Wednesday, September 18, 2019


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत
सन 2019-20 चे नव अर्ज करण्यासाठी आवाहन
नांदेड, दि. 18 :- सामाजिक न्याय  विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी  शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हण भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न  बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी दि. 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णया अन्वये (शासन निर्णय क्र. बीसीएच2016/प्रक्र.293/शिक्षण-2 दि. 13/06/2018) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेतर्गत लाभाचे स्वरुप अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. कंसाबाहेर खर्चाची बाब (कंसात नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था याठिकाणी  उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम) भोजन भत्ता (28 हजार रुपये), निवास भत्ता (15 हजार), निर्वाह भत्ता (8 हजार) प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम (51 हजार रुपये). या क्कमेव्यतिरीक्त वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. एकुण देय रक्कमेतुन भारत सरकार शिष्यवृत्तीअंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी  निकष पुढीलप्रमाणे राहतील. विद्यार्थी अनुसूचित जाती नवबौध्द या प्रवर्गातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. विद्यार्थी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांस इयत्ता 10वी/12वी/पदवी/पदवीकामध्ये किमान 50% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल गुणवत्तेची मर्यादा 40% असेल. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेलली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक  असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी विशेष सवलत लागु राहणार नाही.

स्वाधार योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड येथे उपलब्ध असुन विद्यार्थ्यांने कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन घ्यावेत किंवा http://sjsa.maharashtra.gov.in किंवा http://maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड येथे स्वत: 31 ऑक्टोंबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे राहतील. जातीचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा, आधारकार्डची प्रत, बँक पासबुक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र / फॉर्म नं.16, विद्यार्थी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, इयत्ता 11 वी 12 वी पदवीचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टीफिकेट, विद्यार्थीनी विवाहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा, बँक खाते आधारक्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा. विद्यार्थ्यानी कोणत्याही शासकिय वसतिगृहात प्रवेश घेतल्या नसल्याचे शपथपत्र. स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रमाणपत्र.विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा इत्यादी). महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र. सत्र परिक्षेच्या निकालाची प्रत, इत्यादी कागदपत्रे.
विद्यार्थ्यांनी खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवुन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण केल्यास अथवा करी व्यावसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवुन गैरवापर केल्याचे निदर्शनास अल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले / आवश्यक कागदपत्र सादर केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...