Saturday, June 24, 2023

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

491 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

 

·  उत्तर नांदेडमध्ये एकुण 162 कोटी रुपयांचे कामाचे भुमिपूजन 

·   नांदेड शहरातील भुयारी गटार योजनेच्या 329.16 कोटी रुपयांच्या कामाचे भुमिपूजन

 

नांदेड (जिमाका), दि. 24 :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रविवार 25 जून रोजी येत आहेत. या कार्यक्रमासमवेत त्यांच्या हस्ते केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत नांदेड शहरातील भुयारी गटार योजनेचे बळकटीकरण व संलग्नीकरणाचे 329.16 कोटी रुपयांच्या कामाचे  भूमिपूजन होणार आहे. याचबरोबर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत नांदेड मनपा हद्दीतील उत्तर नांदेड मधील एकूण 162 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न होत आहे.  

 

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास, पंचायतीराज, वैद्यकिय शिक्षण,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजनमाजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणखासदार प्रतापराव पाटील चिखलीकरआमदार सतीश चव्हाणआमदार विक्रम काळेआमदार राम पाटील रातोळीकरआमदार बालाजी कल्याणकरआमदार मोहनराव हंबर्डेजिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगेपोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती असणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...