Tuesday, May 6, 2025

 वृत्त क्रमांक 475

वाजेगाव महसूल मंडळात महाराजस्व  समाधान शिबीर संपन्न

महसूल विभागातील विविध योजनांचा जनतेने लाभ घ्यावा : डॉ.सचिन खल्लाळ

                                                                                                                                                                         नांदेड दि. 6 मे :- महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्याप अनुषंगाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  समाधान शिबीर अभियान”राबविण्यात येत आहे.  गाव पातळीवर लोकांची कामे व्हावीत यादृष्टीने या शिबीराचे आयोजन करण्यात करण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबीराचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. 

वाजेगांव मंडळा अंतर्गत वाजेगाव येथील राष्ट्रमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नुकतेच तहसिल कार्यालय नांदेड यांच्यावतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमास तहसिलदार संजय वारकड, कृषी पर्यवेक्षक चुंचूवार, शाळेचे मुख्याध्यापक क्षिरसागर, सरपंच जमील शेठ, रविकांत तारू, नायब तहसिलदार स्वप्नील दिगलवार आदी उपस्थित होते. 

                                                                                                                                                                        क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या  तक्रारी लवकर निकाली काढणे हे या शिबीरांच्या माध्यमातुन सुलभ होणार आहे असे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले. 

यांनी सामाजिक न्यायविभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्या वा तसेच राशनकार्ड, पुरवठा विषयक, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान आदीचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करावी असे आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी वाजेगावचे मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, ग्राम महसूल अधिकारी रेखा मंडगीलवार, एम.के.पाटील, दिलीप पवार, कृषी सहायक सुरेखा शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महसूल विभागाचे माधव मोरे, प्रतिभा मारतळेकर, दिपाली पवार, संतोष वाघमारे आदींनी विविध योजनांची माहिती देवून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला.  कार्यक्रमास वाजेगाव महसूल मंडळातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

000000






 वृत्त क्रमांक 474

​ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कंधार व मुखेड येथे वसतीगृह सुरु
                                                                                                                                                                            ऑफलाईन अर्ज प्राप्त करुन घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 6 मे :- सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी ते पदवी, पदवीव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वसतिगृह प्रवेश ऑफलाईन अर्ज वाटप करण्यास सुरवात झाली आहे.  इच्छुक विद्यार्थी व पालकांनी संबंधित गृहपालांशी संपर्क साधून ऑफलाईन अर्ज प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय 10 जानेवारी 2024 अन्वये ऊसतोड कामगारांच्या मुलां-मुलींसाठी नांदेड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील 62 संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतीगृह सुरु करणेबाबत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील कंधार व मुखेड या दोन तालुक्यातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवी ते पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 100 मुलांच्या क्षमतेची वसतीगृह सुरु करण्यात आली आहेत.

विद्यार्थी व पालकांनी अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, कंधार साठी व्ही.एम. चपलवार यांचा मो. क्रमांक 7744946836 व संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, मुखेड या वसतीगृहासाठी पी.एन पल्लेवाड यांचा मो. क्र. 8390474908 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

वृत्त क्रमांक 473

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

                                                                                                                                                                            नांदेड दि. 6 मे :- नांदेड जिल्ह्यात 16 मे 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 16 मे 2025 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्रमांक 472

नांदेड शहरात लोडशेडींगच्या अनुषंगाने

 विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील दिव्यांगांशी संवाद

दिव्यांग बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, दि.02 (विमाका) : मराठवाडा विभागातील गरजू दिव्यांग यांच्या आज पर्यंत प्रलबिंत असलेल्या मागण्या सोडविण्यासाठी शासन निर्णयाच्या  अधिन राहून व दिव्यांग व्यक्ती  अधिकार अधिनियम 2016 बाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे विभागातील दिव्यांगाशी 7 मे 2025 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ऑनलाईन वेबिनारद्वारे थेट संवाद साधणार आहे. तरी विभागातील दिव्यांगांनी संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

दिव्यांग व्यक्तीच्या प्रलंबित मागण्याचे निराकरण करण्याबाबत

Wednesday May 7, 16:00 - 18:00


https://us06web.zoom.us/j/81648347485?pwd=WjeVo2SFzOdWv8jkZLjyyNvAWBYDn0.1

Meeting ID: 816 4834 7485

Passcode: 173110




वृत्त क्रमांक 471

भू-प्रमाण केंद्रात मिळणार एकत्रित विविध सेवांचा लाभ 

आता ई-मोजणी अर्ज ऑनलाईन करता येणार 

                                                                                                                                                                    नांदेड दि. 6 मे :- उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड या कार्यालयात भू-प्रमाण केंद्र 11 एप्रिल 2025 पासून सुरु करण्यात आले आहे. या भू-प्रमाण केंद्रात एका छताखाली नागरिकांना अनेक सेवांचा लाभ मिळणार असून, या विविध प्रकारच्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप अधीक्षक भूमि अभिलेख बळवंत मस्के यांनी केले आहे.                                                                                                                                                                             उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड या कार्यालयात भू-प्रमाण केंद्राअंतर्गत नागरिकांना ई-मोजणी अर्ज ऑनलाईन करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच ईप्सीत अंतर्गत फेरफार अर्ज सुध्दा करण्यासाठी सुविधा आहे.                                                                                                                                                                             तसेच सर्व प्रकारच्या नकला या केंद्रामार्फत उपलब्ध होणार आहेत. यामध्ये फेरफार नोंदवहीचा उतारा, परिशिष्ट-अ, परिशिष्ट-ब, नमुना 9 ची नोटीस, नमुना 12 ची नोटीस,अर्जाची पोच, रिजेक्शन पत्र, त्रुटी पत्र, निकाली पत्र, विवादग्रस्त नोंदवहीचा उतारा, डिजीटल मिळकत पत्रिका, सॉफ्ट कॉपी, अपील निर्णयाची प्रत, मुद्रण, छापील स्वरुपात अशा सर्व प्रकारच्या नकला ऑनलाईन पध्दतीने भू-प्रमाण केंद्रात उपलब्ध करुन मिळतील अशी माहिती उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 

0000





Monday, May 5, 2025

वृत्त क्रमांक 470

प्रेस नोट_हवामान खात्याचा इशारा
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 5 मे रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 7 व 8 मे 2025 हे दोन दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 7 व 8 मे हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. यासाठी सोबतची प्रेस नोट उद्याच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या गोष्टी करा :
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका:
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.
उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
(किशोर कुऱ्हे) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.



 

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...