केज 0.00 (95.71), धारुर 0.00 (95.00), परळी 3.20 (70.60), जिल्ह्यात एकूण 92.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.


लातूर जिल्हा- लातूर 0.00 (99.50), औसा 11.00 (67.14), रेणापूर 2.00 (103.75), उदगीर 28.57 (121.86), अहमदपूर 12.00 (164.33), चाकुर 14.60 (100.20), जळकोट 50.50 (175.50), निलंगा 16.75 (117.75), देवणी 8.83 (143.17), शिरुर अनंतपाळ 0.00 (103.67), जिल्ह्यात एकूण 119.69 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 11.13 (111.38), तुळजापूर 11.29 (126.71), उमरगा 10.60 (153.20), लोहारा 23.67 (124.67), कळंब 0.33 (109.00), भूम 6.40 (118.60), वाशी 1.00 (137.00), परंडा 1.60 (72.40), जिल्ह्यात एकूण 119.12 मि.मी. पाऊस झाला आहे.
******

संभाजी हंबर्डे यांचा सेवानिवृत्ती निरोप



नांदेड, दि. 12 :- येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील संभाजी हंबर्डे हे नियत वयोमानानुसार जून 2019 मध्ये 23 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा नुकताच निरोप समारंभ महाविद्यालयात संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे यांनी श्री. हंबर्डे यांच्या सेवेचा लाभ महाविद्यालयाला झाला असे स्पष्ट करुन त्यांचा स्वभाव, काम करण्याची सचोटी याबाबत माहिती दिली. तसेच महाविद्यालयातील डॉ. हारुन शेख, प्रा. सोळूंके, प्रा. नायगावकर, श्री. गच्चे, प्रा. डॉ. घोनशेटवाड यांनी हंबर्डे यांचे सहकार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. शाकेर, डॉ. मुरुमकर, हंबर्डे यांच्या पत्नी सौ. विमल हंबर्डे, मुलगा प्रा. संदीप व श्रीकृष्ण हंबर्डे, डॉ. कुलदीप पवार, डॉ. सजिवनी राठोड, श्रीमती राठोड, जाधव, ए. आर. जाधव, होळकर, सोनाळे आदी महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. घोनशेटवाड यांनी केले.
00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 15.57 मि.मी. पाऊस



नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात शुक्रवार 12 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 15.57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 249.06 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 119.15 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 12.42 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 12 जुलै 2019 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 27.95 (116.26), मुदखेड- 10.67 (126.67), अर्धापूर- 11.33 (110.32), भोकर- 2.25 (103.95), उमरी- 9.33 (111.12), कंधार- 8.50 (100.49), लोहा- 3.20 (84.17), किनवट- 12.29 (154.24), माहूर- 7.25 (199.34), हदगाव- 2.00 (122.27), हिमायतनगर- निरंक (93.35), देगलूर- 34.67 (89.32), बिलोली- 38.40 (135.80), धर्माबाद- 12.33 (96.65), नायगाव- 19.60 (115.60), मुखेड- 49.29 (146.85). आज अखेर पावसाची सरासरी 119.15 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 1906.40) मिलीमीटर आहे.
00000

Thursday, July 11, 2019

मराठवाड्यात 113 मि.मी. पावसाची नोंद सर्वाधिक औरंगाबादमध्ये तर सर्वात कमी बीडला



औरंगाबाद,दि. 11 (विमाका) :- औरंगाबाद विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात 10.53 मिलीमीटर पडल्याची नोंद झाली आहे. तर लातूर, जिल्ह्यात सर्वात कमी 0.03 मि.मी. नोंद झाली आहे. विभागात आज पर्यंतची पावसाची सरासरी 113.65 मि.मी. आहे. आजपर्यंत विभागात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 145.16 मि.मी. तर सर्वात कमी बीड जिल्ह्यात 89.37 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झली आहे.
विभागात आज नोंदला गेलेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी दि.1 जून पासून आजवर पडलेल्या पावसाची सरासरी आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 27.10 (144.20), फुलंब्री 5.00 (205.75), पैठण 13.87 (67.97), सिल्लोड 0.00 (212.19), सोयगाव 10.67 (182.67), वैजापूर 10.00 (141.40), गंगापूर 24.89 (120.56), कन्नड 0.25 (129.75), खुलताबाद 3.00 (102.00). जिल्ह्यात एकूण 145.16 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 9.38 (100.44), बदनापूर 16.80 (140.80), भोकरदन 0.75 (235.88), जाफ्राबाद 0.00 (152.80), परतूर 11.50 (107.70), मंठा 6.25 (121.25), अंबड 15.57 (90.14), घनसावंगी 11.71 (96.00),. जिल्ह्यात एकूण 130.63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 4.38 (91.23), पालम 2.33 (88.33), पूर्णा 2.20 (102.40), गंगाखेड 1.25 (125.75), सोनपेठ 0.50 (118.00), सेलू 1.60 (64.80), पाथरी 6.00 (91.00), जिंतूर 0.00 (108.00), मानवत 9.00 (132.33), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 102.43 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 0.43 (123.29), कळमनुरी 0.17 (160.75), सेनगाव 0.67 (107.00), वसमत 2.57 (66.86), औंढा नागनाथ 0.00 (151.50). जिल्ह्यात एकूण 121.88 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 6.63 (88.30), मुदखेड 0.00 (116.00), अर्धापूर 3.67 (98.99), भोकर 1.00 (102.00), उमरी 1.67 (101.79), कंधार 0.00 (88.50), लोहा 0.68 (78.78), किनवट 4.00 (133.62), माहूर 0.00 (201.69), हदगाव 0.43 (117.71), हिमायत नगर 0.00 (100.33), देगलूर 0.00 (54.66), बिलोली 0.00 (97.40), धर्माबाद 0.00 (84.33), नायगाव 1.60 (96.00), मुखेड 0.00 (97.57), जिल्ह्यात एकूण 103.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 7.00 (99.18), पाटोदा 16.00 (128.75), आष्टी 5.43 (102.43), गेवराई 4.70 (66.20), शिरुर कासार 1.33 (68.67), वडवणी 3.50 (78.50), अंबाजोगाई 1.40 (66.60), माजलगाव 5.33 (114.67), केज 2.57 (95.71), धारुर 4.33 (95.00), परळी 2.60 (67.40), जिल्ह्यात एकूण 89.37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 0.00 (99.50), औसा 0.00 (56.14), रेणापूर 0.00 (101.75), उदगीर 0.00 (93.29), अहमदपूर 0.33 (152.33), चाकुर 0.00 (85.60), जळकोट 0.00 (125.00), निलंगा 0.00 (101.00), देवणी 0.00 (134.33), शिरुर अनंतपाळ 0.00 (103.67), जिल्ह्यात एकूण 105.26 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 0.25 (100.25), तुळजापूर 1.14 (115.43), उमरगा 0.00 (142.60), लोहारा 2.00 (101.00), कळंब 0.33 (108.67), भूम 8.40 (112.20), वाशी 5.67 (136.00), परंडा 1.00 (70.80), जिल्ह्यात एकूण 110.87 मि.मी. पाऊस झाला आहे.
******

आदर्श ग्राम स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 20 जुलै



नांदेड दि. 11 :- नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियानांतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीना आदर्श ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आदर्श ग्रामनिर्मितीसाठी महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन मिशनची स्थापना करण्यात आली होती. यातून राज्यात एक हजार गावे आदर्श करता यावी यासाठी या अभियानाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली होती. ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देऊन आदर्श ग्रामनिश्चितीचे ध्येय गाठण्यासाठी आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
      या अभियानात समाविष्ठ असणाऱ्या ग्राम पंचायतींनी 20 जुलै 2019 पर्यंत ग्रामप्रस्ताव तालुका गट विकास अधिकारी यांना सादर करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या ग्रामपंचायतींनी परीशिष्ठ अ मध्ये नमूद निकषाप्रमाणे स्व: मुल्याकन करून सदर प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयास सादर करायचे आहेत. प्राप्त प्रस्तावापैकी सर्वात जास्त गुण मिळालेल्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींचे मुल्यांकन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हा मुल्यांकन समिती मार्फत होईल. सर्वाधिक गुण मिळालेल्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर पाठविण्यात येईल. राज्यस्तरावर ग्रामपंचायतींचे अंतिम तपासणी व गुणांक  करून राज्यस्तरीय समारंभात रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. आदर्श ग्राम स्पर्धेत ग्राम सामजिक परिवर्तन अभियानात शासकीय योजनाचा कृतीसंगम करणारे अधिकारी कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद यांनी दिली आहे.  
000000

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांचा दौरा



नांदेड दि. 11 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 13 जुलै 2019 रोजी सिंदेवाही जि. चंद्रपूर येथून वाहनाने रात्री 11 वा. नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
रविवार 14 जुलै 2019 रोजी सकाळी 9 वा. नांदेड येथे आयोजित स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. राखीव. दुपारी 1.30 वा. नांदेड येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
000000

Wednesday, July 10, 2019

पिक विमा 24 जुलै पूर्वी भरावा



नांदेड दि. 10 :- खरीप हंगाम 2019 साठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख बुधवार 24 जुलै 2019 असुन शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता त्यापुर्वी विमाहप्ता आपल्या जवळच्या बँकेत / जनसुविधा केंद्रात भरावा. अर्ज सादर करताना चालु 7/12, 8-अ उतारा, बँक पासबुक व आधार कार्ड छायांकित प्रत व विमा अर्ज विमा हप्ता रक्कमेसह दयावा. जनसुविधा केंद्राद्वारे (सी.एस.सी सेंटर) विम्याचा प्रस्ताव दाखल करताना विमा हप्ता व्यतिरीक्त कोणतेही शुल्क देऊ नये.  शेतकऱ्यांसाठी ही सेवा नि:शुल्क आहे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...