Saturday, September 24, 2016

जिल्ह्यात हंगामात 97.68 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 13.87 मि.मी. 

           नांदेड, दि. 25 :- जिल्ह्यात  रविवार 25 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 221.89 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 13.87 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 933.41 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-133.75, अर्धापूर-112.93, भोकर-110.87, नांदेड-110.79, कंधार-104.80, हदगाव-103.88, मुखेड-102.41, बिलोली- 101.95, नायगाव-96.88, माहूर-92.78, हिमायतनगर-89.36, धर्माबाद-89.05, मुदखेड-87.56, उमरी-82.62, देगलूर-81.34, किनवट-75.66. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  97.68 इतकी झाली आहे.     
जिल्ह्यात रविवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड-13.13 (1010.27), मुदखेड- 15.00 (747.35), अर्धापूर-10.67 (982.00) , भोकर-11.25 (1104.75), उमरी-17.67 (823.27), कंधार-12.00 (845.31), लोहा-10.50 (1114.50), किनवट-11.57 (938.17), माहूर-24.75 (1150.50), हदगाव-24.43 (1015.26), हिमायतनगर-18.00 (873.31), देगलूर-13.50 (732.34), बिलोली-11.80 (987.00), धर्माबाद-7.33 (815.38), नायगाव-11.00 (887.00), मुखेड-9.29 (908.14) आज  अखेर  पावसाची सरासरी 933.41  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 14934.55) मिलीमीटर आहे. 

 00000
      दि. 24 सप्टेंबर 2016
* पूर नियंत्रण कक्ष नांदेड (दूरध्वनी क्र. 02462-263870)
·       डिग्रस बंधाऱ्यातून विसर्ग सुरु.
·       विष्णुपुरीतील पाणीसाठा 87.50 टक्क्यांवर.
·       विष्णुपुरीचे सहा दरवाजे खुले, 2 हजार 532 क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु.
·        लिंबोटी अप्पर मनार पूर्ण भरल्याने 3 दरवाजे खुले.
·       बारुळ लोअर मनारमध्ये पाण्याची आवक सुरु, साठा 37.22 टक्क्यांवर.

·       अणदुरा बॅरेज पूर्ण क्षमतेने भरले. 
जिल्ह्यात हंगामात 96.23 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 50.08 मि.मी. 
           नांदेड, दि. 24 :- जिल्ह्यात  शनिवार 24 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 801.21 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 50.08 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 919.54 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा-132.49, अर्धापूर-111.70, भोकर-109.75, नांदेड-109.35, कंधार-103.31, हदगाव-101.38, मुखेड-101.36, बिलोली- 100.73, नायगाव-95.67, माहूर-90.79, धर्माबाद- 88.25, हिमायतनगर-87.52, मुदखेड-85.80, उमरी-80.85, देगलूर-79.84, किनवट-74.73. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  96.23 इतकी झाली आहे.     
जिल्ह्यात शनिवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड-35.50 (997.14), मुदखेड- 41.33 (732.35), अर्धापूर-42.00 (971.33) , भोकर-38.00 (1093.50), उमरी-55.33 (805.60), कंधार-71.83 (833.31), लोहा-73.00 (1104.00), किनवट-25.14 (926.60), माहूर-12.25 (1125.75), हदगाव-25.71 (990.83), हिमायतनगर-10.00 (855.31), देगलूर-61.83 (718.84), बिलोली-83.60 (975.20), धर्माबाद-74.00 (808.05), नायगाव-81.40 (876.00), मुखेड-70.29 (898.85) आज  अखेर  पावसाची सरासरी 919.54  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 14712.66) मिलीमीटर आहे. 

00000
जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे आवाहन
माहिती, मदतीसाठी नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा
   नांदेड, दि. 24 :- जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे काही नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्गही सुरु झाला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील नदीकाठच्या रहिवाश्यांनी सतर्क रहावे. सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी.  नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरुन न जाता अडचणींबाबत व मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  सुरेश काकाणी  यांच्यावतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने केले आहे.
संततधार पावसामुळे  जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होऊन काही  छोट्या-मोठ्या नदी, नाल्यांना पूर आला आहे. सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ता खचून जाणे, पूल वाहून जाणे, दरडी कोसळून अपघात होणे, रस्ता निसरडा झाल्याने वाहनांचे अपघात होणे, धबधबे आदी पाणीसाठ्यांच्या ठिकाणी बुडून अपघात होणे, असे प्रकार संभवतात. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक बाबींसाठीच  प्रवासाची  जोखीम  घ्यावी. त्यामध्येही सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. पूररेषेतील तसेच यापुर्वी सखल भागात पाणी शिरुन किंवा साचून बिकट परिस्थिती उद्भवणाऱ्या परिसरातील जोखीमीबाबत  नारिकांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी संबंधित यंत्रणांच्या सूचना, इशाऱ्यांचे पालन करावे.

अत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02462-235077, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, महानगरपालिका नियंत्रण कक्ष- 02462 234461, पोलीस नियंत्रण कक्ष- 02462 234720, आरोग्य विभाग- 02462 236699, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 108. याशिवाय आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल, असेही  निवासी  उपजिल्हाधिकारी  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी जयराज कारभारी यांनी कळवले आहे. 

Friday, September 23, 2016

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे
26 सप्टेंबर पासून आयोजन
नांदेड दि. 23 :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नांदेड व जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यात उद्योग व्यवसाय सुरु करणाऱ्या युवक व युवतींसाठी सोमवार 26 सप्टेंबर 2016 पासून उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किमान 18 ते 50 वर्ष वायोगटातील  युवक-युवती, महिलांनी प्रवेश व अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक रमेश बहादुरे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उद्योग भवन  शिवाजीनगर नांदेड  येथे संपर्क साधावा, असे आवाहन  नांदेड एमसीईडीचे  प्रकल्प शंकर पवार यांनी केले आहे.   
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यामातून जिल्ह्यात मोठे उद्योजक निर्माण करण्याचे काम करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात अन्न, फळ प्रक्रिया उद्योग व संधी यामध्ये दालमिल, ऑईलमिल, सोयाबीन प्रक्रिया उद्योग, केळी प्रक्रिया उद्योग, कांदा प्रक्रिया, आद्रक प्रक्रिया, हळद प्रक्रिया उद्योग, मिरची प्रक्रिया, गुळ उद्योग, मशरूम उद्योग, टमाटा प्रक्रिया, आलू प्रक्रिया, बेकरी उत्पादने पापड उद्योग ,लोणचे उद्योग, इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  तसेच प्लास्टिक उद्योग,  इलक्ट्रिकल उद्योग, एलईडी, सोलार एनर्जी, लेदर इंडस्ट्रीज, गारमेंट इंडस्ट्रीज याबाबत ही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
              याशिवाय  उद्योजकीय गुण, संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, उद्योग व्यवस्थापन, मार्केट सर्वे, उद्योगसंधी,  शासकिय-निमशासकिय व इतर महामंडळच्या कर्ज योजना,  बँकेची भुमिका,  प्रकल्प अहवाल, सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण,  कारखाना भेट, उद्योग नोंदणी,   इत्यादीबाबत  मार्गदर्शन करण्यात येणार आहे. किमान 18 ते 50 वर्ष वायोगातील   युवक-युवती,  महिलांनी प्रवेश व अधिक माहितीसाठी  कार्यक्रम आयोजक  रमेश बहादुरे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उद्योग भवन  शिवाजीनगर नांदेड  येथे संपर्क साधावा, असे आवाहन  नांदेड एमसीईडीचे प्रकल्प  शंकर पवार यांनी केले आहे.

000000
महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणासाठी
अर्ज करण्याचे एमसीईडीचे आवाहन
नांदेड दि. 23 :- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली (डी.एस.टी.), भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद पुरस्कृत, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.), जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा अग्रणी बँक यांच्या सहकार्याने महिलांकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 29 सप्टेंबर पासून करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सोमवार 26 सप्टेंबर 2016 आहे. गरजू बेरोजगार महिला युवतीनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमसीईडी प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी केले आहे.  
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी 30 दिवस असून प्रशिक्षण कार्यक्रमात अन्न व फळ प्रक्रिया उद्योग, कृषिमाल प्रक्रिया उद्योग, रासायनिक उद्योग, औषध निर्मिती उद्योग, सौदर्य प्रसादान निर्मिती उद्योग, वस्त्रोद्योग, लेदर उद्योग (शाळेची बॅग  व पर्स ) उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.    
     या कार्यक्रमात विविध उद्योग संधी बाबद मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, बाजारपेठ पाहणी तंत्र,  शासनाच्या विविध कर्ज योजना, प्रकल्प अहवाल इत्यादी बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मुलाखती घेऊन पात्र व्यक्तीची निवड करण्यात येईल. प्रशिक्षण नियमितपणे उपस्थित राहून पूर्ण केल्यानंतर शासन नियमाप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येईल.
         किमान 18 ते 35 वर्ष वयोगटातील विज्ञान शाखेतील, अभियांत्रिकी शाखेतील डिग्री, डिप्लोमाधारक युवती व महिलांनी प्रवेश, अधिक माहितीसाठी रमेश बहादुरे कार्यक्रम समन्वयक संपर्क, एम.सी.ई.डी उद्योग भवन शिवाजी नगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असेही आवाहन प्रकल्प अधिकारी पवार यांनी केले आहे.

0000000
प्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर पंचत्त्वात विलीन
नांदेड, दि. 23:-   जेष्ठ  शिक्षणतज्ञ, स्वातंत्र्य सेनानी, राज्यसभेचे माजी खासदार प्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर यांचे गुरुवार 22 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 10.30 च्या दरम्यान येथे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर व नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप  म्हैसेकर यांचे ते वडील होत. राज्यपाल चे. विद्यासागर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी प्राचार्य डॅा. म्हैसेकर यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना प्रकट केली असून, संदेशाद्वारे आदरांजलीही वाहिली आहे.  
प्राचार्य डॅा. म्हैसेकर यांच्या पार्थिवावर येथील गोवर्धनघाट स्मशामनभुमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सुभाष साबणे, तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, संस्था, संघटनांचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. राज्यपाल चे. विद्यासागर यांच्या तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शोकसंदेशांचेही वाचन करण्यात आले. राज्यपाल महोदयांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तत्पुर्वी जिल्हाधिकारी  सुरेश काकाणी यांनी म्हैसेकर  यांच्या  निवासस्थानी  पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली  वाहिली  तसेच म्हैसेकर कुटुंबियांचे सांत्वनही केले.
मराठवाड्याच्या प्रागतीक वाटचालीसाठी ध्येयासक्त असणाऱ्यांमध्ये ज्या लोकांनी महत्वाची कामगिरी बजावली त्यांच्यापैकी डॉ. गो. रा. म्हैसेकर एक होते. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यानी ऊल्लेखनीय कामगिरी बजावली. 1976 ते 1982 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. राज्य नियोजन समीती , राज्य तांत्रिक शिक्षण मुल्यमापन समिती, पंचायतराज मुल्यमापन समिती, राज्य एनसीसी कमिटी, ग्रामीण रोजगार हमी योजना- पागे समिती यामध्येही त्यांनी काम केले होते. मराठवाडा विकास परिषद व जनता विकास परिषदेचे ते संस्थापक सदस्य होते. नेरली येथे कुष्ठधाम उभारणीत मोलाचा वाटा होता. महाराष्ट्र शिक्षण सल्लागार मंडळ, शिक्षण संशोधन परिषदेवरही प्राचार्य डॅा. म्हैसेकर यांनी काम केले होते.
गोवर्धनघाट स्मशानभुमी येथे झालेल्या शोकसभेत उपस्थित  विविध  संस्था, संघटनांचे पदाधिकारी, नागरीक आदींनी आदरांजली वाहिली.

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...