Friday, September 18, 2020

संभाव्य पूरसदृश्य परिस्थितीतून सावरण्यासाठी

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात व्यापक बैठक संपन्न 


नांदेड (जिमाका) दि. 18 :- मराठवाड्यातील जायकवाडी, माजलगाव या मोठ्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जायकवाडीच्या वर असलेले मुळा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातील पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणात, जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात, माजलगाव धरणातील पाण्याचा विसर्ग सिंधफना नदीच्या पात्रात सोडल्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीकडे सरकत चालली आहे. सदर पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाली तर गोदाकाठच्या जिल्ह्यातील सुमारे 337 गावांवर याचा परिणाम होऊ शकतो. ही सर्व शक्य अशक्यता लक्षात घेता आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात जिल्हा प्रशासनातील संबंधित विभाग प्रमुखांची आणि लोकप्रतिनिधींची व्यापक बैठक घेऊन विविध उपाय योजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. 

या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आदी संबंधित विभागाचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते. 

जायकवाडी प्रकल्पातून 17 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजल्यापासून 1 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, माजलगाव धरणातून 42 हजार 900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तसेच पुर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर पाणलोट क्षेत्रातून 5 हजार 824 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे. हे सर्व पाणी गोदावरी नदीला येवून मिळत असल्यामुळे याचा सर्वाधिक संभाव्य धोका नांदेड शहराच्या सखल भागात व गोदावरी काठच्या गावात होऊ शकतो. याच बरोबर नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमाड धरणसुद्धा 100 टक्के भरले असून तेथून 1 लाख 50 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे. पोचमाड प्रकल्प 100 टक्के भरल्यामुळे गोदावरी नदीत फुगवटा निर्माण झाल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. सद्यस्थितीत विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाच दरवाजातून 95 हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टी झाली तर सध्या नांदेड शहरातील गोदावरी नदीचे पाणी धोक्याची पातळी गाठू शकते. सध्या जुन्या पुलावर 344 पाणी पातळी असून इशारा पातळी 351 मीटर आहे. धोका पातळी 354 मीटर इतकी असून सद्यस्थितीत पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपर्यंत असाच पाऊस चालू राहिला तर गाठू शकेल अशी भिती असल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन पुढील नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याचे पाटबंधारे विभागाचे सचिव एन. व्ही. शिंदे यांनी संपर्क साधून संभाव्य पूर परिस्थितीची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. 

कोविड-19 चा संसर्ग लक्षात घेता याबाबत आरोग्याच्या वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात हे लक्षात घेऊन आरोग्य विभागालाही त्यांनी पूर्व तयारी करण्याबाबत सूचित केले. विशेषत: नांदेड शहरातील गोदावरी काठावर असलेल्या गोवर्धनघाट येथे पाणी पातळी वाढल्यास इतर ठिकाणी काय सुविधा उपलब्ध करता येतील याबाबत नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागात शेतकऱ्यांच्या हातचे पीक धोक्यात आले असून याचा मोठा आर्थिक उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक भागात शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून त्याचे त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले.

000000



 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात

डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी

-         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, परीक्षेसाठी लागणारे संदर्भ, पुस्तके, मार्गदर्शक उपलब्ध व्हावेत या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्राला मंजुरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विविध विकास कामे, कोविड-19 प्रादुर्भामुळे खोळंबलेल्या परीक्षेबाबत आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज विद्यापीठात संपन्न झाली. या बैठकीस कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, प्रभारी कुलगुरु डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. वसंत भोसले, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. महेश मगर, परीक्षा व मुल्यमापन मंडळाने संचालक डॉ. रवी सरोदे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. नलिनी टेंबेकर यांची उपस्थिती होती. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या बैठकीत विचारविमर्ष करण्यात येऊन विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींना विद्यापीठामध्ये निवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शंभर मुलींचे शासकीय वसतीगृह, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या शंभर मुलांसाठी वसतीगृह, शासकीय अध्यापक महाविद्यालयास विद्यापीठात जागा उपलब्ध करुन देणे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या इमारतीस प्रशासकीय मान्यता देणे, डॉ. शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्रास मान्यता व वसतीगृह इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन देणे, श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्थेच्या नवीन विभागीय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यताबाबत याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आग्रह धरुन त्यास मान्यता घेतली. 

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या विस्तारासाठी माझे अनुभव संपन्न व ज्येष्ठ सहकारी मंत्री अशोक चव्हाण यांच्या सूचना व मार्गदर्शनाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करीत दोन महिन्यानंतर पुन्हा विद्यापीठाच्या विविध विकास कामांबाबत आढावा बैठकीसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आम्ही येऊ असे सुतोवाच केले.

00000

 

 


Thursday, September 17, 2020

 

246 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

264 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 17 :- गुरुवार 17 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 246 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 264 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 137 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 127 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 70 अहवालापैकी  751 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 12  हजार 701 एवढी झाली असून यातील 8  हजार 480 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 818 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 42 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात एकुण 8 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवार 9 सप्टेंबर रोजी माहूर तालुक्यातील करंजी येथील 62 वर्षाच्या एका महिलेचा, नांदेड दत्तनगर येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात, गुरुवार 10 सप्टेंबर रोजी बालाजीनगर नांदेड येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, बुधवार 16 सप्टेंबर रोजी धर्माबाद तालुक्यातील यताळा येथील 20 वर्षाची एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, मुदखेड येथील 55 वर्षाची एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, नांदेड विशालनगर येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, चौफाळा नांदेड येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा यांचा खाजगी रुग्णालयात, गुरुवार 17 सप्टेंबर रोजी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील 50 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे  उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 338 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 8, किनवट कोविड केंअर सेंटर 5, भोकर कोविड केंअर सेंटर 1, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 2, हिमायतनगर कोविड केंअर सेंटर 12, मुखेड कोविड केंअर सेंटर 24, उमरी कोविड केंअर सेंटर 14, खाजगी रुग्णालय 4, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 1, हदगाव कोविड केंअर सेंटर 11, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 110, कंधार कोविड केंअर सेंटर 1, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर 16, नायगाव कोविड केंअर सेंटर 20, बिलोली कोविड केंअर सेंटर 17 असे 246 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 97, लोहा तालुक्यात 4, हदगाव तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 9, हिंगोली 2, लातूर 2, बीड 1, नांदेड ग्रामीण 6, मुदखेड तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 6, उमरी तालुक्यात 2, परभणी 1, यवतमाळ 1 असे एकुण 137 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 24,  हदगाव तालुक्यात 5, अर्धापूर तालुक्यात 18, किनवट तालुक्यात 12, बिलोली तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 18, हिमायतनगर तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 10, उमरी तालुक्यात 2, नांदेड ग्रामीण 5, मुदखेड तालुक्यात 6, लोहा तालुक्यात 4, कंधार तालुक्यात 5, भोकर तालुक्यात 9, देगलूर तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 5, यवतमाळ 1 एकुण 127 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 818 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 308, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 594, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 80, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 40, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 133, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 86, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 179,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 75, लोहा कोविड केअर सेंटर येथे 114, हदगाव कोविड केअर सेंटर 59, भोकर कोविड केअर सेंटर 36, कंधार कोविड केअर सेंटर येथे 53, बारड कोविड केअर सेंटर 20, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 57, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 39, मुदखेड कोविड केअर सेटर 73,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 11, किनवट कोविड केअर सेंटर येथे 218, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 58, उमरी कोविड केअर सेंटर 85, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 16,  खाजगी रुग्णालयात 399 बाधित, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड 82, औरंगाबाद 1 व निजामाबाद 1, हैद्राबाद येथे 1 संदर्भित  झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 68 हजार 822,

निगेटिव्ह स्वॅब- 53 हजार 8,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 264,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 12 हजार 701,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 10,

एकूण मृत्यू संख्या- 338,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 8 हजार 480,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 818,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 125, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 42,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 69 टक्के  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 रोजी मुंबई येथून चार्टर्ड विमानाने श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आगमन व मोटारीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडे प्रयाण करतील. यानंतर सकाळी 11 ते 11.45 वाजेपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. दुपारी 11.45 ते दुपारी 12.15 वाजेपर्यंत मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह स्नेहनगर, नांदेड येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 12.30 ते 1.15 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. दुपारी 1.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. श्री गुरुगोविंद सिंघजी  विमानतळ नांदेड येथे आगमन व जळगावकडे प्रयाण करतील.

00000

 

मानार नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- ऊर्ध्व मानार धरण (लिंबोटी) 97 टक्के एवढे आज सायं 5 वा. भरले असून धरणपातळी 447.45 मी आहे. ही धरणपातळी 447.60 मी व साठा शंभर टक्के झाल्यावर धरणातील अतिरिक्त पाणी सांडव्यावरील गेटद्वारे मानार नदीत सोडण्यात येणार आहे. लिंबोटी धरणाच्या खालील भागातील मानार नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रालगत कोणीही विनाकारण जाऊ नये. पात्रालगतचे शेती उपयोगी सामान, जनावरे इतरत्र हलवावीत व सतर्क राहावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाने केले आहे.

00000

 

 

हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभासमोर पोलीस दलाच्या पथकाने सावधान सलामी, शोकशस्त्र, सलामी शस्त्र आणि मा





मराठवाडा मुक्ती संग्रामातील बलिदान आणि त्यागाची मूल्य

नव्या पिढीपर्यंत पोहोचवू यात - पालकमंत्री अशोक चव्हाण

“माझे कुटूंब माझी जबाबदारी” स्विकारण्यातच कोरोनामुक्तीचा मार्ग

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- वयाची पन्नास वर्ष पूर्ण करणाऱ्या आजच्या पिढीने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यातील आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाच्या गोष्टी आपल्या आई-वडिलांकडून ऐकल्या आहेत. मात्र ज्या पिढीने मुक्तीसंग्रामाचा हा लढा, हा जाज्वल्य इतिहास अनुभवला नाही त्या पिढीपर्यंत हा त्याग आणि यातील निस्वार्थ सेवेचे मुल्य पोहोचविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी आपली आहे या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जाणीव करुन दिली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 72 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते.   

येथील माता गुजरीजी विसावा उद्यान येथे हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, स्वातंत्र्य सेनानी नारायणराव भोगावकर, विठ्ठलराव जोंधळे, सर्वश्री आमदार अमर राजूरकर, बालाजी कल्याणकर, मोहनराव हंबर्डे, माधवराव पाटील जवळगावकर, रावसाहेब अंतापूरकर, शामसुंदर शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड व इतर मान्यवरांनी पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.   

एका कठीन काळातून आपण सारे जात आहोत. कोरोना सारख्या महामारीने अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. अशा या कठीन काळात सर्वांनी एक होऊन या महामारीतून प्रत्येकाला अधिक सुरक्षित कसे ठेवता येऊ शकेल याचाच ध्यास घेतला पाहिजे. एका अर्थाने हा कोरोनापासून मुक्तीचाच लढा असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगून मागील सहा महिन्यांपासून यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या वैद्यकीय, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आदी  संबंधित विभागातील कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवही केला. 

शासन पातळीवर आम्ही शर्तीने प्रयत्न करीत आहोत. नांदेड जिल्ह्यात आपण मागच्या महिन्यात जिल्हा रुग्णालयात दोनशे खाटांच्या अद्ययावत बाह्य रुग्ण विभागाची सुरुवात केली आहे. यासमवेत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  व रुग्णालयात नुकतेच आपण 80 खाटाचे दोन आयसीयू वार्ड अद्यावत केले आहेत. यात 64 खाटा या आयसीयूच्या तर 16 खाटा या ऑक्सिजनच्या तयार केल्या आहेत. पुर्वीच्या 170 आयसीयू खाटांमधून ही नवी भर पडली असून आता अतीगंभीर जे बाधित आहेत त्यांच्यावर येथे प्राधान्याने उपचार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

शासन एका बाजूला प्रत्यनाची पराकाष्टा करत आहे. आपण आता नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यासाठी तेवढ्याच जागरुकतेने सहकार्यासाठी पुढे सरसावले  पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. शासनाने नुकतीच “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” ही मोहिम हाती घेतली असून आता यात प्रत्येक घरातील व्यक्तींनी सहभाग घेतला पाहिजे. ही प्रक्रिया सुद्धा राष्ट्र निर्माणा इतकीच पवित्र आणि महत्वाची व तेवढीच मोठी राष्ट्रसेवा आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांपर्यंत शासनाचा व समाजाचा प्रतिनिधी पोहोचून आपण कोरोना निर्मुलनासाठी मोठी तपासणी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला जिल्ह्यातील प्रत्येक घर आपला सहभाग देईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. मोठ्या आशेने हा देश आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहे. ही अपेक्षा फक्त ज्याची त्याने स्वत:ची काळजी स्वत: घेण्यापूरती असून “माझे कुटूंब-माझी जबाबदारी” समर्थपणे सांभाळायची आहे. प्रत्येक घर यासाठी पुढे आले तरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.  

न्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. पोलीस वाद्यवृंद पथकानेही बिगूल धून वाजवून सलामी दिली. यावेळी सर्व उपस्थितांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रध्वजाचे वंदन आणि राष्ट्रीय सलामी झाली. 

याप्रसंगी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, जिल्हा परिषद, महापालिकेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वातंत्र्य सेनानी व जेष्ठ नागरिकांची भेट घेवून त्यांना मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. राखीव पोलीस निरीक्षक सय्यद जमील यांनी परेड कमांडर म्हणून संचालन केले. तर व्यंकटेश चौधरी यांनी सुत्रसंचालन केले.  

0000


 

 

Wednesday, September 16, 2020

 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाचे युटयूबवर थेट प्रक्षेपण

▪ नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. सकाळी 8.30 वाजता माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथील हुतात्मा स्मृती स्तंभास पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण व 9 वाजता ध्वजारोहण होईल. 

यावर्षी कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेवून नागरिकांना घरी बसूनच हा कार्यक्रम पहाता यावा यासाठी युटयूबवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. युटयूबच्या या https://youtu.be/dvgQB_x-DaY या लिंकवर हा कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

000000



केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...