Saturday, December 5, 2020

सहकाऱ्याच्या निरोप समारंभात

जेंव्हा माझी विद्यार्थ्यांसह निवृत्त कर्मचारीही गलबलून जातात ! 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- येथील शासकीय आयटीआयच्या प्रशिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविणारे सभागृह ! शेजारी अनेक दशकांपासून या परिसरात सावली देणारी तेवढीच जुने वृक्ष व स्वच्छ असलेला विस्तीर्ण परिसर. लॉकडाऊनच्या खंडानंतर अनेक दिवसांनी विद्यार्थी, शिक्षक, माजी कर्मचारी, माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीने गलबलून जातो. याला निमित्त असते सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रिय असलेल्या रमेश केंद्रे या गटनिदेशकांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला एक छोटेखानी समारंभ. 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेत 40 मिनिटांसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम अडीच तासांचा केंव्हा होतो हे कुणाचा लक्षातही येत नाही. माझी विद्यार्थ्यांसहित सर्वजण एक-एक आपल्या आवडत्या केंद्रे सरांच्या आठवणींचा एक-एक कप्पा काढतात. बऱ्याचश्या कप्प्यांमध्ये हळव्या आठवणी असल्याने सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा केंव्हा ओल्या होतात याचेही भान राहत नाही. एखादा कर्मचारी केवळ नोकरी म्हणून काम न करता त्या संस्थेच्या कर्तव्यासह तेथील भोवतालाचाही भाग म्हणून जेंव्हा काम करतो तेंव्हा त्या व्यक्तीच्या निरोपाला तेथील परिसरही स्तभ झाला नसेल तर नवलच. 

केंद्रे सरांच्या सेवेतले महत्वपूर्ण योगदान म्हणजे ज्या शासकिय प्रशिक्षण संस्थेसाठी त्यांनी आपली सेवा दिली, ज्या विषयाच्या अध्यापनाला सेवा दिली त्याविषयाचे आध्यापक करतांना त्याची उपयोगिता संस्थेच्या परिसरातही कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कशी देता येईल त्यादृष्टिने केलेले कार्य. शहराच्या मध्यवर्ती आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या संस्थेच्या जागेबाबत सातबाऱ्यावर जी नोंद आहे त्यात दोन एक जागेचा फरक होता. शासकिय कागदपत्रात 9 एकर तर सातबाऱ्यावर 7 एकर ही स्थिती पाहून संस्थेच्या प्राचार्यांसह केंद्रे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करुन ती सर्व जागा संस्थेला मिळवून घेतली. अध्यापनाच्या क्षेत्राव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या अंगी योगाचे संस्कार व्हावेत, उर्वरीत वेळेत समाजासाठी आपली कर्तव्य भावना लक्षात घेऊन त्यांनी नांदेड जिल्ह्यातील भारतीय योग विद्याधाम शाखेच्या उपाध्यक्ष पदासह कोरोनाच्या काळात समाजामध्ये सुदृढ आरोग्यासाठी योगा या मोहिमेलाही आकार दिला. 

एरवी शासकिय नोकरीत सुट्ट्यांचे गणित डोळ्यासमोर ठेवून सेवा देणारे आणि सुट्ट्यांच्या दिनदर्शिकेपलिकडे शासकिय कर्तव्य चोखपणे बजावत समाजासाठी आपली कर्तव्याची भावना ठेवून उर्वरित वेळेत सार्वजनिक हिताच्या उपक्रमासाठी वेळ देणे हे आजच्या काळात दुर्लभच. त्यांच्या या निरोप समारंभात जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, संस्थेचे प्राचार्य एम. बी. कुलकर्णी, उपप्राचार्य एस. एस. परधने, प्रबंधक श्रीमती वाय. बी. राठोड, प्राचार्य एम. एस. बिराजदार, प्रा. गुरुबच्चन सिंघ, प्रा. डॉ. पांडुरंग तिडके, स्वा.रा.ती.म.विद्यापिठाचे वित्त अधिकारी गोविंदराव कतलाकुट्टे यांनी केंद्रे यांच्या कार्याचा गौरव केला नसेल तर नवलच.  

0000



Friday, December 4, 2020

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन

7 डिसेंबरला कार्यक्रमाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2020  संकलन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 7 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे  करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोवीड-19 चा प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम साध्यापणाने होणार असून या कार्यक्रमास आमंत्रित  कार्यालय प्रमुख,  माजी सैनिक संघटना अध्यक्ष व विरनारी, विरमाता, विरपिता यांनीच उपस्थित रहावे, असे आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.   

सन 2019-20 मध्ये नांदेड जिल्ह्याला संकलनाचे उद्दीष्ट 35 लाख 30 हजार रुपये इतके देण्यात  आले होते. ते जिल्ह्याचे 124 प्रतिशत पुर्ण करुन 43 लाखा 82 हजार रुपये एवढा निधी शासनास जमा केला आहे. या कार्याची दखल घेत शासनाने नांदेड जिल्हयास उत्कृष्ट निधी संकलनासाठीचे स्मृतीचिन्ह प्रदान  केले आहे.  

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2019 साठी उत्कृष्ट संकलन करणाऱ्या जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुख कर्मचाऱ्यांसह संस्था तसेच दानशूर व्यक्तींना या कार्यक्रमात प्रशस्तीपत्रके व पुस्तक स्वरुप भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्यसाधून जिल्हयातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व विशेष गौरव पुरस्कार प्राप्त पाल्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. 

00000


 26 कोरोना बाधितांची भर तर 42 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 4 :- शुक्रवार 4 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 26 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 17 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 9 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 42 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या 1 हजार 54 अहवालापैकी 1 हजार 10 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 516 एवढी झाली असून यातील 19 हजार 436 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 336 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 550 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 12, हदगाव कोविड रुग्णालय 4, खाजगी रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 4, मुखेड कोविड रुग्णालय 5, बिलोली तालुक्यांतर्गत 2 असे एकूण 42 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.73 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 5, मुखेड तालुक्यात 10, भोकर 1, नायगाव 1 असे एकुण 17 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, मुखेड तालुक्यात 3, हदगाव 1 असे एकुण 9 बाधित आढळले.
जिल्ह्यात 336 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 36, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 33, मुखेड कोविड रुग्णालय 26, किनवट कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 75, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 116, खाजगी रुग्णालय 22 आहेत.
शुक्रवार 4 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 184, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 72 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 55 हजार 663
निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 30 हजार 993
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 516
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 436
एकूण मृत्यू संख्या- 550
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.73 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-623
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-336
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15.
आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
000000

 

बार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा

उत्तीर्ण उमेदवारांना पन्नास हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  अनूसूचित जातीचे जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण झाले आहेत. तसेच बार्टीच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकाचवेळी एकरकमी रक्कम 50 हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेकरिता जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळाला भेट देऊन पात्रतेचे स्वरुप तपासून, अर्ज डाऊनलोड करुन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्जामध्ये असलेल्या ई-मेलवर 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत असे, आवाहन बार्टीचे पुणे येथील महासंचालक, धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरिता युपीएससी दरवर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देते. संघ लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा-2020 दि.4 आक्टोंबर 2020 रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 23 ऑक्टोंबर 2020 रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. बार्टीचे पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यांची नोंद घ्यावी असेही आवाहन केले आहे.

00000

 

जिल्ह्यात एड्स दिनानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  जिल्ह्यात सुमारे 6 हजार 374ॲक्टीव्ह एचआयव्ही रुग्ण उपचार घेत आहेत. यात पुरुष 2 हजार 953, महिला 2 हजार 938 , टीजी 12, बालक 460 आदींचा समावेश आहे. यासर्व रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात असून त्यांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र देवून मोफत बस प्रवास, घरकुल, संजय गांधी निराधार योजना आदि सुविधांचा लाभ पोहचावा. यादृष्टीने एनजीओमार्फत विशेष प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

जागतिक एड्स दिनानिमित 1 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड, श्री. गरूगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रूग्णालय नांदेड अंतर्गत एचआयव्ही, एड्स जनजागरणासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जागतिक एड्स दिनानिमित जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जागतिक एकता आणि सामुहिक जबाबदारी याद्वारे आपण एचआयव्ही, एड्स विरूध्द जनजागृती करून एड्सचा धोका टाळु शकतो असे आवाहन केले आहे. 

यामध्ये सोशल मिडीया वरती एचआयव्हीची माहिती देणारे विविध व्हिडीओ प्रसारीत करण्यात आले. तसेच मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे कोविड 19 चे नियम पाळुन एचआयव्ही टेस्टींग शिबिर घेण्यात आले. याशिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मास्क डिझाईनिंग, जिआयएफ, मिम्स, सेल्फी विथ स्लोगन आदी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नेहरू युवा केंद्रातील युवा क्लबच्या माध्यमातुन जिल्ह्यातील वीस गावामध्ये एचआयव्ही,एड्स बद्दल जनजागरणाकरीता वॉल पेंटींग आणि पोस्टर प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

जिल्हा शल्य चिकित्सक यांनी यावर्षी गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी पहिल्या तिमाहात करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना आदेशित केले. गरोदर मातापासुन बाळाला होणाऱ्या एचआयव्हीचे प्रमाण शुन्यावर आणता येईल. जागतिक एड्स दिनानिमित एचआयव्हीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देवुन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रायवेट हॉस्पीटल (पीपीपी) ज्यांनी गरोदर मातासाठी उत्कृष्ट काम केले. त्यांना देखील प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देवुन गौरविण्यात आले .

00000



Thursday, December 3, 2020

 

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ

निवडणुकीत सतीष चव्हाण विजयी  

                                    

औरंगाबाद, दिनांक 04 (विमाका) :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीष चव्हाण विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जाहिर केले. सतीष चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ इतकी मते मिळाली.  एकूण मतदान २ लाख ४१ हजार ९०८ इतके झाले. त्यापैकी २३ हजार ९२ इतकी मते अवैध ठरली. उमेदवारांची नावे फेरी निहाय प्राप्त मते खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.

उमेदवाराचे नाव

पोस्टल मते

पहिली फेरी

दुसरी

फेरी

तिसरी

फेरी

चौथी

फेरी

पाचवी फेरी

एकूण

1.

सतीश भानुदासराव चव्हाण  

600

27250

26627

26739

26700

8722

116638

2.

बोराळकर शिरीष भास्करराव

286

11272

13989

14471

14287

4438

58743

3.

अब्दुल रऊफ अब्दुल रहिम मोहम्मद

3

93

102

97

94

22

411

4.

अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर

5

63

71

75

71

19

304

5.

कुणाल गौतम खरात

3

278

359

338

305

171

1454

6.

ढवळे सचिन राजाराम

23

2455

2716

2800

3070

638

11702

7.

प्रा.नागोराव काशीनाथराव पांचाळ

45

1889

2213

2256

2146

444

8993

8.

डॉ.रोहित शिवराम बोरकर

10

192

205

210

210

50

877

9.

शेख सलीम शेख इब्राहिम

0

26

26

18

19

5

94

10.

सचिन अशोक निकम

3

63

121

141

115

88

531


 

11.

ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर

0

8

7

8

10

3

36

12.

अशोक विठ्ठल सोनवणे

0

6

18

12

12

2

50

13.

आशिष अशोक देशमुख

0

62

51

71

60

20

264

14.

उत्तम बाबुराव बनसोडे

0

22

33

33

35

5

128

15.

काजी तसलीम निजामोद्दीन

0

24

34

12

11

1

82

16.

ॲड.गणेश नवनाथ करांडे

0

22

11

13

5

2

53

17.

घाडगे राणीताई रवींद्र

3

177

113

112

113

16

534

5

डोईफोडे कृष्णा दादाराव

1

4

7

7

9

2

30

19.

दिलीप हरिभाऊ घुगे

9

198

292

284

354

32

1169

20.

भारत आसाराम फुलारे

1

2

5

9

14

3

34

21.

ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे

1

17

11

13

11

3

56

22.

रमेश साहेबराव कदम

1

204

70

42

56

2

375

23.

रमेश शिवदास पोकळे

22

3478

1514

814

794

90

6712

24.

राम गंगाराम आत्राम

0

23

24

15

12

1

75

25.

वसंत संभाजी भालेराव

1

37

24

30

34

5

131

26.

डॉ.विलास गोवर्धन जगदाळे

0

14

21

30

31

10

106

27.

आयु डॉ.विलास बन्सीधर तांगडे पाटील

0

6

6

11

5

4

32

28.

विशाल उध्दव नांदरकर

2

3

3

6

7

3

24

29.

ॲड.शरद बहिणाजी कांबळे

1

16

19

15

15

3

69

30.

ॲड.शहादेव जानू भंडारे

0

4

6

3

1

1

15

31

ॲड.शिरिष मिलिंद कांबळे

3

103

99

92

90

15

402

32.

शेख समदानी चॉदसाब

1

15

23

20

13

1

73

33.

शेख हाज्जू हुसेन पटेल

0

10

14

56

31

5

116

34.

सिध्देश्वर आत्माराम मुंडे

19

2506

1797

1654

1812

265

8053

35.

संजय विठ्ठलराव तायडे

1

78

109

119

104

39

450

 

एकूण

1044

50620

50740

50626

50656

15130

218816

 

अवैध मते

29

5381

5260

5374

5344

1704

23092

 

एकूण

1073

56001

56000

56000

56000

16834

241908

****




केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...