Saturday, February 4, 2017

पोलीस कॉलनीत आरोग्य शिबीर संपन्न
नांदेड, दि. 4 :-  राष्ट्रीय असंसार्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत  जिल्हा रुग्णालय, नांदेड यांच्यावतीने 4 ते 20 फेब्रुवारी 2017 या कालावधीत कर्करोग दिन व जनजागृती साप्ताह निमित्त आज  पोलीस कॉलनी स्नेहनगर नांदेड येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाईक  यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिरात 228 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 160 रुग्णांची मधुमेह व उच्च रक्तदाबसाठी तसेच 53 रुग्णांची दंत तपासणी झाली. 52 रुग्णांची भौतिकोपचार व 19 रुग्णांची ई. सी.जी. काढण्यात आली. या शिबीरास पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, बालरोग तज्ज्ञ डॉ. मिर्झापुरे डी.एल. हे उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...