प्रसिद्धी पत्रक राजभवन, मुंबई
दि. 23 सप्टेंबर 2016
गो. रा. म्हैसेकर यांच्या
निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख
राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, माजी कुलगुरू, राज्यसभा सदस्य
प्राचार्य डॉ. गोविंद रामचंद्र म्हैसेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त
केले आहे.
डॉ. गो. रा. म्हैसेकर थोर शिक्षक, प्रशासक आणि आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे एक सुहृद व्यक्ती होते. गरीब
विद्यार्थ्यांना व उपेक्षितांना उच्च शिक्षणाची दारे खुली व्हावी याकरिता त्यांनी
अथक प्रयत्न केले. यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा सदस्य तसेच इतर जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी मराठवाड्याच्या
सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. डॉ. म्हैसेकर माझे गुरु होते.
त्यांच्या निधनाबद्दल मी सरांच्या स्मृतीला अभिवादन करतो, तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपालांनी चेन्नई येथून पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.
(राज्यपालांकडे तामिळनाडूच्या राज्यपाल पदाचा देखील अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे
ते सध्या चेन्नई येथे आहेत.)
000000
No comments:
Post a Comment