Thursday, July 11, 2019

आदर्श ग्राम स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 20 जुलै



नांदेड दि. 11 :- नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियानांतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीना आदर्श ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आदर्श ग्रामनिर्मितीसाठी महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन मिशनची स्थापना करण्यात आली होती. यातून राज्यात एक हजार गावे आदर्श करता यावी यासाठी या अभियानाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली होती. ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देऊन आदर्श ग्रामनिश्चितीचे ध्येय गाठण्यासाठी आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
      या अभियानात समाविष्ठ असणाऱ्या ग्राम पंचायतींनी 20 जुलै 2019 पर्यंत ग्रामप्रस्ताव तालुका गट विकास अधिकारी यांना सादर करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या ग्रामपंचायतींनी परीशिष्ठ अ मध्ये नमूद निकषाप्रमाणे स्व: मुल्याकन करून सदर प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयास सादर करायचे आहेत. प्राप्त प्रस्तावापैकी सर्वात जास्त गुण मिळालेल्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींचे मुल्यांकन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हा मुल्यांकन समिती मार्फत होईल. सर्वाधिक गुण मिळालेल्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर पाठविण्यात येईल. राज्यस्तरावर ग्रामपंचायतींचे अंतिम तपासणी व गुणांक  करून राज्यस्तरीय समारंभात रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. आदर्श ग्राम स्पर्धेत ग्राम सामजिक परिवर्तन अभियानात शासकीय योजनाचा कृतीसंगम करणारे अधिकारी कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद यांनी दिली आहे.  
000000

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...