महिला बचत
गटांच्या उत्पादनांचे
आजपासून
मल्टीपर्पजवर विक्री-प्रदर्शन
नांदेड , दि. 2 – महिला आर्थिक विकास
महामंडळाच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मंगळवार 3 जानेवारी 2017 रोजी
मल्टी पर्पज हास्कूल वजिराबाद नांदेड येथे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या
मालाचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बचतगटातील महिलांनी उत्पादित
केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळावे तसेच बाजारपेठेतील आर्थिक व्यवहाराची
माहिती मिळावी याकरीता महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
यात तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला
सक्षमीकरण योजना , अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण योजना व राष्ट्रीय नागरी उपजिविका
अभियानांतर्गत जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 181 गावात 1 हजार 958 महिला बचत गटाची
स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 23 हजार 935 महिलांचे संघटन करण्यात आले
आहे. स्थापन बचत गटातील महिलांना विविध पायाभूत प्रशिक्षण देऊन बॅकेमार्फत कर्ज
मिळवून देण्यात येते. या मिळालेल्या कर्जाच्या माध्यमातून महिला शेतीवर व बिगर
शेतीवर उद्योग करीत आहे. या कार्यक्रमास ग्रामीण व नागरी भागातून 1 हजार ते 1 हजार
500 महिला उपस्थित राहणार आहेत.
******
No comments:
Post a Comment