Wednesday, September 18, 2019

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या
योजनेतील शेतीपूरक व्यवसायांना राज्य सरकारची पतहमी
नांदेड, दि. 18 :-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जानाही राज्यसरकार पत हमी देणार आहे, राज्य सरकारने तसा निर्णय नुकताच घेतला आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांतर्गत बँकांकडून कर्ज घेताना लाभार्थ्याना तारण देणेकरीता अनेक अडचणी येत होत्या. त्यासंदर्भात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी  मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे अशी पत हमी देण्याची मागणी केली होती.
या अनुषंगाने राज्य सरकार मार्फत बँकांना 25 सप्टेंबर 2018 रोजी CREDIT GUARNTEE FUND FRUST FOR MICRO AND SMALL ENTERPRISES (CGTMSE) अंतर्गत घेतलेल्या कर्जावरील पत हमी देण्याकरीता मंजुरी प्रदान केली.
बँकामार्फत शेतीपूरक व्यवसायांकरीता कर्ज देताना अडचणी निर्माण केल्या जात होत्या. CGTMSE अंतर्गत शेतीपूरक व्यवसायासाठीच्या कर्जाला पतहमी देता येत नाही. यास CGFMU अंतर्गत अशा कर्जाला पतहमी देता येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारामुळे शेतीपुरक व्यवसायांसाठी देखील केंद्र सरकारमार्फत मुद्रा योजनेच्या धर्तीवरील CGTMSE CGFMU या दोन्ही पत हमीच्या योजना यापुढे महामंडळाच्या कर्जासाठी लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळामार्फत CGTMSECGFMU या दोन्हीही पत हमीच्या योजनांचे शुल्क (PREMIUM) बँकेत भरल्यावर त्याचा परतावा करणार असून, अशारितीने पत हीमी देण्यात येणार आहे. यासाठी शासनामार्फत 11 सप्टेंबर, 2019 रोजी पत्र निर्गमित करण्यात आले आहे.
आतापर्य राज्यामहामंडळाच्या योजनेचा लाभ 7 हजार 866 जणांना झालेला असून बँकामार्फत 400 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. याअनुषंगाने महामंडळाकडून 3 हजार 700 लाभार्थ्याना 10 कोटीचा व्याज परतावा केलेला असून उर्वरीत लाभार्थ्यांना व्याज परतावा देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. राज्यामध्ये मराठा समाजातील व्यावसायिक निर्माण होण्याच्या दृष्टीने यशस्वी पाऊले उचलण्यात येत आहेत. त्याचा लाभ राज्यातील तरुण वर्ग घेत आहेत.
राज्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या नवी योजनांचा जास्तीत-जास्त लाभ मराठा प्रवर्गातील तरुणांनी घेऊन त्यामधून उद्योजक व्हावे नोकरी मागणारे होता नोकरी देणारे व्हावे, असे मत  अध्यक्ष  नरेद्र पाटील यांनी व्यक्त केलआहे. महामंडळाच्या योजनांचा लाभ राज्यातील मराठा समाजातील जास्तीत-जास्त तरुणांपर्य पोहोचविण्यासाठी  अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आता पर्यं 20 जिल्हात संबंधी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयाच्या बँक प्रतिनिधी लाभार्थी यांच्या संयुक्त बैठका घेतल्या या कार्याला उत्तम प्रतिसाद प्राप्त होऊन राज्यामध्ये साडे सात हजार पेक्षा जास्त व्यावसायिक तयार झाले असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व जिल्हा समन्वयक यांनी दिली आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...