कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी
निधीबरोबर अन्नधान्याची मदत करा
पालकमंत्री अशोक चव्हाण
यांचे आवाहन
नांदेड,
दि. 31:- शिधापत्रिका असलेल्या किंवा नसलेल्या गरजूंना
धान्याची किट उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी
निधीबरोबर अन्न धान्याची मदत करावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड
जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
कोरोना संदर्भात बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार अमर राजूकर, उपमहापौर सतीश देशमुख-तरोडेकर,
स्थायी समितीचे सभापती अमित तहेरा, सभागृह
नेता विरेंद्रसिंग गाडीवाले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,
अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी
उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी शरद
मंडलिक, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, जिल्हा
शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, किशोर स्वामी, निलेश पावडे, विलास धबाले, शमीम
अब्दुला यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
स्वस्त धान्य दुकानावर काळाबाजार होणार नाही याची दक्षता
घ्यावी. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानाच्या बाहेर उपलब्ध असलेल्या धान्याचे फलक
लावावेत. स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना अन्नधान्य पुरवठा करीत असतांना त्याठिकाणी
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानावर नागरिकांची
गर्दी होणार नाही असे दूर अंतरावर (सोशल डिस्टन्स) ठेवण्याबाबतही पालकमंत्री अशोक
चव्हाण यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment