Sunday, September 22, 2019


दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या परवान्यासाठी
अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड, दि. 22:- दिपावली उत्‍सव दिनांक 27 ऑक्टोंबर 2019 ते 29 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत साजरा होत आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महापालिका हद्दीतील तात्पुरते फटाका परवाना जिल्हादंडाधिकारी तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका विक्री परवाने देतील. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. इच्छुकांचे विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 23 सप्टेंबर, 2019 ते 07 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्‍याची अंतीम तारीख 07 ऑक्‍टोंबर 2019 आहे. तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात खाली नमुद कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत व जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनियम नुसार दिनांक 23 सप्टेंबर, 2019 ते 07 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.
तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात पुढील कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या  कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत.  नमुना AE-5 मधील अर्ज, परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण,साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 84 अन्‍वये सदर दुकानातील एकमेकापासून किमान अंतर 03 मीटर असावे तसेच संरक्षीत क्षेत्रापासूनचे अंतर 50 मीटर असणे आवश्‍यक आहे. सदर नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा तसेच नकाशा स्‍थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो.लायसन फीस रूपये 500/- चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिक रित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड/मुख्‍याधिकारी नगरपरिषद, नगरपंचायत / ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र.
जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा. नोंदणीकृत/मान्‍यताप्राप्‍त असोसिएशन मार्फत तात्‍पूरता फटाका परवानासाठी अर्ज केल्‍यास या कार्यालया मार्फत देण्‍यात येणा-या परवान्‍यातील नमूद ज्‍या अटी व शर्तीनूसार सबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल तसेच कोणत्‍याही विस्‍फोटक नियमांचे व परवान्‍यातील अटी व शर्तीचे उल्‍लंघन होवून कोणताही अनूचित प्रकार घडल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी सबंधित असोसिएशनची असेल या बाबत सबंधित असोसिएशन कडील शपथपत्र.दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील1.अग्निशमन दल 2.सुरक्षा रक्षक इ.इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.
अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनद्वारे फिस शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने दिनांक 12 ऑक्टोबर, 2019 व 14 ऑक्टोबर,2019 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍या मार्फत तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍या मार्फत निर्गमित केले जातील.   
            दिपावली सण-उत्‍सवाच्या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.
0000


Friday, September 20, 2019

बालशक्ती पुरस्कार, बालकल्याण पुरस्कार-2019 साठी
अर्ज स्वीकारण्याची 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
नांदेड दि. 20 :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो.
बालशक्ती पुरस्कार ज्या मुलांनी (वय पाचपेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
वैयक्तिक पुरस्कार मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवा उदात्त भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
संस्था स्तरावर बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
बाल शक्ती पुरस्कार 2019 व बालकल्याण पुरस्कार 2019 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत होती. आता ती दिनांक 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

Thursday, September 19, 2019


शासकीय अध्यापक महाविद्यालयात
मराठवाडा मुक्ती संग्राम, विद्यापीठ वर्धापण दिन साजरा
नांदेड, दि. 19 :- शासकीय अध्यापक महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन नुकताचा साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रगीत व विद्यापीठ ध्वज फडकावून विद्यापीठ गीत घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. रोडगे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास मांडला तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल घोनशेटवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. शाकेर, डॉ. शेख, डॉ. मुरुमकर, प्रा. राऊत, डॉ. राठोड, मु. लि. गच्चे, व. लि. जाधव, सर्वश्री हंबर्डे, सोनाळे, श्रीमती जाधव, श्रीमती राठोड, श्री. केंद्रे, श्रीमती होळकर आदी कर्मचारी उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मारोती अक्कलवाड यांनी केले. कार्यक्रमाला बी. एड. प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
00000



नवरात्र उत्सवात पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 19 :- जिल्ह्यात 19 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत नवरात्र उत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर दुर्गादेवी, शारदादेवीची स्थापना व विसर्जन करण्यात येते. त्याकरीता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणुन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2019 च्या मध्यरात्रीपर्यंत वरील कलमान्वये पुढील अधिकार प्रदान केला आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी वर्तवणूक किंवा वागणुक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी, उपासनेच्यावेळी, कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33, 35, 37 ते 40, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
कोणीही इसमांनी हा आदेश लागू असेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिर सभा, मोर्चे, मिरवणुक, निर्दशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्वपरवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावेत. सदर जाहीर सभा, मिरवणुक, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये.
हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत.
00000

Wednesday, September 18, 2019

जिद्दीचा ‘हातोडा’ :- शिक्षणासाठी जिद्दीचा ‘ हातोडा’ हाती घेतला की, लोखंडही ऐरणीवरच्या ठोक्याने वाकते, तसेच काही बोलके छायाचित्र दर्शविते. टेबल, खूर्ची, डिजीटलच्या जमान्यात शिक्षणासाठीची ही धडपड सर्व सांगून जाते. (छायाचित्र : विजय होकर्णे). 


उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन
नांदेड, दि. 18 :-मिटकॉन आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत उद्योगास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती व सर्वसाधारण घटकातील सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींसाठी ब्युटीपार्लर, फ्रीज आणि कुलर दुरुस्ती, पेपर व कॉटन बॅग मेकींग, केळी प्रक्रिया, रेडीमेट गारमेंटस, मोटार रिपेरिंग, दुचाकी दुरुस्ती, फ्रेब्रीकेशन, बेकरी, डेरी प्रॉडक्ट, फुड प्रोसेसिंग, ऑफसेट प्रिटींग, इलेक्ट्रीशीन आणि इलेक्ट्रीनिक होम अप्लासेस, मोबाईल रिपेरिंग, एसी व कुलर रिपेरिंग, मसाला मेकींग, हेअर टिटमेंट ॲड हारबल कॉस्मीक आदी आधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण प्रवेश किमान सातवी उत्तीर्ण. वय 18 ते 45 वर्षे. जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड, बॅक खाते असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाची निवड करताना अपंग महिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, सांसद ग्राम, आदर्श ग्राम, भुमीहीन शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुकांनी आवश्यक सर्व कागदपत्रे  मिटकॉन कार्यालय नांदेड येथे सादर करावीत. इच्छूक युवक व युवतींनी अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक मिटकॉन लि. नांदेड यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक मिटकॉन लि. नांदेड यांनी केले आहे.  
00000


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत
सन 2019-20 चे नवीन अर्ज करण्यासाठी आवाहन
नांदेड, दि. 18 :- सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी  शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न  बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी दि. 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णया अन्वये (शासन निर्णय क्र. बीसीएच2016/प्रक्र.293/शिक्षण-2 दि. 13/06/2018) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत लाभाचे स्वरुप अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. कंसाबाहेर खर्चाची बाब (कंसात नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था याठिकाणी  उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम) भोजन भत्ता (28 हजार रुपये), निवास भत्ता (15 हजार), निर्वाह भत्ता (8 हजार) प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम (51 हजार रुपये). या रक्कमेव्यतिरीक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. एकुण देय रक्कमेतुन भारत सरकार शिष्यवृत्तीअंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी  निकष पुढीलप्रमाणे राहतील. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. विद्यार्थी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांस इयत्ता 10वी/12वी/पदवी/पदवीकामध्ये किमान 50% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40% असेल. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेलली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक  असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी विशेष सवलत लागु राहणार नाही.

स्वाधार योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड येथे उपलब्ध असुन विद्यार्थ्यांने कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन घ्यावेत किंवा http://sjsa.maharashtra.gov.in किंवा http://maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड येथे स्वत: 31 ऑक्टोंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे राहतील. जातीचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा, आधारकार्डची प्रत, बँक पासबुक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र / फॉर्म नं.16, विद्यार्थी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, इयत्ता 11 वी 12 वी व पदवीचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टीफिकेट, विद्यार्थीनी विवाहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा, बँक खाते आधारक्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा. विद्यार्थ्यानी कोणत्याही शासकिय वसतिगृहात प्रवेश घेतल्या नसल्याचे शपथपत्र. स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रमाणपत्र.विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा इत्यादी). महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र. सत्र परिक्षेच्या निकालाची प्रत, इत्यादी कागदपत्रे.
विद्यार्थ्यांनी खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवुन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यावसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवुन गैरवापर केल्याचे निदर्शनास अल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले / आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...