मराठवाड्यात शैक्षणिक
चळवळीत महत्वाचे योगदान देणाऱ्या
ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञास
मराठवाडा मुकला : पालकमंत्री दिवाकर रावते
संबंध मराठवाड्यात शैक्षणिक चळवळीत महत्वाचे योगदान
देणाऱ्या एका जेष्ठ शिक्षण तज्ज्ञास मराठवाडा मुकला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात
त्यांनी दिलेले योगदान त्याचप्रमाणे राज्यसभेत काम करीत असताना त्यांनी शैक्षणिक चळवळीला
दिलेले महत्व, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देत असतानाच
त्यांच्या शिक्षणाबद्दल कणव असलेल्या म्हैसेकरांनी अनेक विद्यार्थी घडविले. प्राचार्य
म्हणून जी शिस्त त्यांनी अंगिकारली तसेच विद्यार्थ्यांना देखील शिस्तीचे धडे दिले.
मराठवाडा जनता विकास परिषद त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समित्यांवर काम करीत असताना त्यांनी
दिलेले योगदान मराठवाडा विसरु शकणार नाही. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील मोठी
पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पेलण्याची ईश्वर शक्ती देवो
, या शब्दात नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कै.
डॉ. गो. रा. म्हैसेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे व त्यांना भावपूर्ण
श्रद्धांजली अर्पण केली आहे.
0000000
No comments:
Post a Comment