Wednesday, April 1, 2020
मद्य
विक्रीचे दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद
नांदेड
दि. 1 :- आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम
142 (1) अन्वये संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी मद्य विक्री
अनुज्ञप्ती (सीएल-3), विदेशी मद्य व बिअरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-2,
एफएल-3 व एफएल-4), बिअर विक्री किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-बीआर-2), पॉपी-2
अनुज्ञप्त्या तसेच किरकोळ ताडी विक्री केंद्र (टिडी-1) अनुज्ञप्ती 31 मार्च 2020 पर्यंत
बंद ठेवण्याचा कालावधीत वाढवून मंगळवार 14 एप्रिल 2020 पर्यंत संपूर्ण दिवस बंद
ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले आहेत.
या
आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949
चे कलम 54 व 56 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात
नमूद केले आहे.
00000
कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
वृत्तपत्र छपाई, विक्री करणाऱ्या एजंट,
विक्रेता,
माध्यमांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत आदेश
नांदेड,
दि. 1 :- जिल्ह्यात वृत्तपत्र छपाई, विक्री
करणारे एजंट, विक्रेता, इलेक्ट्रॉनिक मिडिया या माध्यमांना कोरोना विषाणुंचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध करावयाच्या आवश्यक उपाय योजना / निर्देशाबाबत
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी
आदेश निर्गमीत केले आहेत.
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमीत करण्यात
आलेली अधिसुचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील
वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडीया व माध्यमांनी कोव्हीड -9 प्रतिबंध होण्याकामी
पुढील प्रमाणे उपाययोजना करण्याबाबत आदेशीत केले आहे.
वृत्तपत्रांचे वितरण करणारे एजंट, छपाई, विक्रेते व वाटप
करणारे लाईने बॉय यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून वितरीत करण्यात आलेले विहित
नमूद ओळखपत्र बाळगावेत तसेच वृत्तपत्र वितरण सकाळी 5 ते सकाळी 8 या कालावधीत
करावे. स्टॉल लाऊन वृत्तपत्र विक्रीस प्रतिबंध राहील. वृत्तपत्र छपाई व
वितरणांच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच एका ठिकाणी होणारी
गर्दी टाळण्याबाबत सर्वांना सुचना दयाव्यात. कार्यालयामध्ये स्वच्छता ठेवावी व
निर्जतुकीकरणाची फवारणी करावी. दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवण्यात
यावे. वृत्तपत्र वितरण कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करुन दयावेत.
सदर आदेश पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील तसेच यापूर्वी
जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश व परिपत्रके या
आदेशासह अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध भारतीय दंड
संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.
000000
Tuesday, March 31, 2020
‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी
कोविड-19’
पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर यांच्याकडून
प्रत्येकी 50 लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी
यांच्याकडे सुपूर्द
नांदेड दि. 31 :- आमदार स्थानिक विकास
कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघात “कोव्हिड 19” संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी तातडीच्या
उपाय योजना म्हणून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी 50 लाख
रुपयाचा धनादेश तसेच आमदार अमर राजुरकर यांनी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात
समान स्वरुपात वाटप करण्यासाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
माहूरगड श्री दत्तात्रय
संस्थांनकडून
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये
माहूरगड येथील श्री दत्तात्रय संस्थान शिखरचे अध्यक्ष तथा महंत मधुसूदन भारती गुरु अचूत भारती व विश्वस्त मंडळाच्यावतीने 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आला.
कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत
असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत
खाते क्रमांक 39239591720 आहे.
सढळ हाताने मदत करा
उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या
युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी-
कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन केले आहे.
खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
Chief Minister’s Relief Fund-COVID 19, Savings Bank Account number 39239591720, State Bank of India,Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023,Branch Code 00300, IFSC CODE- SBIN0000300 .
मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19,बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720,स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023,शाखा कोड 00300,आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
00000
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी
निधीबरोबर अन्नधान्याची मदत करा
पालकमंत्री अशोक चव्हाण
यांचे आवाहन
नांदेड,
दि. 31:- शिधापत्रिका असलेल्या किंवा नसलेल्या गरजूंना
धान्याची किट उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी
निधीबरोबर अन्न धान्याची मदत करावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
कोरोना संदर्भात बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार अमर राजूकर, उपमहापौर सतीश देशमुख-तरोडेकर,
स्थायी समितीचे सभापती अमित तहेरा, सभागृह
नेता विरेंद्रसिंग गाडीवाले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,
अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी
उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी शरद
मंडलिक, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, जिल्हा
शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, किशोर स्वामी, निलेश पावडे, विलास धबाले, शमीम
अब्दुला यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
स्वस्त धान्य दुकानावर काळाबाजार होणार नाही याची दक्षता
घ्यावी. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानाच्या बाहेर उपलब्ध असलेल्या धान्याचे फलक
लावावेत. स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना अन्नधान्य पुरवठा करीत असतांना त्याठिकाणी
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानावर नागरिकांची
गर्दी होणार नाही असे दूर अंतरावर (सोशल डिस्टन्स) ठेवण्याबाबतही पालकमंत्री अशोक
चव्हाण यांनी सांगितले.
00000
श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी
2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर
-
पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड,
दि. 31 :- येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी 2 कोटी 90 लाख
रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
“कोरोना”चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत
आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात
आली होती. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी
अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक
विजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,
जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता
चंद्रकांत मस्के, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश
कदम, डॉ. संजय कदम, डॉ. मानकर, डॉ.दिपक गोरे, उमेश कोळेकर, डॉ. राम बहिरवाड, डॉ. शशी गायकवाड, श्री खडकीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, इंडियन असोसिएशनच्या
अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी समन्वयाने चर्चा करुन सर्व प्रश्न तातडीने
सोडवावीत. अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी रहावे. इंडियन
मेडिकल असोसिएशनच्यावतीने अत्यावश्यक सेवेचे प्रश्न, अडी-अडचणीबाबत नांदेड जिल्हाधिकारी
यांच्याकडे सादर करण्याची सुचना दिली. कोरोना विषाणू संदर्भातील आरोग्य विभागातील
कंत्राटी पध्दतीची पदे तात्काळ भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. रुग्णालयात
रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता पोलीस
प्रशासनाने घ्यावी. नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहन
पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केले.
तालुकास्तरावर रक्तसाठा उपलब्ध व्हावा यासाठी येत्या काळात
सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून मास्क, वेंन्टिलिटर, औषधाची
अतिरिक्त मागणी कळवावी. डॉक्टरांना करोना आजारापासून
संरक्षण करणाऱ्या किट या उपलब्ध करून देण्यात याव्यात.
केंद्र सरकारने करोना आजारावर उपचार करणाऱ्या
हेल्थ केअर वर्करांसाठी 50
लाख रुपयाचा विमा जाहीर केला आहे. नांदेड इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने
आयसीयू मधील व्हेंटिलेटर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची उपलब्धता शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय व शासकीय दवाखाना शिवाजी पुतळा नांदेड येथे
करण्यात येणाऱ्या आयसीयूमध्ये सल्ल्यासाठी उपलब्धता राहील. त्यांच्या निगराणीखाली या
आयसीयूची बांधणी करण्यात येईल. यासाठी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची मदत करण्याचे आयएमए
नांदेडतर्फे जिल्हा प्रशासनास व आरोग्य विभागास सांगण्यात आले. कोरोना या आजारावर
लढ्यामध्ये जर शासकीय यंत्रणा व त्यातील हेल्थ केअर वर्कर्स यांना आयएमएच्या
डॉक्टरांनी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
जनतेला सुरक्षितपणे घरी रहा व अत्यंत
महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे आणि साबणाचा वापर हा कोरोना विषाणूचा
संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सोपा व स्वस्त असा उपाय आहे. त्याचा जास्तीतजास्त वापर
करावा, असे आवाहन
करण्यात आलेले आहे. बाहेरून घरी आल्यानंतर प्रत्येकांनी घरात प्रवेश करण्याअगोदर
आपले हात स्वच्छ धुऊन घेणे गरजचे आहे आणि हाताचा चेहऱ्यावर व डोळ्यांना स्पर्श होऊ
देवू नये, असेही आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
000000
आपत्कालीन सेवा : अधिकारी,
कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा
नांदेड, दि. 31 :- आपत्कालीन
कार्यात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करुन पास घेण्याची सुविधा नांदेड
जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केली आहे. https://covid19.mhpolice.in या लिंकवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
ई-पास E Pass ची सुविधा ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने
उपलब्ध करुन दिली असून अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सदर लिंकवर आपला पासपोर्ट साईजचा फोटो 200 केबी पर्यंत तसेच इतर कागदपत्रे 500 केबी पर्यंत अपलोड करावीत. पास वापरासंदर्भातील नियमावली फॉर्म भरण्यापूर्वी वेब लिंकवर दिसून येते. अर्ज केवळ इंग्रजी भाषेत स्वीकारला जाणार असून अर्ज भरल्यानंतर मंजूर अर्जाची प्रत डाउनलोड करावी. त्याची ऑनलाईन प्रत सर्वांना सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होऊ शकते. आपत्कालीन सेवा देणाऱ्यांसाठी ही सुविधा नांदेड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे.
उपलब्ध करुन दिली असून अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सदर लिंकवर आपला पासपोर्ट साईजचा फोटो 200 केबी पर्यंत तसेच इतर कागदपत्रे 500 केबी पर्यंत अपलोड करावीत. पास वापरासंदर्भातील नियमावली फॉर्म भरण्यापूर्वी वेब लिंकवर दिसून येते. अर्ज केवळ इंग्रजी भाषेत स्वीकारला जाणार असून अर्ज भरल्यानंतर मंजूर अर्जाची प्रत डाउनलोड करावी. त्याची ऑनलाईन प्रत सर्वांना सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होऊ शकते. आपत्कालीन सेवा देणाऱ्यांसाठी ही सुविधा नांदेड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे.
00000
Subscribe to:
Posts (Atom)
केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...
