Monday, June 2, 2025

 वृत्त क्रमांक 561

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड दि. 2 जून :- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळयास 350 वर्ष पुर्ण झालेले आहेत. दिनांक 6 जून 2025 रोजी राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्हिडिओ संदेशांद्वारे कार्यक्रमांचा शुभारंभ होणार आहे. राज्याभिषेक सोहळयाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी, माजी विद्यार्थी, स्थानिक उद्योजक यांच्या सहभागातून नाविन्यता प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे शुक्रवार 6 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हयातील प्रतिष्ठीत व्यक्ती  उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने प्रशिक्षणार्थ्यांनी, पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. त्यांच्या राज्याभिषेकास 350 वर्ष पुर्ण झालेले आहेत. त्यांचे प्रेरणादायी जीवन आजही समाजाला प्रेरणा देते. 

00000

वृत्त क्रमांक 560

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. २ जून : नांदेड जिल्ह्यात  15 जून 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 15 जून 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  


त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 


अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

Sunday, June 1, 2025

 वृत्त क्रमांक 559

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड दि. 1 जून  :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 2 जून 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे.  

या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर  यांनी दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक 558

अन्न व औषध प्रशासन मंत्री 

नरहरी झिरवाळ यांचा दौरा 

नांदेड दि. 1 जून :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे 2 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 1 जून 2025 रोजी नाशिक येथून रात्री 7.55 वा. नंदीग्राम एक्सप्रेसने सहस्त्रकुंड जि. नांदेडकडे प्रयाण. सोमवार 2 जून 2025 रोजी सकाळी 7 वा. सहस्त्रकुंड जि. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व इस्लामपुर शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण व राखीव. सकाळी 8 वा. शासकीय विश्रामगृह इस्लामपूर येथून सहस्त्रकुंड धबधबा कडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. सहस्त्रकुंड धबधबा नांदेड येथे शेतकरी बांधवासोबत भेट व चर्चा. सकाळी 10 वा. श्रीमती भाग्यरथाबाई शेषराव मिराशे यांची कन्या चिसौका. सोनु यांचे विवाहास उपस्थिती. स्थळ- थारा ता. किनवट जि. नांदेड . सकाळी 11 वा. थारा जि. नांदेड, किनवट येथून हुडी कडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. श्री. निर्गुण कदम यांचे फार्महाऊस येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. हुडी ता. किनवट येथून नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. गुरुगोविंदसिंग गुरुद्वारा नांदेड येथे आगमन व दर्शन. दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व लोकप्रतिनिधी व विविध संघटनासमवेत चर्चा. सायं. 6 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून रेल्वे स्टेशन कडे प्रयाण. सायं. 6.45 वा. नांदेड येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

  वृत्त क्रमांक 557

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क ची सयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत 

नांदेड, दि. १ जून:- महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग, नवी मुंबई यांचे मार्फत महाराष्‍ट्र गट क सेवा संयूक्‍त पूर्व परीक्षा 2024 हि परीक्षा आज दिनांक 01 जून, 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत एका सत्रात नांदेड जिल्‍हयात 37 परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली. 

या परीक्षेसाठी आयोगाचे निर्देशानूसार 37 उपकेंद्रप्रमुख, 09 समन्‍वय अधिकारी, ०२ भरारी पथक, ८५ मदतनिस, १४८ पर्यवेक्षक, ४७५ समवेक्षक, ८३ शिपाई, ७१ पाणीवाला, ३७ केअरटेकर यांची नियूक्‍ती करण्‍यात आली होती.

या परीक्षेसाठी एकूण ९६२३ परीक्षार्थी पैकी ६७५३ परीक्षार्थी उपस्थित होते तर २८७० परीक्षार्थी अनूपस्थित होते. परीक्षा विनाव्‍यत्‍यय सुरळीत पणे पार पडली.

०००००

 वृत्त क्रमांक 556

१०० दिवसांच्या मुख्यमंत्री प्रशासकीय सुधारणा मोहिमेत नांदेड तालुका मराठवाड्यात प्रथम

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते तहसीलदार संजय वारकड यांचा सत्कार

नांदेड, दि. ३० :- मुख्यमंत्री 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेअंतर्गत नांदेड तालुका मराठवाड्यामध्ये प्रथम आला आहे.त्या अनुषंगाने आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शाल,बुके देऊन तहसीलदार संजय वारकड यांचा छत्रपती संभाजी नगर येथे सत्कार करण्यात आला. 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी ,सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अपर जिल्हाधिकारी ,सर्व निवासी उप जिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी सामान्य ,उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार यांची विशेष उपस्थिती होती.

०००००




Thursday, May 29, 2025

 वृत्त क्रमांक 555

विकसित कृषी संकल्प अभियानाची 

कृषी विज्ञान केंद्र सगरोळीतुन उत्साहात सुरुवात

नांदेड दि. 29 मे :- कृषी विज्ञान केंद्र सगरोळीतर्फे विकसित कृषी संकल्प अभियानाची आज उत्साहात सुरुवात झाली. या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन यांची माहिती देणे आहे.

अभियानाचा व्यापक विस्तार

या अभियानाद्वारे शेतीतील सुधारित तंत्रज्ञान, उत्पादन खर्च कमी करण्याचे उपाय, सेंद्रिय शेती आणि पिकांची विविधता वाढवणे यावर भर दिला जात आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या मार्गदर्शनाखाली हे अभियान ७२३ जिल्ह्यांमध्ये राबवले जात असून ७३१ कृषी विज्ञान केंद्रे आणि ११३ संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ यात सक्रिय सहभाग घेत आहेत.

विशेष कार्यक्रम

कृषी विज्ञान केंद्र सगरोळीतर्फे आयोजित शिंपाला, सगरोळी, बोळेगाव, आदमपूर, खतगाव, अटकली या गावांतील कार्यक्रमात शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करण्यात आले. प्रगत तंत्रज्ञान, मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलसंधारण, विविध शासकीय योजना आणि बियाण्यांची उगवणक्षमता यासंदर्भात तज्ज्ञांनी माहिती दिली. 

तज्ज्ञांचे मार्गदर्शन 

या कार्यक्रमात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. श्रीगुरे, श्री. दमाले, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवनवर, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. कृष्णा अंभूरे, डॉ. निहाल मुल्ला, भारतीय ऊस संशोधन संस्था प्रवरानगरचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात, डॉ. बोरसे आणि तालुका कृषी अधिकारी बिलोली श्री. तिडके यांनी मार्गदर्शन केले.

उद्घाटन सोहळा आणि पुढील दिशा

या अभियानाच्या सगरोळी येथील उद्घाटन प्रसंगी श्री. सुनील देशमुख, विश्वस्त, संस्कृति संवर्धन मंडळ उपस्थित होते. शेतकऱ्यांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले. 

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून, उत्पादन खर्च कमी करण्याच्या उपाययोजना, सेंद्रिय शेतीचे फायदे आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.

0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...