प्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर पंचत्त्वात विलीन
नांदेड, दि. 23:- जेष्ठ
शिक्षणतज्ञ, स्वातंत्र्य सेनानी, राज्यसभेचे माजी खासदार
प्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर यांचे गुरुवार 22 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 10.30 च्या दरम्यान येथे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. नागपूर सुधार प्रन्यासचे
अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर व नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.
दिलीप म्हैसेकर यांचे ते वडील होत.
राज्यपाल चे. विद्यासागर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री तथा
पालकमंत्री दिवाकर रावते यांनी प्राचार्य डॅा. म्हैसेकर यांच्या निधनाबद्दल
शोकसंवेदना प्रकट केली असून, संदेशाद्वारे आदरांजलीही वाहिली आहे.
प्राचार्य डॅा. म्हैसेकर
यांच्या पार्थिवावर येथील गोवर्धनघाट स्मशामनभुमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात
आले. यावेळी आमदार सुभाष साबणे, तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रातील
मान्यवर व्यक्ती,
संस्था, संघटनांचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. राज्यपाल चे.
विद्यासागर यांच्या तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शोकसंदेशांचेही वाचन
करण्यात आले. राज्यपाल महोदयांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी
पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तत्पुर्वी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी म्हैसेकर यांच्या निवासस्थानी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली तसेच
म्हैसेकर कुटुंबियांचे सांत्वनही केले.
मराठवाड्याच्या प्रागतीक
वाटचालीसाठी ध्येयासक्त असणाऱ्यांमध्ये ज्या लोकांनी महत्वाची कामगिरी बजावली
त्यांच्यापैकी डॉ. गो. रा. म्हैसेकर एक होते. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
म्हणून त्यानी ऊल्लेखनीय कामगिरी बजावली. 1976
ते 1982 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. राज्य
नियोजन समीती , राज्य तांत्रिक
शिक्षण मुल्यमापन समिती, पंचायतराज
मुल्यमापन समिती, राज्य एनसीसी कमिटी, ग्रामीण रोजगार हमी योजना- पागे समिती यामध्येही
त्यांनी काम केले होते. मराठवाडा विकास परिषद व जनता विकास परिषदेचे ते संस्थापक
सदस्य होते. नेरली येथे कुष्ठधाम उभारणीत मोलाचा वाटा होता. महाराष्ट्र शिक्षण सल्लागार
मंडळ, शिक्षण संशोधन परिषदेवरही प्राचार्य
डॅा. म्हैसेकर यांनी काम केले होते.
गोवर्धनघाट स्मशानभुमी
येथे झालेल्या शोकसभेत उपस्थित विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, नागरीक आदींनी आदरांजली
वाहिली.
000000
No comments:
Post a Comment