Monday, June 24, 2019


कर्नल सिंग यांच्या उपस्थितीत
माजी सैनिकांची  मेळावा संपन्न
नांदेड दि 24 :-   सीएसडी कॅन्टीन नांदेड येथे लवकर सुरु करण्यात येईल, असे ले कर्नल जे बी सिंग  यांनी  सांगितले. स्टेशन हेडक्वार्टर औरंगाबाद यांच्या कार्यालयाकडून नियुक्त  ले कर्नल जे बी  सिंग  यांच्या अध्यक्षतेखाली  माजी सैनिकांचा मेळावा नुकताच येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.   
यावेळी केंद्र सरकारच्या मंजूर योजनांची रक्कमबाबत वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.  ई सी एच एस चे मेजर थापा यांनी माजी सैनिकांना मेडीसीन व इतर सुविधा मुबलक प्रमाणात  उपलब्ध असल्याबाबत सांगितले. नांदेड जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सार्जेन्ट संजय पोतदार  यांनी  विविध मागण्यांवर चर्चा केली. अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेचे नांदेडचे अध्यक्ष व्यंकट देशमुख व सचिव रामराव थडके यांनी  ई सी एच एस मधील माजी सैनिकांच्या  समस्या, कर्मचारी नियुक्तबाबत मागणी  केली. 
माजी सैनिकांची व शहिद जवानांच्या  विरपत्नी यांना माहिती  देवून विविध योजना माजी सैनिकांपर्यंत पोहचवीत असल्याबाबत सांगितले. माजी सैनिकांच्या प्रलंबीत समस्या दुर करण्यासाठी व  केंद्र व राज्यशासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी असल्याचे सैनिक कार्यालयाचे कल्याण संघटक के. अे. शेटे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
या  मेळाव्यात माजी सैनिकांनी त्यांच्या लेखी मागण्या सादर केल्या.  मेळाव्यात जवळपासू  80 माजी सैनिक, विरनारी व अवलंबित उपस्थित होते.   सैनिक कार्यालयातर्फे मेळावा यशस्वी व उत्कृष्ट आयोजनासाठी सुभे मजीदवार, सुर्यंकांत कदम श्री गायकवड व श्री सुरेश टिपरसे यांनी  मेहनत घेतली. परभणी जिल्हयाचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांच्या कडे नांदेड सैनिक कल्याण अधिकारी यांचा अतिरीक्त कार्यभार असल्याने त्यांनी केन्द्राचे अधिकारी कर्नल जे बी सिंग व त्यांचे  इतर सहयोगी अधिकारी यांनी नांदेड येथे येवून मेळावा घेतला याबाबत आभार मानले.  
00000


सुधारीत वृत्त क्र. 400 
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी
25 जूनला निबंध व वक्तृत्व स्पर्धा
नांदेड दि. 24 - जिल्हास्तरीय सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समितीमार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त मंगळवार 25 जुन 2019 रोजी सकाळी 11 वा. जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या निबंध स्पर्धेचा विषय "राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक दृष्टीकोन" असून निबंध 1500 शब्दात लिहिणे आवश्यक आहे. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येईल. ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे त्यांनी मंगळवार 25 जुन 2019 रोजी सकाळी 11 वा. जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड येथे उपस्थित रहावे. तसेच मंगळवार 25 जून 2019 रोजी दुपारी 2 वा. "सामाजिक समता काळाची गरज" या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेत सर्व महाविद्यालयीन मुला-मुलींना भाग घेता येईल. या स्पर्धेतुन प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषीक व प्रमाणपत्र देण्यात येईल.
दोन्ही स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त भाग घ्यावा. स्पर्धेसाठी आपल्या महाविद्यालयाचे ओळखपत्र घेऊन स्वखर्चाने उपस्थित राहवे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
000000

Saturday, June 22, 2019


सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या
प्रशासक पॅनलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि 22 :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 77अ, 78, 78अ अन्वये जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थावर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनलबाबत अर्ज मागविण्यात येत आहेत.  
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77अ, 78, 78अ,) अन्वये जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थावर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (जी. डी. सी. ॲण्ड ए)/ उच्चतम सहकार पदविका (एच.डी. सी.) धारक, चाटर्ड अकाऊटंट (सी. ए.)/इन्सिटटयूट ऑफ वर्कस अकाऊटंट (आय. सी. डब्ल्यू. ए.)/ कंपनी सेक्रेटरी (सी. एस.), सहकार खात्यातील प्रशासन / लेखापरीक्षण विभागातील अधिकारी/कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकेमध्ये व्यवस्थापक यांचेकडून मागविण्यात येत आहेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.
अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग लातूर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर / उस्मानाबाद / बीड / नांदेड व लातूर विभागातील सर्व तालुका उपनिबंधक/सहायक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात दिनांक 27 जून, 2019 ते 31 ऑगस्ट, 2019 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. याबाबतची जाहीर सूचना या कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
00000


Friday, June 21, 2019

अल्पभाषिक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाउंडेशन वर्ग सुरु होणार




नांदेड दि 21 :- अल्पभाषिक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग सुरु होणार असून नांदेड जिल्ह्यातील सर्व अमराठी शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपले प्रस्ताव 25 जून 2019 पर्यंत शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) व्यंकटराव तरोडेकर चेंबर्स चैतन्यनगर नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.
अमराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मराठी भाषेवर प्रभुत्व प्राप्त व्हावे व त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात येण्यासाठी मदत व्हावी, केंद्रीय लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना पुरेशीसंधी उपलब्ध करुन देण्यासाठी व मराठी भाषेवर प्रभुत्व वाढावे यासाठी शासन निर्णयान्वये अमराठी शाळांमधील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनासाठी मराठी भाषा फाउंडेशन वर्ग 1 जुलै 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत सुरु करण्यात येणार आहेत. या वर्गास नमूद कालावधीत शिकविण्यासाठी मानसेवी शिक्षकांची मानधन तत्वावर नेमणूक करण्यात येणार आहे. सदर शिक्षक बीएड / एमएड अर्हताधारक असावा व इयत्ता आठवी ते दहावीच्या अमराठी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविण्यास सक्षम असावा.
यापुर्वी ज्या शाळांमध्ये मराठी भाषा फाउंडेशन वर्ग चालू आहेत अशा शाळांनी व नव्याने वर्ग सुरु करावयाचे आहेत अशा शाळांनी इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील अमराठी विद्यार्थ्यांची संख्या व मराठी भाषेचा मागील वर्षाचा निकाल पत्राची प्रत प्रस्तावासोबत जोडावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
000000



पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा

नांदेड दि 21 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 22 जून 2019 रोजी परभणी येथून दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. दुपारी 4 ते 5.30 वाजेपर्यंत नांदेड येथे विविध विमा केंद्रांना भेटी. सायं. 5.45 वा. नांदेड रेल्वेस्थानक येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000


पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा  

नांदेड दि 21 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 23 जून 2019 रोजी सकाळी 8.30 वा. परभणी येथून मोटारीने सकाळी 10 वा. नांदेड येथे आगमन व पिक विमा शेतकरी मदत केंद्र येथे उपस्थिती. सकाळी 11 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण करतील.
000000



…अन् मुख्यमंत्र्यांनी मुलींचे
म्हणने मान्य केले....!
नांदेड दि. 21 :- योग शिबिरातून प्रस्थान करताना माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी काही मुलां-मुलींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून दिली. श्रेयस मार्तडे यांच्या  स्मृती योगा ग्रुपच्या मुलां-मुलींचा हा संच होता. योगा प्रात्यक्षिकाची चांगली तयारी आणि त्याचा अनेक दिवसाचा सराव करुन या आम्ही योगाच्या प्रात्यक्षिकांची तयारी केली होती. आपण थांबा आणि आमचे सादरीकरण बघा असे समृध्दी कडगे, त्रिशा मारकोळे या मुलींनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील महत्वाच्या कार्यक्रमासाठी जाण्याचे थोडावेळ थांबवून या मुलींचे म्हणणे मान्य केले. मुख्यमंत्र्यांनी या मुलांना स्वत: स्टेजवर आणले. त्यांच्यासोबत फोटो काढले. तेंव्हा कुठे या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या मुलांनी अतिशय चापल्याने एकापेक्षा एक सरस योगा प्रात्यक्षिकं दाखवून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर रामदेवबाबा यांनी मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे जाहीर कौतूक केले.


केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...