Thursday, September 17, 2020

 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 रोजी मुंबई येथून चार्टर्ड विमानाने श्री गुरुगोविंद सिंजी विमानतळ नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आगमन व मोटारीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडकडे प्रयाण करतील. यानंतर सकाळी 11 ते 11.45 वाजेपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आढावा बैठकीस उपस्थिती, स्थळ- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. दुपारी 11.45 ते दुपारी 12.15 वाजेपर्यंत मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह स्नेहनगर, नांदेड येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 12.30 ते 1.15 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. दुपारी 1.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून श्री गुरुगोविंद सिंजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. श्री गुरुगोविंद सिंजी  विमानतळ नांदेड येथे आगमन व जळगावकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

  नवी मुंबई डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरुळ येथे ‘ग्लोबल प्रीमियर ऑफ वंडरमेंट - ए. आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट’ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र ...