Sunday, January 17, 2021

 

34 कोरोना बाधितांची भर तर  

40 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 17 :- रविवार 17 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 34 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 22 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 40 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 517 अहवालापैकी 478 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 76 एवढी झाली असून यातील 20 हजार 963 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 332 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 579 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.    

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 11, धर्माबाद तालुक्यांतर्गत 1, देगलूर तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6, लोहा तालुक्यांतर्गत 1, कंधार तालुक्यांतर्गत 11, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 40 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 11, हदगाव तालुक्यात 1 असे एकुण 12 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 9, मुदखेड तालुक्यात 1, किनवट 1, मुखेड 5, बिलोली 6  असे एकुण 22 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 332 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 19, मुखेड कोविड रुग्णालय 11, हदगाव कोविड रुग्णालय 1, महसूल कोविड केअर सेंटर 30, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 139, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 49, खाजगी रुग्णालय 27 आहेत.   

रविवार 17 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 73 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 95 हजार 604

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 69 हजार 353

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 76

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 963

एकुण मृत्यू संख्या-579

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-394

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-332

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15.           

00000

 गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी

शेतातील उभी पर्हाटी नष्ट करून फरदड टाळावी 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-  कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व पुढील वर्षी होणारा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना हाती घ्याव्यात. सध्या कापूस पीक हंगाम संपुष्टात आला असून फरदडीमुळे कापूस बोंडअळीचे जीवनचक्र अखंडितपणे सुरू राहते. तसेच कापूस पिकाची काढणी केल्यानंतर कच्चा कापूस दीर्घकाळासाठी  साठवलेल्या ठिकाणी कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंडअळीला खाद्य मिळाल्याने पुढील हंगामात या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र  खंडित करून पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता फरदड निर्मूलन मोहीम राबविणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक कापूस उत्पादक गावातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले शेत व गाव फरदडमुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत व  जानेवारी महिना अखेर सर्व शेतातील गावातील कापसाचे पीक काढून नष्ट करावे. तसेच फरदड कापूस न घेणे बाबत निर्धार करावा. कापूस निर्मूलन मोहीम अंतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे व विविध माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. 

जानेवारी 2021 अखेर सर्व गावातील कापूस पीक शेतातून पूर्णपणे काढून टाकावे व फरदड घेऊ नये गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्टात आणण्यासाठी 5  ते 6 महिने कापूस पिकाखालील क्षेत्र हे कापूस पीक विरहित ठेवणे गरजेचे आहे. गुलाबी बोंडअळीला डिसेंबर नंतर खाद्य उपलब्ध न झाल्यास ती सुप्तावस्थेत जाते परंतु फरदडीमुळेअळीला  खाद्य उपलब्ध होते व त्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र अखंडितपणे सुरू राहते व पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. फरदडीपासून थोडेफार उत्पादन जरी मिळत असले तरी गुलाबी बोंडअळीमुळे येणा-या   हंगामात होणा-या नुकसानीचा विचार करून   प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पर्हाट्या रोटावेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे छोटे छोटे तुकडे करून जमिनीत गाडाव्यात.कापूस वेचणी संपल्यानंतर शेतात शेळ्या, मेंढ्या किंवा इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत जेणेकरून प्रादुर्भावग्रस्त पाती व बोंडे खाल्ल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात कमी होईल. कापूस पिकाच्या पर्हाट्यामध्ये किडींच्या सुप्तावस्था राहत असल्याने अशा पर्हाट्या, कीडग्रस्त बोंडे, पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे, त्याची साठवणूक करू नये. ज्या ठिकाणी कापूस दीर्घकाळ साठवून ठेवला जातो अशा ठिकाणी कामगंध सापळे, प्रकाश सापळे लावून पतंग नष्ट करावेत.या ठिकाणी निर्माण झालेला कचरा,सरकी, अळ्या व कोष नष्ट करावेत. 

या संपूर्ण बाबींचा वापर करून शेतकरी बांधवांनी फरदडमुक्तीचे धोरणाचा अवलंब करून  व पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करून सहकार्य करावे‌. कापूस पिकाचा हंगाम संपुष्टात आल्याने कापूस पिकाचे क्षेत्रात सिंचनाची सोय उपलब्ध असलेल्या ठिकाणी उन्हाळी ज्वारी उन्हाळी भुईमूग उन्हाळी सोयाबीन भाजीपाला चारा पिके टरबूज खरबूज इत्यादी पिके घ्यावेत व कुठल्याही परिस्थितीत कापूस पिकाचे फरदड घेण्याचे टाळावे संपूर्ण तालुका शंभर टक्के फरदडमुक्त होण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उपाययोजना हाती घ्याव्यात जेणेकरून गुलाबी बोंड अळीचा भविष्यातील प्रादुर्भाव टाळता येईल. 

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे सर, उपविभागिय कृषी अधिकारी नांदेड, रविकुमार सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्या मदतीने व शेतकऱ्यांच्या सहकार्याने तालुक्यात फरदडमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

000000

 




 

ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार मतमोजणी

मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक असलेली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी जर त्याच दिवशी आठवडी बाजार असतील तर ते बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.   

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी ही माहिती व तंत्रज्ञान इमारत स्थापत्य अभियंत्रिकी विभाग शासकिय तंत्रनिकेतन कॉलेज नांदेड येथे होणार आहे. तर अर्धापूर तालुक्यासाठी- तहसिल कार्यालय अर्धापूर. भोकर- तळमजला तहसिल कार्यालय भोकर. मुदखेड- तहसिल कार्यालय मुदखेड. हदगाव- मागासवर्गीय शासकिय मुलींचे वसतीगृह तामसा रोड हदगाव. हिमायतनगर- तहसिल कार्यालय हिमायतनगर. किनवट- औद्योगिक प्रशिक्षण संस्था तळमजला किनवट. माहूर- तहसिल कार्यालय माहूर येथील सभागृह. धर्माबाद- शासकीय तंत्रप्रशाला आयटीआय बासर रोड धर्माबाद. उमरी- तहसिल कार्यालय उमरी. बिलोली- तहसिल कार्यालय बिलोली. नायगाव- तहसिल कार्यालय नायगाव. देगलूर- प्रशासकीय इमारत पंचायत समिती सभागृह देगलूर. मुखेड- तहसिल कार्यालय मुखेड. कंधार- श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी रोड कंधार तर लोहा तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर रोड लोहा येथे मतमोजणी होईल. ही मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरु होऊन मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सुरु राहिल.

000000

Saturday, January 16, 2021

 

नांदेड जिल्ह्यातील 262 आरोग्य रक्षकांना कोरोनाची लस

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यातील लसीकरणाला आरोग्य रक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने लसीकरण करुन घेतले. मुदखेड तालुक्यातील मुगट येथे आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी रांगा लावून लसीकरण करुन घेतल्यामुळे पहिल्याच फेरीत संपूर्ण ग्रामीण भागात सकारात्मक वातावरणाची निर्मिती झाली आहे. आज दिवसअखेरपर्यंत नांदेड जिल्ह्यात 262 आरोग्य रक्षकांनी कोरोनाची लस घेतली.

0000

 

नांदेड जिल्ह्यातील त्या पक्षांना एच-5 व एन-1 ची बाधा  

पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- देशातील इतर राज्यांच्या पाठोपाठ आपल्या राज्यातील काही गावांसमवेत नांदेड जिल्ह्यातही बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच याचा अधिक प्रादुर्भाव इतर भागात होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. 

बिलोली तालुक्यातील मौजे हूनगुंदा येथे 8 जानेवारी रोजी 2 कावळे व 9 जानेवारीला 3 कावळे व 1 बगळा मृत आढळून आले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्कता घेत पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष उपाययोजना व पथके स्थापन केली होती. 11 जानेवारीला माहूर तालुक्यातील मौजे पापलवाडी येथे 4 कुक्कुट व 3 कावळे व कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी येथे 8 कुक्कुट पक्ष्यांमध्ये, किनवट तालुक्यात 12 जानेवारी रोजी मौजे तल्हारी येथे 9 कुक्कुट व 13 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील मौजे चिखली येथे 5 कुक्कुट पक्ष्यांमध्ये मर्तुक आढळले. सदर मृत पक्षी पशुसंवर्धन विभागातर्फे पुणे येथील रोग अन्वेषण विभाग व भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था येथे रोग निदानासाठी पाठविण्यात आले होते.   

या रोगाच्या तपासणीचे निष्कर्ष  सकारात्मक आल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने सतर्कता बाळगण्याविषयी सूचित केले आहे. पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेकडून नमुने तपासणीचे निष्कर्ष प्राप्त झाले असून कावळे एव्हीयन इन्फ्लूएंझा ( एच 5 एन 8 )  व कुक्कुट पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा ( एच 5 एन 1 )  या स्ट्रेन करिता सकारात्मक आल्यानुसार मौजे नावंद्याचीवाडी ता.कंधार व मौजे पापलवाडी ता. माहुर येथे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार “ संसर्गग्रस्त क्षेत्र “म्हणून घोषित करण्यात आले असून तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांनुसार बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 किमी त्रिजेच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे व उर्वरित ठिकाणी सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. 

त्याअनुषंगाने  जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी पशुसंवर्धन विभाग, वनविभाग, ग्रामपंचायत विभाग व जलसंपदा विभाग यांना लेखी सूचना देऊन जिल्ह्यातील कोणत्याही गावात अथवा पाणवठे / जलाशय याठिकाणी कुक्कुट पक्षी, वन्यपक्षी / स्थलांतरित पक्ष्यांमध्ये असाधारण मर्तूक आढळल्यास शासनाच्या तात्काळ निदर्शनास आणण्याबाबत आवाहन केले आहे. 

मर्तूकीबाबत तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती देवून मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. पशुसंवर्धन विभाग नांदेड यांच्यावतीने जिल्हास्तरीय एक व तालुकस्तरीय 32 जलद प्रतिसाद पथक (आर आर टी ) कार्यान्वित असून जिल्ह्यातून कुठेही नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात  मर्तुक आढळून  आल्यास तात्काळ भेट देऊन रोग निदानासाठी नमुने गोला करण्यात येत आहेत. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय महितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत अशी सर्व जनतेस विनंती करण्यात येते. अंडी व कुक्कुट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व कुक्कुट मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे.

000

कृपया सुधारित वृत्त क्र. 65


19 कोरोना बाधितांची भर तर    

36 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 16 :- शनिवार 16 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 19 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 7 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 36 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 616 अहवालापैकी 589 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 42 एवढी झाली असून यातील 20 हजार 923 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 338 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 579 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 14, लोहा तालुक्यांतर्गत 1, नायगाव तालुक्यांतर्गत 1, मुखेड कोविड रुग्णालय 2, किनवट कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 36 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.92 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 7, मुदखेड तालुक्यात 1, यवतमाळ 1, लोहा 1, किनवट 2 असे एकुण 12 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, मुखेड तालुक्यात 2   असे एकुण 7 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 338 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 22, मुखेड कोविड रुग्णालय 8, हदगाव कोविड रुग्णालय 4, महसूल कोविड केअर सेंटर 28, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 134, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 57, खाजगी रुग्णालय 31 आहेत.   

शनिवार 16 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 73 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 94 हजार 944

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 68 हजार 731

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 42

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 923

एकुण मृत्यू संख्या-579

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.92 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-338

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.          

00000


 

नायगाव तालुक्यातील मौ. खैरगाव येथे

17 जानेवारीला होणार फेर निवडणूक

नांदेड, (जिमाका) दि. 16:-  नायगाव तालुक्यातील मौजे खैरगाव येथील प्रभाग क्र. 3 (क) या सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी श्रीमती ललिता शंकर घंटेवाड यांना छताचा पंखा हे चिन्ह वाटप झाल्यानंतर त्यांचे नाव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नजरचुकीने मतपत्रिकेवर समाविष्ट करावयाचे राहून गेल्यामूळे  जागा क्र. 3 (क) सर्वसाधारण स्त्री या जागेसाठी 15 जानेवारी 2021 रोजी झालेले मतदान रद्द करण्यात आले आहे. या जागेसाठी रविवार 17 जानेवारीला फेरनिवडणूक घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे. 

मौजे खैरगाव प्रभाग क्र. 3 (क) सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी श्रीमती ललिता शंकर घंटेवाड यांना छताचा पंखा या जागेसाठी सुधारित मतपत्रिका तयार करुन, त्यामध्ये श्रीमती ललिता शंकर घंटेवाड यांच्या नावाचा समावेश करुन या जागेच्या फेर मतदानासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही होणार आहे. 16 जानेवारीला मतदान यंत्र तयार करुन रविवार 17 जानेवारी 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे तर सोमवार 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. 

मौजे खैरगाव प्रभाग क्र. 3 (क) सर्वसाधारण स्त्री राखीव जागेसाठी 15 जानेवारी 2021 रोजी पार पडले असल्याने ग्रामपंचायत निवडणूकीत मधल्या बोटाला शाई लावण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. रविवार 17 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या नायगाव तालुक्यातील मौजे खैरगाव येथील प्रभाग 3 (क) या सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव जागेची फेरनिवडणुकीसाठी मतदाराच्या डाव्या हाताच्या अनामिकेस मार्करपेनने शाई लावण्यात येणार आहे याची मतदारांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...