Tuesday, March 26, 2019


शासकीय व्यवहारांसाठी स्टेट बँक शाखा
30 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार

नांदेड दि. 26 :- जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया यांची शाखा कार्यालये शनिवार 30 मार्च 2019 रोजी शासकीय व्यवहारासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेशीत केले आहे.
महाराष्ट्र राज्य कोषागार अधिनियम 1968 अन्वये जिल्हाधिकारी यांनी निर्गमीत केलेल्या आदेशात म्हटले आहे की, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नांदेड शहरातील व तालुका मुख्यालयातील सर्व शाखा कार्यालये शनिवार 30 मार्च 2019 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत शासकीय व्यवहारासाठी सुरु राहतील.
000000

No comments:

Post a Comment

  ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मा...