शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
युवोत्सव-2017 उत्साहात संपन्न
नांदेड दि. 18 :- येथील शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे वार्षिक स्नेहसंमेलन युवोत्सव-2017 उत्साहात संपन्न झाला. स्नेहसंमेलनाचे अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे व प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. मनोज बोरगांवकर यांचे हस्ते उद्घाटन झाले. यावेळी हुजूरसाहेब औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे प्राचार्य सरदार गुरुबचन
सिंघ व उपप्राचार्य मनजितसिंग यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रभारी प्राचार्य सी. व्ही. लहाडे हे होते.
दोन दिवस चालणाऱ्या युवोत्सव- 2017 कार्यक्रमात भरगच्च कार्यक्रमाची आखणी विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली. रांगोळी, टेक्निकल प्रदर्शनाचे उद्घाटन करताना श्री. पाचंगे व प्रा. बोरगांवकर यांनी तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांतील सामाजिक बांधिलकीची जाणीव बघून कौतूक केले. जीवन आधार रक्तपेढीच्या मदतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती पुजन व गणपती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविकात प्रा. लोकमनवार यांनी संस्थेची माहिती तसेच विविध स्तरावर केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला. उद्घाटन भाषणात श्री. पाचंगे यांनी चांगल्या लेखकांची पुस्तके जीवनाला कलाटणी देणारी ठरतात
, ती वाचा तसेच आयुष्यात एक चांगला नागरिक होणाऱ्या दृष्टीने प्रेरणादायी व्यक्तीमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याबद्दल आवाहन केले. प्रा. कवी मनोज बोरगांवकर यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून यशस्वी होण्याचे सुत्र विद्यार्थ्यांसमोर सांगितली.
0000000
No comments:
Post a Comment