Monday, June 2, 2025

 वृत्त क्रमांक 561

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड दि. जून :- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळयास 350 वर्ष पुर्ण झालेले आहेत. दिनांक जून 2025 रोजी राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्हिडिओ संदेशांद्वारे कार्यक्रमांचा शुभारंभ होणार आहे. राज्याभिषेक सोहळयाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थीमाजी विद्यार्थीस्थानिक उद्योजक यांच्या सहभागातून नाविन्यता प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे शुक्रवार 6 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हयातील प्रतिष्ठीत व्यक्ती  उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने प्रशिक्षणार्थ्यांनीपालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. त्यांच्या राज्याभिषेकास 350 वर्ष पुर्ण झालेले आहेत. त्यांचे प्रेरणादायी जीवन आजही समाजाला प्रेरणा देते. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 720   डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फि डिंग सेंटर चा लोकाअर्पण सोहळा       नांदेड दि. 11 ...