Monday, January 2, 2017

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार- 2016 साठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नांदेड , दि. 2 :  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2016 ते 31 डिसेंबर, 2016 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2017 असा आहे.
         स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा  www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.inयेथेही उपलब्ध आहेत.  
  
पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे
अ.क्र
पुरस्काराचे नाव
पारितोषिक
1
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्य स्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
2
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्य स्तर)

51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
3
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
4
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू)(राज्य स्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
5
यशवंतराव चव्हाण पुरस्कार
शासकीय गट (मराठी) (मा. व ज.) (राज्य स्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
6
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथापुरस्कार (राज्य स्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
7
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकारपुरस्कार (राज्य स्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
8
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीयगट (मा.व ज.) (राज्य स्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
9
सोशल मीडिया पुरस्कार
(राज्य स्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
10
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्य स्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार

11
दादासाहेब पोतनीस पुरस्कार,
नाशिक विभाग

51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, याव्यतिरिक्त रुपये 10 हजारदै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
12
अनंतराव भालेराव पुरस्कार,
औरंगाबाद विभाग (लातूरसह)
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
13
आचार्य अत्रे पुरस्कार,
मुंबई विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
14

नानासाहेब परूळेकर पुरस्कार,
पुणे विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
15
शि.म.परांजपे पुरस्कार,
कोकण विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
16
ग.गो.जाधव पुरस्कार,
कोल्हापूर विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
17
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार,
अमरावती विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
18
ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार,
नागपूर विभाग
51 हजार रुपये
(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)
       
नियम व अटी
राज्य/विभागीय पुरस्कार
        पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षांची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी,शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील  विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी  त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी  पत्रकारांची  निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी  राज्य व विभागीय स्तर आहेत.  इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच सोशल मीडिया पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत.पुरस्कारासाठी  निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            पुरस्कारासाठी  पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतींसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिध्द झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.
            पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक(माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक(माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात.प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.
            ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
            जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक,पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिध्द झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.
            गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील.
            शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात पाठवाव्या लागतील.
            2016 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            प्रवेशिका राज्य स्तरासाठी किंवा विभागीय स्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
            प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
सोशल मीडिया पुरस्कार
            ही स्पर्धा संकेतस्थळे व ब्लॉग व सोशल मिडीयातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त/पत्रकारिता विषयक मजकुरासाठी आहे. या स्पर्धेसाठी संकेतस्थळे व ब्लॉग सोशल मीडियाचा वृत्त/पत्रकारिताविषयक प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल. पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. स्वतंत्र ब्लॉगद्वारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष झालेले असावे. त्याचप्रमाणे, वृत्त/पत्रकारिताविषयक संकेतस्थळ अधिकृत असावे व त्यावर सोशल मीडिया वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या असाव्यात व त्यात शासनाच्या विविध योजनांना पूरक अभिव्यक्ती असावी. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी सोशल मीडियाद्वारे करण्यात आलेल्या पत्रकारितेची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रित प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
            केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लिखाणातून लोकांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लिखाण करणाऱ्या पत्रकारांना तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधील पत्रकारांना सहभागी होता येईल. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव योजना, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅसची तसेच वीजेची निर्मिती इत्यादी बाबत लिखाण केलेले असावे. शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छताविषयक विविध योजनांची प्रसिध्दी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी  लिखाणाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन इत्यादींचा या पुरस्कार स्पर्धेत अंतर्भाव होईल. नियमातील संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा
        इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी  वृत्तकथा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था  प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
            प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपंसचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला,  हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तचित्रकथा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्याची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती  करण्यात येईल. तसेच याशिवाय अन्य संबंधित अटी  या गटासाठीही लागू राहतील.     
छायाचित्रकार पुरस्कार
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे,समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पुरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल.
            महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र  मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी. पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची  मागील 5वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिध्दीसाठी जनतेमधील जाणिव जागृतीसाठी  त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही. पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिध्द झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
उपरोक्त सर्व स्पर्धाविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथे उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावती व संचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई -32 येथे उपलब्ध आहेत.
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

*****
तूर, हरभरा पिक सरंक्षणासाठी
कृषि विभागाचा संदेश
नांदेड , दि. 2 –  जिल्ह्यात तुर व हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी कृषि विभागाने संदेश दिला आहे.
तुर पिकांवरील शेंगा खाणाऱ्या अळ्याच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्जोएट 5 टक्के 0.2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हरभरावरील घाटेअळीसाठी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही 500 मिली प्रती हेक्टर किंवा क्लोरापायरीफॉस 20 ईसी 2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. घाटेअळीसाठी प्रती हेक्टर 5 कामगंध सापळे लावावेत, असे आवाहन नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

******
जयंती, राष्ट्रीय दिनाबाबत जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नांदेड , दि. 2 – राष्ट्रपुरूष व थोर व्यक्तींच्या जयंती व तसेच विविध राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आले. संबंधित शासकीय कार्यालयांनी या शासन निर्देशांचे अवलोकन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2017 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक क्र. जपूति-2216/प्र.क्र.136/29 दि. 27 डिसेंबर 2016 अन्वये दिलेल्या सुचनानुसार सन 2017 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी, रविवार अथवा महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी येत असतील आणि यासंदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावे. अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत.
शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखाने याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

******
महिला बचत गटांच्या उत्पादनांचे
आजपासून मल्टीपर्पजवर विक्री-प्रदर्शन
नांदेड , दि. 2 – महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मंगळवार 3 जानेवारी 2017 रोजी मल्टी पर्पज हास्कूल वजिराबाद नांदेड येथे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळावे तसेच बाजारपेठेतील आर्थिक व्यवहाराची माहिती मिळावी याकरीता महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.  यात तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजना , अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण योजना व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 181 गावात 1 हजार 958 महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 23 हजार 935 महिलांचे संघटन करण्यात आले आहे. स्थापन बचत गटातील महिलांना विविध पायाभूत प्रशिक्षण देऊन बॅकेमार्फत कर्ज मिळवून देण्यात येते. या मिळालेल्या कर्जाच्या माध्यमातून महिला शेतीवर व बिगर शेतीवर उद्योग करीत आहे. या कार्यक्रमास ग्रामीण व नागरी भागातून 1 हजार ते 1 हजार 500 महिला उपस्थित राहणार आहेत.

******
जिल्हा दक्षता, नियंत्रण समितीची बैठक संपन्न
नांदेड , दि. 2 – मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांच्या गुन्ह्यांचा तपास करुन ही प्रकरणे त्वरने निकाली काढावीत , असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी सभागृहात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक बैठक जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, कृषि उपसंचालक एस. व्ही. लाडके, कार्यकारी अभियंता एस. व्ही. पडलवार, सरकारी वकील नितीन कागणे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. संतोषी देवकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (नाहसं) श्रीमती एम. एम. कदम, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार हे उपस्थित होते.
अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 1989 नागरी हक्क संरक्षण व भादवि कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा आढावा घेवून श्री. काकाणी यांनी या गुन्ह्याचा तपास त्वरीत करुन ही प्रकरणे न्यायालयात दाखल झाली पाहिजेत. त्यांचा निकाल लवकर लागण्यादृष्टीने प्रयत्नशील रहावे, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी श्री. आऊलवार यांनी जिल्ह्यात दाखल गुन्ह्यासंबंधी माहिती देताना डिसेंबर 2016 मध्ये 6 गुन्हे दाखल झाले असून हे गुन्हे पोलीस तपासावर आहेत, असे सांगितले.

******
डिजीटल पेमेंटबाबत जनजागृती करा,
व्यवहारात आवर्जून वापर करा - काकाणी
शासकीय अधिकाऱ्यांसाठीचे कॅशलेस प्रशिक्षण संपन्न
नांदेड, दि. 2 :- डिजीटल पेमेंटचा वापराबाबत नागरिकांपर्यंत पोहचून माहिती द्या, तसेच शासकीय व्यवहारात डिजीटल पेमेंटचा आवर्जून वापर करा,
असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले. जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी डिजीटल पेमेंट विषयी प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. या प्रशिक्षणात श्री. काकाणी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील बचत भवन येथे प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, कोषागर अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांची उपस्थिती होती. अग्रणी बँकेचे जयंत वरणकर, श्री. सोनावणे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे रोकडरहित- डिजीटल पेमेंटबाबत माहिती दिली.
प्रशिक्षणात वैयक्तीक पातळीवरील डिजीटल पेमेंट, शासकीय व्यवहारातील वापर, तसेच त्रयस्थांचे पेमेंट आदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी डिजीटल पेमेंटच्या व्यवहारांची यापुढील काळातील गरज आणि वेळेत बचत, पारदर्शकता या अंगाने मांडणी केली. 
इंटरनेटचे व्यापक जाळे, मोबाईल बँकीग, मोबाईल वॅलेट, ई-वॅलेटबाबतही प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाचंगे यांनी सुत्रसंचालन केले. कोषागार अधिकारी श्री. गग्गड यांनी आभार मानले. प्रशिक्षणास विविध शासकीय कार्यालयांचे आहरण व संवितरण अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******
नागरिकांशी सुसंवाद साधा, शेतकरी गटांना
मार्गदर्शन करा, आधार नोंदणीसाठी समन्वय साधा
लोकशाही दिन संपन्न, समन्वय समिती बैठकीत जिल्हाधिकारी काकाणी यांचे निर्देश

नांदेड, दि. 2 :- आपले सरकार या पोर्टलवर सादर होणाऱ्या तक्रारी, सुचनांची गांभीर्याने दखल घ्या. नागरिकांच्या तक्रारी, सुचनांवर कार्यवाहीसाठी तत्पर रहा. लोकशाही दिनात येणाऱ्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करा, नागरिकांना आपले सरकारच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री तसेच मंत्रालयस्तरावर पोहचण्याचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्याअनुषंगाने नागरिकांशी सुसंवाद साधा, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. लोकशाही दिन आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या  बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील बचत भवन येथे लोकशाही दिन संपन्न झाला.
बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपवनसंरक्षक सुजय डोडल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. टी. एस. मोटे, अधीक्षक भुमि अभिलेख वसंत निकम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर भातलंवडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उ.मु.का. दिपक चाटे, कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, अविनाश शाहू, डॅा. उत्तम इंगळे,  कृषि विकास अधिकारी पंडीतराव मोरे आदींसह महावितरण, बँक, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीत प्रामुख्याने आगामी वृक्षलागवड मोहिम, जिल्ह्यातील आधार नोंदणी, शेतकऱ्यांसाठी शेतकरी गट, शेतकऱ्यांसाठी रुपे कार्डची उपलब्धता यांसह चर्चेत आलेल्या विविध विषयांवर जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निर्देश दिले. वृक्ष लागवडीची मोहिम यंदाही व्यापक राहणार आहे. त्यासाठी कार्यालयांनी गेल्यावर्षीच्या वृक्ष लागवडीचा वस्तुस्थिती अहवाल, लागवड, जगलेल्या रोपट्यांची स्थिती याबाबतचा अहवाल द्यावा. त्याशिवाय यावर्षी लागवड करता येणाऱ्या रोपांची, त्यांच्या प्रजातींची, जागा तसेच पाणी आदी उपलब्ध बाबींचा आढावा घेऊन, माहिती तातडीने द्यावी. जेणेकरून वृक्षलागवडीसाठी वेळेत आणि काटेकोर नियोजन करता येईल.
जिल्ह्यातील बालकांच्या आधार क्रमांक नोंदणीसाठी शिक्षण, महिला व बालविकास आणि आधार नोंदणी यंत्रणा यांनी समन्वयाने नियोजन करावे. बालकांची आधार नोंदणी न झाल्यास, भविष्यात त्यांना देय असलेल्या योजनांतील लाभार्थी अनुदान थेट खात्यांवर जमा करण्यात अडचणी उद्भवू शकतात. याबाबत पालकांनाही जाणीव करून द्यावी. शिधापत्रिकाही आधारशी संलग्न करण्याची मोहिम वेगाने सुरु आहे. त्यासाठीही बालकांची आधार नोंदणी अत्यावश्यक असल्याची माहिती पोहचविण्यात यावी. अंगणवाडी आणि शाळा यांमधील बालकांच्या आधार नोंदणीसाठी संबंधित यंत्रणांनी एकत्रितरित्या समन्वयाने कार्यक्रम आखावा असेही निर्देशित करण्यात आले.
शेतकऱ्यांकडील किसान क्रेडीट कार्डचे रुपांतर रुपेमध्ये करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया वेगाने आणि शेतकऱ्यांत पोहचून पुर्ण होईल, असे नियोजन करावे. शेतकऱ्यांचे शेतकरी गट तयार करावेत. त्यांच्या शेतीमाल कंपन्या तसेच प्रक्रिया उद्योग, खत विक्रीचे परवाने यासाठीही गटांना मार्गदर्शन करावे. प्रत्येक गटाला कृषि पदवीधारकाला संलग्न करण्यात यावे. समन्वय समितीच्या बैठकीपुर्वी जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न झाला. यामध्ये उपस्थित नागरिकांच्या अर्ज, निवेदन यांच्यावर तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. काही प्रकरणात चर्चाही केली, संबंधित यंत्रणांना कार्यवाहीबाबत सूचनाही केल्या.

*****

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...