लोकसभा
सार्वत्रिक निवडणूक
तेलंगणा
राज्यातील सीमावर्ती भागात
दारु
दुकाने बंद ठेवण्याचा आदेश
नांदेड, दि. 30 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 संदर्भात नांदेड
जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्याच्या अदिलाबाद, निझामाबाद, निर्मल, कामारेड्डी
या जिल्ह्यात 11 एप्रिल 2019 रोजी मतदान व 23 मे 2019 रोजी मतमोजणी होत आहे. या
अनुषंगाने तेलंगणा राज्यातील 5 कि.मी अंतरावरील सीमावर्ती भागात मतदान व मतमोजणी
होत असलेल्या ठिकाणी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
यांनी काढले आहेत.
या
निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार
पाडण्यास मदत व्हावी व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून अनुचित प्रकार
घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी तेलंगणा राज्यातील 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात मतदान
होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष) एफएल / बीआर-2 व
ताडी दुकाने (टिडी-1) अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
तेलंगणा
राज्यातील 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात मतदान होत असलेली गावे- मतदान
संपण्यापूर्वी 48 तास अगोदर सायंकाळी 6 वाजेपासून 9 एप्रिल रोजी. मतदानाचा अगोदरचा
दिवस 10 एप्रिल 2019 रोजी संपूर्ण दिवस. मतदानाचा दिवस 11 एप्रिल 2019 रोजी मतदान
प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संपूर्ण दिवशी तर मतमोजणीचा दिवस 23 मे 2019 रोजी
मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण होईपर्यंत, हा आदेश लागू राहील.
या
आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल
याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000