Friday, February 3, 2017

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी
मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना सुट्टी
नांदेड दि. 3 :-   जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. यासाठी जेथे मतदान केंद्र आहेत अशा शाळांना बुधवार 15 व गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी सुट्टी राहणार आहे. तर या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी त्या मर्यादीत क्षेत्रात गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी स्थानीक सुट्टी राहणार आहे. जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत आयोगाच्या आदेशान्वये ज्या शाळांमध्ये मतदान केंद्र स्थापीत करण्यात येणार आहे अशा सर्व शाळांना बुधवार 15 व गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी सुट्टी राहील. तसेच जिल्ह्यातील ज्या गट व गणामध्ये जिल्हा परिषद , पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होणार आहे त्याठिकाणच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यासाठी त्या मर्यादीत क्षेत्रापुरती गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी स्थानीक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने अधिसूचित करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...