मानार नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा
नांदेड
(जिमाका) दि. 17 :- ऊर्ध्व मानार धरण (लिंबोटी) 97 टक्के एवढे आज सायं 5 वा. भरले असून
धरणपातळी
447.45 मी आहे. ही धरणपातळी 447.60 मी व साठा शंभर
टक्के
झाल्यावर धरणातील अतिरिक्त पाणी सांडव्यावरील गेटद्वारे मानार
नदीत सोडण्यात येणार आहे. लिंबोटी
धरणाच्या खालील भागातील मानार नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात
आला
आहे. नदी पात्रालगत कोणीही विनाकारण जाऊ नये. पात्रालगतचे शेती
उपयोगी सामान, जनावरे इतरत्र
हलवावीत व सतर्क राहावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाने
केले आहे.
00000
No comments:
Post a Comment