Tuesday, March 26, 2019


निवडणूक निरीक्षक हरदीप सिंग यांचे आगमन

नांदेड, दि. २६- भारत निवडणूक आयागाने लोकसभा निवडणूक -२०१९ ची घोषणा केली आहे. त्‍यानुसार १६- नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी श्री. हरदीप सिंग यांची निवडणूक निरीक्षक (जनरल) म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.
          निवडणूक निरीक्षक हरदीप सिंग यांचे वास्‍तव्‍य निवडणूक काळात मिनी सह्याद्री , शासकीय विश्रामगृह, स्‍नेह नगर, नांदेड येथे आहे. त्‍यांच्‍या कक्षाचा दुरध्‍वनी क्र.०२४६२-२५०१३० असून त्‍यांचा भ्र.क्र.९४२००७५६१२ असा आहे. १६- नांदेड लोकसभा परिक्षेत्रातील नागरिकांना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात आपल्‍या काही तक्रारी असतील, तर  निवडणूक  निरीक्षक यांच्‍याशी संपर्क  साधावा.
श्री हरदीप सिंग (जनरल) हे सकाळी ८-०० ते ९-०० या दरम्‍यान सर्वसामान्‍य जनतेसाठी त्‍यांचे तात्‍पुरते निवासस्‍थान म्‍हणजेच मिनी सह्याद्री, शासकीय विश्रामगृह, स्‍नेह नगर , नांदेड येथे उपलब्‍ध राहतील.
          तरी आपल्‍या कांही अडचणी असल्‍यास निवडणूक निरीक्षक यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी १६- नांदेड लोकसभा मतदार संघ यांनी केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...