Sunday, June 25, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड शहरातील 436 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

                                         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

नांदेड शहरातील 436 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

 

·         अमृत अभियानांतर्गत 329 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश

 

नांदेडदि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत 436 कोटी 48 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांच्या बळकटीकरणाच्या कामांसह रस्ते विकास कामांचा यामध्ये समावेश आहे.

 

चैतन्य नगर येथील शिवमंदीर परिसरात झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीकरखासदार हेमंत पाटीलआमदार राम पाटील रातोळीकरआमदार बालाजी कल्याणकरमहानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते.


 

केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नांदेड शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांचे बळकटीकरण आणि संलग्नीकरण कामासाठी 329.16 कोटी रूपये निधी मंजूर आहे. यामधून शहरात अद्याप मलनिस्सारण वाहिनी नसलेल्या भागात नवीन मलनिस्सारण वाहिनी करण्यात येणार आहे. तसेच ज्या भागातील मलनिस्सारण वाहिनी नादुरुस्त झाली आहेतेथे जुनी वाहिनी बदलून नवीन मलनिस्सारण वाहिनी जोडली जाणार आहे. एकूण 430 किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलनिस्सारण वाहिनीची जोडणी याद्वारे केली जाणार आहे.  तसेच मलनिस्सारण केंद्रातील विविध यंत्रसामग्रीचा यामध्ये समावेश आहे.


 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत नांदेड शहर रस्ते विकास प्रकल्पातील 107.32 कोटी रूपये निधी मंजूर आहे. या निधीतून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील 182 रस्त्यांची कामे होणार आहेत. या दोन्ही विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.


0000

 

No comments:

Post a Comment