Monday, March 20, 2017

दिव्यांग लाभार्थींना साहित्य खरेदी अनुदानाबाबत आवाहन 
नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात वय 18 वर्ष पूर्ण झालेल्या दिव्यांग व्यक्तींनी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या स्वउत्पन्नातील अपंगासाठी राखून ठेवलेल्या 3 टक्के अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खाती जमा करता यावे, यासाठी त्यांनी खरेदी केलेल्या साहित्य व उपकरणाबाबतची माहिती तात्काळ त्या-त्या तालुक्यांच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
याबाबतच्या प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्या लाभार्थ्यांनी तालुका पंचायत समिती मार्फत अर्ज दाखल केले आहेत व ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांनी 24 मार्च 2017 पुर्वी अर्जामध्ये नमूद केल्यानुसार साहित्य, उपकरणाची मागणी केल्याप्रमाणे नियोजन विभागाच्या 5 डिसेंबर 2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये संबंधित लाभार्थी यांनी खरेदी केलेल्या वस्तुची व सादर केलेल्या पावतीची शहानिशा करुन पूर्णपणे खातरजमा झाल्यावर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत सुनिश्चित केलेल्या अनुदानाची रक्कम जमा करण्यात यावी, असे सुचीत केले आहे.
त्याप्रमाणे लाभार्थी यांनी 30 हजार रुपयापर्यंतचे साहित्य, उपकरणाची खरेदी करुन त्याची खरेदी पावती विस्तार अधिकारी यांच्या मार्फत गटविकास अधिकारी तालुका पंचायत समिती यांचेकडे जमा करावी अन्यथा लाभार्थीं यांना सदर योजनेचा लाभ दिला जाणार नाही.  पात्र लाभार्थी यांची यादी तालुका पंचायत समिती यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानुसार योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी कळविले आहे.

0000000
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष
निवडीसाठी आज विशेषसभा
नांदेड दि. 20 :- नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाच्‍या निवडीसाठी मंगळवार 21 मार्च 2017 रोजी दुपारी 2 वा. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात विशेषसभा बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभागाने केले आहे. या निवडसभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सुरेश काकाणी काम पाहणार आहे.   
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात निवडणूक विभागाने म्हटले आहे की, नांदेड जिल्‍हयातील सर्व नवनिर्वाचित जिल्‍हा परिषद सदस्‍यांना मंगळवार 21 मार्च 2017 रोजी होणा-या जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष  पदाच्‍या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याबाबत संबंधित तहसिलदार यांच्या कळविण्यात आले आहे.  त्यानुसार जिल्‍हयातील सर्व नवनिर्वाचित सदस्यांना सूचित करण्‍यात येते  जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाच्‍या निवड प्रक्रियेसाठीची विशेषसभा मंगळवार 21 मार्च 2017 रोजी दु. 2.00 वा. जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृह येथे आयोजित केलेली आहे. या निवडीसाठी इच्छुकांना नामांकनपत्रे सकाळी दहा ते  दुपारी बारा या कालावधीत पिठासीन अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. याविशेषसभेस उपस्थित राहतांना सर्व नवनिर्वाचित जिल्‍हा परिषद सदस्‍यांनी निवडून आल्‍याचे प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहनही करण्‍यात आले आहे.

000000
डिजीटल प्रदानांतर्गत शुक्रवारी
नांदेडमध्ये ‘डिजीधन’ मेळावा
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ‘कॅशलेस’ प्रात्यक्षिकांची दालने
नांदेड दि. 20 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेअंतर्गत डिजीधन मेळावा शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात हा मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या पुर्वतयारीबाबत आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी बचत भवन येथे आढावा बैठक घेतली.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, कृषि विकास अधिकारी पंडितराव मोरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, यांच्यासह महापालिका, विविध बँकांचे, डिजिटल पेमेंटशी निगडीत संस्था आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डिजीधन मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम नियोजन भवनमध्ये होणार आहे. या मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत. त्यासाठी सुमारे पन्नासहून अधिक दालनांची उभारणी करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात दहा वाजता मेळाव्यात सहभागी दालनांचे उद्गाटन होईल. त्यानंतर दुपारच्या सत्रात साडे तीन वाजता मेळाव्यासाठी निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात भाग्यवान विजेत्याची (लकी ड्रॅा) काढण्यात येणार आहे. या विजेत्यांना मुख्य समारंभात सन्मानितही करण्यात येणार आहे.
 रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच डिजीटल व्यवहारांची माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांसाठी भाग्यवान बक्षीस विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत तसेच विविध डिजीटल प्रदान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या, मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी होणार आहेत.  याठिकाणी डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली जाणार आहे. मेळाव्यास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

Sunday, March 19, 2017

वृक्ष म्हणजे जीवन, त्यांना जीव लावा - मुनगंटीवार
बोंढार येथील जैव विविधता उद्यानास भेट ,
तुळशीच्या विविध प्रजातींचे जतन

नांदेड, दि. 10 :-  वृक्ष म्हणजे जीवन, त्यांना जीव लावला, तर ते सर्वच जिवांना प्राणवायू देतात. त्यासाठी वृक्षांच्या विविध प्रजातींचे जतन करणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे अर्थ व नियोजन तथा वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे व्यक्त केले. नांदेड शहराजवळील बोंढार गावाच्या शिवारातील सामाजिक वनीकरण विभागाच्या स्वर्गीय उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यानाची श्री. मुनगंटीवार यांनी पाहणी केली, तसेच येथील विविध प्रजातींच्या तुळशींच्या लागवडीच्या वाटीकेचेही उद्घाटन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.


याप्रसंगी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, औरंगाबाद वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक ए. एन. भोसले, नांदेडचे उपवनसंरक्षक सुजय डोडल, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपसंचालक सामाजीक वनीकरण सुर्यकांत मंकावार, सहायक संचालक शंकर बिलोलीकर, डी. एस. पवार, व्ही. एन. गायकवाड, विभागीय सर्वेक्षक मोहन कोसकेवार, कृष्णा पांडे,  लागवड अधिकारी के. वाय. शेख, जयश्री जाधव तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, डॅा. अजित गोपछडे, व्यंकटेश चाटे, चैतन्यबापू देशमुख, संजय कोडगे, प्रविण साले आदींची उपस्थिती होती.
            याप्रसंगी श्री. मुनगंटीवार यांनी अभिप्रायाद्वारे संदेश दिला. त्यात म्हटले आहे की, वृक्ष म्हणजे जीवन. वृक्षांना जीव लावला, तर ते सर्वच जीवांना प्राणवायू देतात. त्यामुळे वृक्षांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाने आपले वैशिष्ट्य जपले आहे. त्यामुळे ते जैवविविधतेने नटले आहे.
सुरवातीला श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्यानातील तुळशीच्या वाटीकेचे उद्घाटन झाले. तसेच विविध वृक्षांचेही रोपण करण्यात आले. तुळशी वाटीकेत पंढरपुरी, रानतुळस, कृष्ण तुळस, लवंगी तुळस, विष्णू तुळस, सरदार तुळस, कापुरी तुळस, वैजयंती तुळश, त्रिगुना तुळश अशा दहा प्रजातींच्या सुमारे 217 रोपांचे जतन करण्यात आले आहे. यातून या प्रजाती संवर्धीत करण्यात येणार आहे. श्री. मुनगंटीवार यांनी या प्रजातींचे वैशिष्ट्यही जाणून घेतले. मानगा बांबू निर्मिती प्रकल्पाचीही त्यांनी माहिती घेतली. रोपवाटिकेलाही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. वड, पिंपळ, कडूलिंब या देशी वृक्षाची लागवड वाढावी यासाठी त्यांच्या रोपनिर्मितीवर अधिक भर दयावा, असे निर्देशही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
सुमारे पंचवीस एकर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या जैव विविधता उद्यानात तेरा प्रकारची वने विकसित केली आहेत. तसेच 2.25 टीसीएम क्षमतेचे शेततळे, 80 मीटर्सचा माती नाला बांधही बांधण्यात आला आहे. उद्यानात आँक्सीजन वन, तसेच नक्षत्रवन तसेच विविध फळ, औषधी वनस्पती, सर्वधर्म वृक्ष वन आदीं वने समाविष्ट आहेत. विशेष प्रयत्नातून हे जैवविविधता उद्यान विकास आणि संवर्धनाच्या प्रयत्नालाही श्री. मुनगंटीवार यांनी दाद दिली.

0000000

Saturday, March 18, 2017

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 
युवोत्सव-2017 उत्साहात संपन्न
नांदेड दि. 18 :- येथील शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे वार्षिक स्नेहसंमेलन युवोत्सव-2017 उत्साहात संपन्न झाला. स्नेहसंमेलनाचे अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे व प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. मनोज बोरगांवकर यांचे हस्ते उद्घाटन झाले. यावेळी हुजूरसाहेब औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे प्राचार्य सरदार गुरुबचन सिंघ व उपप्राचार्य मनजितसिंग यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी प्राचार्य सी. व्ही. लहाडे हे होते.
          

  दोन दिवस चालणाऱ्या युवोत्सव- 2017 कार्यक्रमात भरगच्च कार्यक्रमाची आखणी विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली. रांगोळी, टेक्निकल प्रदर्शनाचे उद्घाटन करताना श्री. पाचंगे व प्रा. बोरगांवकर यांनी तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांतील सामाजिक बांधिलकीची जाणीव बघून कौतूक केले. जीवन आधार रक्तपेढीच्या मदतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती पुजन व गणपती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात प्रा. लोकमनवार यांनी संस्थेची माहिती तसेच विविध स्तरावर केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला. उद्घाटन भाषणात श्री. पाचंगे यांनी चांगल्या लेखकांची पुस्तके जीवनाला कलाटणी देणारी ठरतात , ती वाचा तसेच आयुष्यात एक चांगला नागरिक होणाऱ्या दृष्टीने प्रेरणादायी व्यक्तीमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याबद्दल आवाहन केले.  प्रा. कवी मनोज बोरगांवकर यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून यशस्वी होण्याचे सुत्र विद्यार्थ्यांसमोर सांगितली.
            अध्यक्षीय समारोपात संस्थेचे प्रभारी प्राचार्य सी. व्ही. लहाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व पटवून दिले. बक्षिस समारंभासाठी सहाय्यक अधिक्षक अभियंता ए. एच. पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी मोहन पवार हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य पी. डी. पोपळे हे होतो. प्राचार्य श्री. पोपळे यांनी बक्षिस विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शिक्षणाबरोबरच इतर कलागुणांना वाव स्नेहसंमेलनासारख्या कार्यक्रमातून मिळतो. म्हणूनच “युवोत्सवाचे” आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.  स्नेह संमेलनल प्रभारी म्हणून प्रा. डी. एम. लोकमनवार यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. ए. एन. पवार, डॉ. ए. डब्ल्यू. पावडे, प्रा. एस. पी. कुलकर्णी, प्रा. के. एस. कळसकर, प्रा. डॉ. एस. एस. चौधरी, प्रा. व्ही. बी. उष्केवार, प्रा. एस. एम. कंधारे, प्रा. व्ही. यु. दातीर, प्रा. एस. आर. मुधोळकर, प्रा. ए. टी. आढावे विद्यार्थी संसद सचिव श्रीकांत जोशी जिमखाना उपाध्यक्ष प्रा. ए. बी. दमकोंडवार, जिमखाना सचिव प्रदीप सेवलीकर यांनी स्नेहसंमेलन युवोत्सव यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती आर. के. देवशी, धनश्री लटपटे व ऋषीकेश अमलापुरे यांनी केले.

0000000
धर्माबाद आयटीआयमध्ये शिल्पनिदेशकांच्या
नेमणुकीसाठी 4 एप्रिल रोजी मुलाखती
नांदेड दि. 18 :-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे शिल्पकारागीर योजनेअंतर्गत शिल्पनिदेशकांचे पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात निव्वळ तासिका तत्वावर तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी नेमणूक करावयाची आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी मंगळवार 4 एप्रिल 2017 रोजी मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह सकाळी 11.30 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद यांनी केले आहे.  
ज्या व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाचे पद निव्वळ तासिका तत्वावर भरावयाची आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. यांत्रिक मोटार गाडी, यांत्रिक कृषित्र, अभियांत्रिकी चित्रकला निदेशक या व्यवसायाकरीता शैक्षणिक अर्हता ही संबंधित व्यवसायामधील मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणीत पदवी, पदविका व एक/दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी, एटीएस परीक्षा उत्तीर्ण व तीन वर्षाचा असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेशक, गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार अटी मान्य असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतरच तासिका तत्वारील नियुक्ती मिळेल.
या संस्थेस यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी मंगळवार 4 एप्रिल 2017 रोजी संस्थेत उपस्थित रहावे. तसेच त्यानंतर आलेल्या संबंधीत उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबादचे प्राचार्य यांनी सांगितले आहे.

000000
जलदौड स्पर्धेचे आज आयोजन
नांदेड दि. 18 :- जलसंपदा विभागामार्फत गुरुवार 16 ते बुधवार 22 मार्च 2017 कालावधीत राज्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याअनुषंगाने रविवार 19 मार्च 2017 रोजी  सकाळी 6.30 वा. आयटीआय चौक-शिवाजीनगर ते  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जलदौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या जलदौडमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता लेंडी प्रकल्प विभाग देगलूर यांनी केले आहे. 
या स्पर्धेत वय 25 वर्षे व 25 वर्षापुढील वयोगट असे दोन गट करण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातून प्रथम व द्वितीय विजेता घोषित करण्यात येणार असून विजेत्यांना सन्मानपत्र, रोख बक्षिस देण्यात येणार आहे. 

0000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...