Sunday, June 25, 2023

 येणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य माणसाचा !

त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत राहणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

·  शासन आपल्या दारी कार्यक्रमात विविध विभागाच्या योजनांमधून

  2 हजार 213 कोटी रुपयांचे लाभ  

·  मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शहिदांना अभिवादन करून

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद  

·  लाभधारकांच्या अभूतपूर्व गर्दीने अबचलनगर फुलले

·   40 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी घेतली अनुभूती

  

नांदेड (जिमाका) दि. 25 :- शासनाने केवळ 11 महिन्यात घेतलेले निर्णय हे मागील अडीच वर्षाचा विकासाचा अनुशेष भरून काढणारे असून “सरकारी काम सहा महिने थांब” ही संकल्पना आपण सर्वांनी मोडीत काढून दाखविली आहे. सरकारी कामासाठी आता सर्वसामान्यांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, कारण शासनच आपल्या दारी आले आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येणारा प्रत्येक दिवस सर्वसामान्य जनतेचा असेल व त्यांच्या हितासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण सतत काम करत राहू या शब्दात आश्वस्त केले.  नांदेड येथील अबचलनगर येथे आयोजित “शासन आपल्या दारी” या भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार संतोष बांगर, आमदार ज्ञानराज चौगुले, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक, विविध योजनांचे लाभार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी माहूरगड येथील श्री रेणुकादेवी, श्री गुरूगोविंद सिंघजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामातील सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचा, हुतात्म्यांचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त केली. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासाची बांधिलकी आम्ही स्विकारली आहे. नांदेड जिल्ह्यातील जनतेसाठी विविध शासकीय विभागांच्या  योजनांमधून सुमारे 2 हजार 213 कोटी रुपयांचे लाभ दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.  

 

शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत उभे

शेतकरी हा आपला अन्नदाता असून त्याच्या कष्टाचा सन्मान सर्वांनी करायला हवा असे मुख्यमंत्री म्हणाले. शासनाला आता कुठे एक वर्षच पुर्ण होईल परंतू या अल्पकाळात शासनाने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. शासनाने एनडीआरएफच्या दरापेक्षा दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत केली, आतापर्यंत शासनाने जवळपास 10 हजार कोटी रुपयांची मदत आपदग्रस्त शेतकऱ्यांना केली आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची नुसतीच घोषणा झाली होती परंतू हे 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे काम या शासनाने केले आहे. सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय शासनाने केला, त्यासाठी 1 हजार 500 कोटी रुपयांची तरतूदही केली. शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. प्रधानमंत्री महोदयांनी  6 हजार रुपयांची शेतकरी सन्मान योजना सुरु केली होती आपण त्यात आणखी सहा हजार रुपयांची भर घालून शासनाने ही रक्कम 12 हजार रुपये इतकी केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

सरकार सर्वसामान्यांचे

सर्वसामान्य माणसांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हे शासन काम असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  या शासनाने सर्वसामान्य माणसाच्या हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय असो, पर्यटनाचा, ई फाईलिंगचा निर्णय असो की अन्य कोणताही, शासनाने 75 हजार युवक-युवतींना शासकीय नोकऱ्या देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. विविध कंपन्यांसमवेत चर्चा आणि समन्वय करून आपल्या तरूणांच्या हाताला रोजगार देण्याचे काम कौशल्य विकास विभाग करत असून आतापर्यंत दीड दोन लाख लोकांना रोजगार देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

 

कृषि महाविद्यालयाच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय

नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, पैनगंगा नदीवर 1 हजार 600 कोटी रुपये खर्चाचे  सात बंधारे बांधण्यास शासनाने मंजुरी दिली आहे यातून 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. विविध सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने 6 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचेही ते म्हणाले, लेंडी प्रकल्प असो की नांदेडला जोडणारे रेल्वे प्रकल्प असो, शासन नांदेडच्या विकासासाठी  पूर्ण सहकार्य करील, समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हिंगोलीमध्ये शंभर कोटीचा हळद प्रकल्प शासन सुरु करत आहे. नांदेडच्या कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव तपासून त्यावरही सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले

 

हक्काचे सरकार आणि हक्काचा माणूस..

महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली असून लेक लाडकी उपक्रम असेल, बचतगटांच्या वस्तुचे ब्रॅण्डिग आणि मार्केटिंग असेल, महिलांना एस.टीत 50 टक्के तिकिट दरात सवलत असेल, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एस.टी प्रवास असेल या सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांचा लाभ आज राज्यातील नागरिक घेत आहे, हे आपल्या हक्काचे सरकार आणि मी आपल्या हक्काचा माणूस असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

गावापर्यंत पोहचण्याचा शुद्ध हेतू म्हणजे

शासन आपल्या दारी

- पालकमंत्री गिरीश महाजन

दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या योजना पोहोचाव्यात या शुद्ध हेतूने शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम आपण राबवित आहोत. सर्वसामान्य माणसाला बऱ्याचवेळा त्यांच्या हक्काच्या, तो ज्या योजनेला पात्र आहे त्या योजनेबाबत नेमकी कुठे अर्ज करावा लागतो याची कल्पना नसते. त्या-त्या योजनांचे निकषही त्याला माहित नसतात. अशावेळी शासन ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचते याला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे. कर्तव्याची भावना आणि जबाबदारी स्विकारून शासकीय योजनेत अधिक पारदर्शकता व साक्षरता यातून निर्माण होईल, असा विश्वास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दररोज सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे दु:ख समजून घेत आहेत. त्यांच्यासाठी शासन पातळीवर अनेक योजना घेऊन ते पोहोचत असल्याचे गौरव उद्गार नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काढले.

 

शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी आम्ही सदैव तत्पर

-        कृषि मंत्री अब्दुल सत्तार

निसर्गाच्या आव्हानात शेतकरी हा नेहमी गुरफटलेला असतो. विविध आव्हानात गुरफटलेल्या शेतकऱ्यांना अनेक विकास योजनांच्या माध्यमातून आर्थीक विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकरी निसर्गाकडून आणि बाजारपेठेतील शेतमालाच्या भावात होणाऱ्या बदलातून सदैव त्रस्त असतो. जेंव्हा शेतमालाचे उत्पादन अधिक होते तेंव्हा बाजारात भाव नसतो. शेतकऱ्यांची ही आर्थिक कुचंबना थांबविण्यासाठी शासनाने गोडाऊन योजनेवर भर दिला आहे. यासाठी तब्बल 60 टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जात आहे. बाजारात जेंव्हा शेतमालाला भाव नसतील तेंव्हा हा शेतमाल गोडाऊनमध्ये साठवता येईल, असे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधतांना सांगितले. शेतीसमवेत शेतीपूरक उद्योग व्यवसायावर अधिक भर दिला आहे. महिला बचतगटांना शेळी याचबरोबर गाई व म्हशीबाबतचा निर्णय शासनाने घेतला. मागेल त्याला शेततळे, सौरऊर्जा, औजार बँक, नांगर, वकर, ट्रॅक्टर, हार्वेस्टर, ड्रोनने फवारणी यासाठी विद्यापीठ पातळीवर प्रशिक्षण, सौरऊर्जेवर कृषिपंप अशा विविध योजना घेऊन सरकार शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध असल्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.  

 

उद्योग विकासाला चालना मिळेल

-  खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावी, तत्पर सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी झटत आहेत. हे सरकार देणारे असल्याचे सांगून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात उद्योग व रस्ते विकासाचा प्रलंबित अनुशेष पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

शासन आपल्या दारी अभियानाच्या अनुभूतीने

सर्वसामान्यांचा विश्वास वाढला

- खासदार हेमंत पाटील

शासनाशी संबंधित सर्वसामान्य माणसाला अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागतो. साध्या प्रमाणपत्रापासून ते लाभाच्या योजनेपर्यंत त्याला कार्यालयात खेटे मारावे लागतात. शासन आणि लाभार्थी यांच्यामधील ही दरी कमी करण्यासाठी शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम अत्यंत मोलाचा असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले. रिक्षा चालविण्यापासून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अनुभव घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप काही अनुभवले आहे. ही अनुभवाची शिदोरी घेऊन शासकीय योजनांना त्यांनी अधिक जबाबदार व लोकाभिमूख केल्याचे त्यांनी सांगितले.

 

कृषि महाविद्यालयाची आ. कल्याणकर यांची मागणी

या कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून शासना आपल्या दारीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात शासकिय योजनांना गती मिळाल्याचे सांगितले. याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील कृषिचे क्षेत्र लक्षात घेता कृषि महाविद्यालयाची मागणी केली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे वितरणही करण्यात आले. “माझी मुलगी माझा अभिमान” अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 5 हजार घरांना मुलींचे नाव दिले. या अभियानाला अधोरेखीत करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या सुविद्य पत्नी सौ. लताताई एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी कुमारी प्रगती व्यंकट नव्हाते या लहान मुलीच्या हस्ते मुख्यमंत्री यांना देण्यात आली. याचबरोबर त्यांच्या हस्ते शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 2 हजार 123 शेतकऱ्यांना 2 कोटी 5 लक्ष एवढे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यात आले. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

00000










































मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड शहरातील 436 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

                                         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

नांदेड शहरातील 436 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

 

·         अमृत अभियानांतर्गत 329 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश

 

नांदेड, दि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत 436 कोटी 48 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांच्या बळकटीकरणाच्या कामांसह रस्ते विकास कामांचा यामध्ये समावेश आहे.

 

चैतन्य नगर येथील शिवमंदीर परिसरात झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.


 

केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नांदेड शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांचे बळकटीकरण आणि संलग्नीकरण कामासाठी 329.16 कोटी रूपये निधी मंजूर आहे. यामधून शहरात अद्याप मलनिस्सारण वाहिनी नसलेल्या भागात नवीन मलनिस्सारण वाहिनी करण्यात येणार आहे. तसेच ज्या भागातील मलनिस्सारण वाहिनी नादुरुस्त झाली आहे, तेथे जुनी वाहिनी बदलून नवीन मलनिस्सारण वाहिनी जोडली जाणार आहे. एकूण 430 किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलनिस्सारण वाहिनीची जोडणी याद्वारे केली जाणार आहे.  तसेच मलनिस्सारण केंद्रातील विविध यंत्रसामग्रीचा यामध्ये समावेश आहे.


 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नांदेड शहर रस्ते विकास प्रकल्पातील 107.32 कोटी रूपये निधी मंजूर आहे. या निधीतून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील 182 रस्त्यांची कामे होणार आहेत. या दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.


0000

 

Saturday, June 24, 2023

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

491 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

 

·  उत्तर नांदेडमध्ये एकुण 162 कोटी रुपयांचे कामाचे भुमिपूजन 

·   नांदेड शहरातील भुयारी गटार योजनेच्या 329.16 कोटी रुपयांच्या कामाचे भुमिपूजन

 

नांदेड (जिमाका), दि. 24 :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रविवार 25 जून रोजी येत आहेत. या कार्यक्रमासमवेत त्यांच्या हस्ते केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नांदेड शहरातील भुयारी गटार योजनेचे बळकटीकरण व संलग्नीकरणाचे 329.16 कोटी रुपयांच्या कामाचे  भूमिपूजन होणार आहे. याचबरोबर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत नांदेड मनपा हद्दीतील उत्तर नांदेड मधील एकूण 162 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न होत आहे.  

 

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती असणार आहे.

00000

 वृत्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम    

नांदेड (जिमाका) दि. 24 :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  

रविवार 25 जून 2023 रोजी मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने दुपारी 1.30 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने अबचलनगर मैदान नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ अबचलनगर मैदान नांदेड. दुपारी 3.15 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

Friday, June 23, 2023

 वृत्त 

शासकीय योजनांच्या साक्षरतेसाठी 25 जूनला शासन आपल्या दारी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभवाटप


पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार कार्यक्रम

 

·         नांदेड येथील कार्यक्रमास प्रत्येक तालुक्यातून येणार लाभार्थी

·         वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र आराखडा

·         योजनांच्या मेळाव्यासह आरोग्य तपासणीचे शिबीर

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवून त्यांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभ वाटप कार्यक्रम व भव्य “शासन आपल्या दारी” उपक्रमाचे आयोजन रविवार 25 जून रोजी दुपारी 1.30 वा. आयोजित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली अबचलनगर येथील भव्य मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राम पाटील रातोळीकर, विधानसभा सदस्य आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापूरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने हा भव्य उपक्रम साकारण्यात आला आहे. शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती जोपर्यंत लाभार्थ्यांना होत नाही तोपर्यंत त्या योजनांप्रती लाभार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होत नाही. शासकीय योजनांच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासमवेत ग्रामपंचायत पातळीपर्यंत योजनांचा जागर पोहचावा या उद्देशाने नांदेड येथे भव्य प्रमाणात शासन आपल्या दारी याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमास प्रत्येक तालुक्यातुन नागरिक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

 

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक यांच्या मार्फत ग्रामपंचायत व ग्रामस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून तर नांदेड येथे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांशी समन्वय साधला गेला आहे. मनपा क्षेत्रातून 15 हजार, नगरपालिका क्षेत्रातून 10 हजार व ग्रामीण भागातून 20 हजार नागरिकांसाठी नियोजन करण्यात आले आहे. शासकीय योजनाच्या या महामेळाव्यास 75 हजार नागरिक येवू शकतील यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन केले गेले आहे. ग्रामीण भागासाठी सद्यस्थितीत चारशे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड येथील वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यादृष्टिने संपूर्ण नियोजन केले असून उष्णता व पावसाची शक्यता याबाबी विचारात घेवून भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूला शासकीय योजनांचे स्टॉल्स व प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या विभागाचा जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती देईल. प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी मोठया प्रमाणात सुविधा निर्माण करुन ठेवण्यात आली आहे. आरोग्य सुरक्षिततेच्यादृष्टिने प्रथमोपचार व्यवस्थाही तत्पर ठेवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना घरापर्यंत सुरक्षित पोहोचता यावे यावर प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातील सुमारे 100 अधिकारी व त्यांच्यासमवेत कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

00000





Thursday, June 22, 2023

 नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाची युद्धपातळीवर तयारी

• सर्व विभाग प्रमुखांकडून लाभार्थ्यांचे नियोजन
नांदेड (जिमाका) दि. 22 :-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार 25 जून रोजी “शासन आपल्या दारी” हा भव्य कार्यक्रम अबचलनगर नांदेड संपन्न होत आहे. या कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर पूर्व तयारी केली जात आहे. प्रत्येक लाभार्थ्यांला या कार्यक्रमात विनासायास सहभागी होता यावे यादृष्टीने गटनिहाय नियोजन केले आहे. उष्णता व इतर बाबी लक्षात घेता मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्यासह इतर व्यवस्था काटेकोरपणे करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी सर्व गटनिहाय अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात “शासन आपल्या दारी” या अभियानाच्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय दंडाधिकारी विकास माने, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख गजानन पाटील, मराठवाडा प्रमुख बाबासाहेब थेटे व इतर विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
इतर जिल्ह्यातील कार्यक्रमांचा अनुभव पाठिशी घेवून नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे मिनिट टू मिनीट व शहरात येणाऱ्या वाहतुकीचे नियोजन पोलीस व परिवहन विभागाने केले आहे. हा कार्यक्रम अधिकाधिक लोकसहभागातून शासकीय योजनांचा महाउत्सव बनेल, असा विश्वास अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी व्यक्त केला.
00000



केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...