औरंगाबाद शिक्षक मतदार संघासाठी
नांदेड जिल्ह्यात 88.23 टक्के
मतदान
नांदेड
दि. 3 :- विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शांततेत व
सुरळीत मतदान पार पडले. जिल्ह्यात 29 मतदान केंद्रांवर शिक्षक मतदारांनी उत्साहात
मतदान केले. जिल्ह्यात 88.23 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक
कार्यालयाने दिली आहे.
या मतदानासाठी नांदेड
जिल्ह्यात 29 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली होती. नांदेड शहरात जिल्हा
परिषदेच्या मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये तीन मतदान केंद्रे होती. या ठिकाणी सहायक
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी भेट देवून मतदान
प्रक्रियेची पाहणी केली व सुव्यवस्थेबाबत सूचना केल्या.
निवडणुकीसाठी सुरळीत व
सुव्यवस्थेत मतदान व्हावे यासाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी केली होती.
संबंधीत 29 मतदान केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मतदानासाठी
सकाळपासूनच शिक्षक मतदारांनी उत्साह दर्शविला. यामुळे सकाळच्या पहिल्या टप्प्यात
मतदान केंद्रांवर काही प्रमाणात रांगा लागल्याचेही चित्र होते. जिल्ह्यातील या 29
मतदान केंद्रांवर 88.23 टक्के मतदान झाले. मतदानासाठी एकूण पात्र शिक्षक मतदारांची
9 हजार 45 इतकी होती. त्यापैकी सुमारे 7 हजार 980 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क
बजाविला. या मतदानात पसंती क्रमाने मतदान नोंदविण्यात आले. जिल्ह्यातील मतदान
प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली
आहे.
मतदान
प्रक्रीयेवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक
ांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच या संपुर्ण मतदान
प्रक्रियेचे छायाचित्रीकरणही करण्यात आले आहे. जिल्ह्यात मतदान
केंद्रनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे ( कंसात
मतदारांची एकूण संख्या) :- नांदेड शहर - मल्टीपरपज हायस्कूल खोली क्र. 1 (751)- 620 - 82.56 टक्के आणि मल्टीपरपज हायस्कूल
खोली क्र. 2 (599)- 503 – 83.97 टक्के.
नांदेड ग्रामीण - मल्टीपर्पज हायस्कूल खोली क्र. 3 (653) – 475- 72.94 टक्के. अर्धापूर- जि.प. मुलींची केंद्रीय प्राथमिक शाळा,
अर्धापूर (240)- 226- 94.17 टक्के. मुदखेड - तहसील
कार्यालय, मुदखेड (254)- 245- 96.46
टक्के. हदगाव - जि.प. माध्यमिक शाळा, हदगाव ( 261) - 239 – 91.57 टक्के. हिमायतनगर - जि.प. मुलांची माध्यमिक शाळा,
हिमायतनगर (73)- 70- 95.89 टक्के. निवघा - जि.प.
केंद्रीय प्राथमिक शाळा, निवघा (97)- 95- 97.94 टक्के. मनाठा
- जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, मनाठा (147)- 134- 91.16
टक्के. किनवट - जि.प. मुलांची माध्यमिक शाळा, किनवट (415)- 358- 86.27 टक्के. मांडवी - जि.प. माध्यमिक शाळा, मांडवी (182)-152-83.52 टक्के. माहूर - जि.प.
केंद्रीय प्राथमिक शाळा, माहूर (276)-
252 – 91.30 टक्के. इस्लापूर - जि.प. माध्यमिक शाळा, इस्लापूर
(151)- 136- 90.07 टक्के. भोकर - तहसील कार्यालय, भोकर (363)- 367 – 92.84 टक्के. उमरी - तहसील
कार्यालय, उमरी (244)- 230 – 94.26
टक्के. देगलूर - तहसील कार्यालय, देगलूर (433)- 393 – 90.76 टक्के. मरखेल - जि.प. माध्यमिक शाळा, मरखेल (249)- 225- 90.36 टक्के. बिलोली - तहसील
कार्यालय, बिलोली (258)- 229- 88.76
टक्के. सगरोळी - जि.प.प्रा.शा. ज्युनिअर बेसिक स्कूल, सगरोळी
(152)- 140 – 92.11 टक्के. धर्माबाद - तहसील कार्यालय, धर्माबाद (212)– 200- 94.34 टक्के. नायगाव बा. - जि.प. मुलींची माध्यमिक शाळा, नायगाव बाजार (552)- 506 – 91.67 टक्के. कंधार - जि.प.
हायस्कूल कंधार (519)-453- 87.28 टक्के. कुरुळा - जि.प.
केंद्रीय प्राथमिक शाळा, कुरुळा (110)-
98- 89.09 टक्के. पेठवडज - जि.प. प्रा.शा. पेठवडज (216)-
177- 81.94 टक्के. उस्माननगर - ग्राम पंचायत कार्यालय, उस्माननगर
(244)- 218 – 89.34 टक्के. लोहा - तहसिल कार्यालय, लोहा (367)- 332- 90.46 टक्के. माळाकोळी - जि.प.
माध्यमिक शाळा, माळाकोळी (101)- 93-
92.08 टक्के. मुखेड - जि.प. मुलींची माध्यमिक शाळा, मुखेड (564)- 520 – 92.20 टक्के. बा-हाळी - जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, बा-हाळी (362)-324- 89.50 टक्के.
या निवडणुकीची मतमोजणी सोमवार 6 फेब्रुवारी 2017 रोजी
औरंगाबाद येथे होणार आहे.
000000
No comments:
Post a Comment