Saturday, February 4, 2017

पोलीस कॉलनीत आरोग्य शिबीर संपन्न
नांदेड, दि. 4 :-  राष्ट्रीय असंसार्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत  जिल्हा रुग्णालय, नांदेड यांच्यावतीने 4 ते 20 फेब्रुवारी 2017 या कालावधीत कर्करोग दिन व जनजागृती साप्ताह निमित्त आज  पोलीस कॉलनी स्नेहनगर नांदेड येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाईक  यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात 228 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 160 रुग्णांची मधुमेह व उच्च रक्तदाबासाठी तसेच 53 रुग्णांची दंत तपासणी झाली. 52 रुग्णांची भौतिकोपचार व 19 रुग्णांची ई. सी.जी. काढण्यात आली. या शिबीरास पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, बालरोग तज्ज्ञ डॉ. मिर्झापुरे डी.एल. हे उपस्थित होते.

000000
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2016 
प्रवेशिका पाठविण्यासाठी 9 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
नांदेड , दि. 4 :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार,सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रवेशिका पाठविण्यासाठी 9 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2016 ते 31डिसेंबर, 2016 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक,मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in या संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत.  
राज्यस्तरीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे – बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी),मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू), यशवंतराव चव्हाण पुरस्कार - शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
विभागीय पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे – अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग) (लातूरसह), आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग), नानासाहेब परूळेकर पुरस्कार (पुणे विभाग), शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग), ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग), ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) (सर्व पुरस्कार प्रत्येकी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) तर दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) (51 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000
हरभरा पिक संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड , दि. 4 :- जिल्ह्यात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी हरभरा पिकाच्या किडीपासून संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे संदेश देण्यात आला आहे.
हरभरा पिकावरील घाटेअळीसाठी क्लोरोपायरीफॉस 20 ई.सी. 2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. मर रोगासाठी कार्बन्डेन्जीम 2 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000

Friday, February 3, 2017

 औरंगाबाद शिक्षक मतदार संघासाठी
नांदेड जिल्ह्यात 88.23 टक्के मतदान
नांदेड दि. 3 :- विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. जिल्ह्यात 29 मतदान केंद्रांवर शिक्षक मतदारांनी उत्साहात मतदान केले. जिल्ह्यात 88.23 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे.
या मतदानासाठी नांदेड जिल्ह्यात 29 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली होती. नांदेड शहरात जिल्हा परिषदेच्या मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये तीन मतदान केंद्रे होती. या ठिकाणी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी भेट देवून मतदान प्रक्रियेची पाहणी केली व सुव्यवस्थेबाबत सूचना केल्या.
निवडणुकीसाठी सुरळीत व सुव्यवस्थेत मतदान व्हावे यासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली होती. संबंधीत 29 मतदान केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मतदानासाठी सकाळपासूनच शिक्षक मतदारांनी उत्साह दर्शविला. यामुळे सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदान केंद्रांवर काही प्रमाणात रांगा लागल्याचेही चित्र होते. जिल्ह्यातील या 29 मतदान केंद्रांवर 88.23 टक्के मतदान झाले. मतदानासाठी एकूण पात्र शिक्षक मतदारांची 9 हजार 45 इतकी होती. त्यापैकी सुमारे 7 हजार 980 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. या मतदानात पसंती क्रमाने मतदान नोंदविण्यात आले. जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
          
  मतदान प्रक्रीयेवर नजर ठेवण्‍यासाठी प्रत्‍येक केंद्रावर सूक्ष्‍म निरीक्षकांची नियुक्‍ती करण्‍यात आली होती. तसेच या संपुर्ण मतदान प्रक्रियेचे छायाचित्रीकरणही करण्यात आले आहे. जिल्ह्यात मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे  ( कंसात मतदारांची एकूण संख्‍या) :-   नांदेड शहर - मल्‍टीपरपज हायस्‍कूल खोली क्र. 1 (751)- 620 - 82.56 टक्के आणि मल्‍टीपरपज हायस्‍कूल खोली क्र. 2 (599)- 503 – 83.97 टक्के. नांदेड ग्रामीण - मल्‍टीपर्पज हायस्‍कूल खोली क्र. 3 (653) – 475- 72.94 टक्के. अर्धापूर- जि.प. मुलींची केंद्रीय प्राथमिक शाळा, अर्धापूर (240)- 226- 94.17 टक्के. मुदखेड - तहसील कार्यालय, मुदखेड (254)- 245- 96.46 टक्के. हदगाव - जि.प. माध्‍यमिक शाळा, हदगाव ( 261) - 239 – 91.57 टक्के. हिमायतनगर - जि.प. मुलांची माध्‍यमिक शाळा, हिमायतनगर (73)- 70- 95.89 टक्के. निवघा - जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, निवघा (97)- 95- 97.94 टक्के. मनाठा - जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, मनाठा (147)- 134- 91.16 टक्के. किनवट - जि.प. मुलांची माध्‍यमिक शाळा, किनवट (415)- 358- 86.27 टक्के. मांडवी - जि.प. माध्‍यमिक शाळा, मांडवी (182)-152-83.52 टक्के. माहूर - जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, माहूर (276)- 252 – 91.30 टक्के. इस्‍लापूर - जि.प. माध्‍यमिक शाळा, इस्‍लापूर (151)- 136- 90.07 टक्के. भोकर - तहसील कार्यालय, भोकर (363)- 367 – 92.84 टक्के. उमरी - तहसील कार्यालय, उमरी (244)- 230 – 94.26 टक्के. देगलूर - तहसील कार्यालय, देगलूर (433)- 393 – 90.76 टक्के. मरखेल - जि.प. माध्‍यमिक शाळा, मरखेल (249)- 225- 90.36 टक्के. बिलोली - तहसील कार्यालय, बिलोली (258)- 229- 88.76 टक्के. सगरोळी - जि.प.प्रा.शा. ज्‍युनिअर बेसिक स्‍कूल, सगरोळी (152)- 140 – 92.11 टक्के. धर्माबाद - तहसील कार्यालय,  धर्माबाद (212)– 200- 94.34 टक्के. नायगाव बा. - जि.प. मुलींची माध्‍यमिक शाळा, नायगाव बाजार (552)- 506 – 91.67 टक्के. कंधार - जि.प. हायस्‍कूल कंधार (519)-453- 87.28 टक्के. कुरुळा - जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, कुरुळा (110)- 98- 89.09 टक्के. पेठवडज - जि.प. प्रा.शा. पेठवडज (216)- 177- 81.94 टक्के. उस्‍माननगर - ग्राम पंचायत कार्यालय, उस्‍माननगर (244)- 218 – 89.34 टक्के. लोहा - तहसिल कार्यालय, लोहा (367)- 332- 90.46 टक्के. माळाकोळी - जि.प. माध्‍यमिक शाळा, माळाकोळी (101)- 93- 92.08 टक्के. मुखेड - जि.प. मुलींची माध्‍यमिक शाळा, मुखेड (564)- 520 – 92.20 टक्के. बा-हाळी - जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, बा-हाळी (362)-324- 89.50 टक्के.
            या निवडणुकीची मतमोजणी सोमवार 6 फेब्रुवारी 2017 रोजी औरंगाबाद येथे होणार आहे.


000000
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी
मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना सुट्टी
नांदेड दि. 3 :-   जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. यासाठी जेथे मतदान केंद्र आहेत अशा शाळांना बुधवार 15 व गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी सुट्टी राहणार आहे. तर या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी त्या मर्यादीत क्षेत्रात गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी स्थानीक सुट्टी राहणार आहे. जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत आयोगाच्या आदेशान्वये ज्या शाळांमध्ये मतदान केंद्र स्थापीत करण्यात येणार आहे अशा सर्व शाळांना बुधवार 15 व गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी सुट्टी राहील. तसेच जिल्ह्यातील ज्या गट व गणामध्ये जिल्हा परिषद , पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होणार आहे त्याठिकाणच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यासाठी त्या मर्यादीत क्षेत्रापुरती गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी स्थानीक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने अधिसूचित करण्यात आले आहे.

0000000
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात
र‍विवारी रंजन कोळंबे यांचे व्याख्यान
नांदेड दि. 3 :-  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार 5 फेब्रुवारी 2017 रोजी एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्यात आले आहे.
सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेमध्ये होणा-या या शिबिरामध्ये पुणे येथील अर्थशास्त्र या विषयाचे ख्यातनाम वक्ते रंजन कोळंबे हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील अर्थशास्त्र व स्पर्धा परिक्षातंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचे हस्ते होणार आहे. मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी या महत्वपूर्ण अशा शिबिरामध्ये नोटबुकसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, मनपा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेले आहे.

00000000

Thursday, February 2, 2017

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 640 उमेदवारांचे ,
पंचायत समितीसाठी 892 उमेदवारांचे अर्ज वैध
नांदेड दि. 2 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात दाखल करण्यात नामनिर्देशनपत्रांची आज छाननी करण्यात आली. छाननीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 640 उमेदवारांचे तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 892 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. उमेदवारीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची आज तालुकानिहाय त्या-त्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आल्याची माहिती ‍ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 63 गटासाठी 897 व पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 1 हजार 128 नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती.   छाननी नंतर वैध ठरलेल्या जिल्हा परिषद गटासाठीच्या उमेदवारांची संख्या तालुहानिहाय पुढील प्रमाणे ( कंसात उमेदवारी अवैध ठरलेल्यांची संख्या ) .
माहूर- 24 (1),  किनवट- अप्राप्त  , हिमायतनगर – 38 (1) . हदगाव- 103 (3) अर्धापूर- 23 (2) नांदेड- 69 (1), मुदखेड- 13 (निरंक), भोकर- 45 (3), उमरी- 13 (निरंक), धर्माबाद- 31 (निरंक) , बिलोली- 62 (निरंक), नायगाव- 30 (3), लोहा- 46 (4), कंधार- 45 (निरंक), मुखेड- 45 (3), देगलूर-53 (निरंक). अशारितीने जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी किनवट वगळता 640 जणांची उमेदवारी वैध ठरली, तर 21 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले.
छाननी नंतर वैध ठरलेल्या पंचायत समिती गण निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची संख्या तालुहानिहाय पुढील प्रमाणे (कंसात उमेदवारी अवैध ठरलेल्यांची संख्या ) .
माहूर- 42 (1),  किनवट- अप्राप्त , हिमायतनगर – 36 (निरंक) . हदगाव- 104 (निरंक) अर्धापूर- 32 (1), नांदेड- 74 (1), मुदखेड- 28 (निरंक), भोकर- 61 (1), उमरी- 35 (2), धर्माबाद- 34 (1) , बिलोली- 60 (1), नायगाव- 75 (निरंक), लोहा- 79 (2), कंधार- 81 (निरंक), मुखेड- 81 (निरंक), देगलूर- 70 (1) . अशारितीने पंचायत समिती गणांसाठी दाखल  किनवट वगळता 892 जणांची उमेदवारी वैध ठरली , तर 11 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले.
दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरु झाली. त्यानंतर वैध व अवैध नामनिर्देशनपत्रांची यादी  प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशनपत्राचा स्विकार किंवा नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे रविवार 5 फेब्रुवारी 2017 पर्यंत अपिल करता येणार आहे. या अपिलांवर जिल्हा न्यायाधीशांकडून सुनावणी व निकाल देण्याचा संभाव्य शेवटची मुदत बुधवार 8 फेब्रुवारी 2017 राहणार आहे. जिल्हा न्यायाधीशांनी अपील निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी बुधवार 8 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत जिथे अपील नाही तेथे मंगळवार 7 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.00वाजेपर्यंत असेल. तर ही मुदत जेथे अपील आहे, तेथे शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत राहणार आहे. यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप जेथे अपील नाही, तेथे मंगळवार 7 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.30 नंतर होणार आहे. यादी व चिन्ह वाटप जेथे अपील आहे, तेथे शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.30 वाजेनंतर होणार आहे. मतदान केंद्राची यादीही शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरु होणार आहे.

0000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...