Monday, January 2, 2017

जिल्हा दक्षता, नियंत्रण समितीची बैठक संपन्न
नांदेड , दि. 2 – मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांच्या गुन्ह्यांचा तपास करुन ही प्रकरणे त्वरने निकाली काढावीत , असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी सभागृहात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक बैठक जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, कृषि उपसंचालक एस. व्ही. लाडके, कार्यकारी अभियंता एस. व्ही. पडलवार, सरकारी वकील नितीन कागणे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. संतोषी देवकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (नाहसं) श्रीमती एम. एम. कदम, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार हे उपस्थित होते.
अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 1989 नागरी हक्क संरक्षण व भादवि कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा आढावा घेवून श्री. काकाणी यांनी या गुन्ह्याचा तपास त्वरीत करुन ही प्रकरणे न्यायालयात दाखल झाली पाहिजेत. त्यांचा निकाल लवकर लागण्यादृष्टीने प्रयत्नशील रहावे, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी श्री. आऊलवार यांनी जिल्ह्यात दाखल गुन्ह्यासंबंधी माहिती देताना डिसेंबर 2016 मध्ये 6 गुन्हे दाखल झाले असून हे गुन्हे पोलीस तपासावर आहेत, असे सांगितले.

******

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...