मराठवाड्याच्या
विकासाचा ध्यास असणारे
ध्येयवादी
व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री
मुंबई, दि.
23 :
माजी कुलगुरू डॉ. गो. रा. म्हैसेकर यांच्या निधनाने शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे एक
थोर शिक्षणतज्ज्ञ आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे ध्येयवादी व्यक्तिमत्त्व
आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री
आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. म्हैसेकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. शिक्षण,
समाजकारण, ग्रामविकास, आरोग्य अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला अमीट
ठसा उमटविला होता. विशेषतः
मराठवाड्याच्या विकासाचा अखेरपर्यंत त्यांना ध्यास होता.
देशातील शिक्षण व्यवस्थेतील बदलाबाबत केंद्र सरकारचे लक्ष वेधून या क्षेत्रातील
विविध प्रश्न सोडविण्यात त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. राज्य नियोजन समिती, राज्य तांत्रिक शिक्षण मुल्यमापन समिती, पंचायत राज मुल्यमापन समिती, रोजगार हमी योजनेबाबतची समिती अशा विविध समित्यांसह
मराठवाडा विकास परिषद व जनता विकास परिषदेच्या माध्यमातून मराठवाड्याचे मागासलेपण
दूर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत त्यांचा मोठा वाटा होता.
…………………………………..…………………………………..
No comments:
Post a Comment