Thursday, April 29, 2021

 

 1 हजार 293 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 816 व्यक्ती कोरोना बाधित

 24 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 320 अहवालापैकी 816 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 629 तर अँटिजेन तपासणीद्वारे 187 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 79  हजार 517  एवढी झाली असून यातील 66  हजार  307  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  11  हजार  416 रुग्ण उपचार घेत असून 187 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 28 ते 29 एप्रिल या दोन दिवसांच्या कालावधीत 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 531 एवढी झाली आहे. दिनांक 28 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे नायगाव येथील 45 वर्षाची महिला, बिलोली तालुक्यातील लागुल येथील 38 वर्षाचा पुरुष, मुखेड येथील अनुक्रमे 71 व 33 वर्षाचा पुरुष, किनवट येथील 40 वर्षाचा पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 77 वर्षाचा पुरुष,इतवारा नांदेड येथील 50 वर्षाची महिला, विष्णुपुरी नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, तरोडा नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, कंधार तालुक्यातील फुलवळ येथील 57 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे हदगाव येथील 45 वर्षाचा पुरुष, मुखेड तालुक्यातील सारस येथील 37 वर्षाची महिला, नायगाव येथील 65 वर्षाची महिला, खाजी मोहल्ला अर्धापूर येथील 65 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील दगडगाव येथील 57 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे मुखेड तालुक्यातील येवती येथील 58 वर्षाची महिला, होट्टल बेस देगलूर येथे 62 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे किनवट तालुक्यतील वाडोली येथील 55 वर्षाची महिला, किनवट तालुक्यातील पिंपरुोडी येथील 57 वर्षाची महिला, आधार रुग्णालय येथे नवी आबादी ढोकी नांदेड येथील 62 वर्षाचा पुरुष मेडीकेअर आणि क्रिटीकल केअर सेटर रुग्णालय लोहा येथे लोहा तालुक्यातील पोकरभोसी येथील 60 वर्षाची महिला दि. 29 एप्रिल 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे भोकर तालुक्यातील दिवशी येथील 60 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुगणालय येथे सिध्दार्थ नगर देगलूर येथील 71 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.38 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 279, बिलोली 37, हिमायतनगर 10,उमरी 38, हिंगोली 10, औरंगाबाद 1, नांदेड ग्रामीण 22, देगलूर 27, कंधार 22, मुदखेड 22, परभणी 6, अमरावती 1, अर्धापूर 8, धर्माबाद 36, किनवट 6, मुखेड 18, यवतमाळ 4, भोकर 13, हदगाव 14, लोहा 25, नायगाव 26, लातूर 4  असे एकूण 629 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 41, बिलोली 2, माहूर 6, हिमायतनगर 4, कंधार 17, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 6, देगलूर 13, मुदखेड 9, मुखेड 5, हिंगोली 7, लातूर 1, अर्धापूर 3, धर्माबाद 27, किनवट 13, नायगाव 9, परभणी 3, सोलापूर 1, भोकर 3, हदगाव 5, लोहा4, उमरी 3, बोधन 2, पुणे 1  व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 187 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 293 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 20, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 837, धमार्बाद तालुक्यातंर्गत 11, देगलूर कोविड रुग्णालय 4, अर्धापूर तालुक्यातंर्गत 19, उमरी तालुक्यातंर्गत 54, मालेगाव टीसूयु कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 28, मुखेड कोविड रुग्णालय 25, मुदखेड कोविड रुग्णालय 3, , किनवट कोविड रुग्णालय 46, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 11, नायगाव तालुक्यातर्गत 3, खाजगी रुग्णालय 118, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 13, हदगाव कोविड रुग्णालय 10, कंधार तालुक्यातंर्गत 11, माहूर तालुक्यातंर्गत 10, लोहा तालुक्यातंर्गत 61, मांडवी कोविड केअर सेंटर 8  बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 11 हजार 416 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 185, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 91, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 164, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 92, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 124, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 116, देगलूर कोविड रुग्णालय 46, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 44, बिलोली कोविड केअर सेंटर 75, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, नायगाव कोविड केअर सेंटर 32, उमरी कोविड केअर सेंटर 32, माहूर कोविड केअर सेंटर 22, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 58, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 60, कंधार कोविड केअर सेंटर 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर 75 , मुदखेड कोविड केअर सेंटर 15, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, बारड कोविड केअर सेंटर 10, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 4, मांडवी कोविड केअर सेंटर 5, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 41, एनआरआय कोविड केअर सेंटर 90, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 33 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 4 हजार 911, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 3 हजार 48 , खाजगी रुग्णालय 2 हजार 3, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 11 हजार 416 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 34 खाटा उपलब्ध आहेत.

 

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 57 हजार 890

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 69 हजार 121

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 79 हजार 517

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 66 हजार 307

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 531

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-28

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-89

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-404

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 11 हजार 416

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-187

0000

Wednesday, April 28, 2021

सिटीस्कॅनचा स्कोअर बरोबर पंचवीसवर आत्मविश्वास व डॉक्टराचे प्रयत्नातून 65 वर्षाचा वयोवृध्द कोरोनातून बाहेर

                                सिटीस्कॅनचा स्कोअर बरोबर पंचवीसवर

आत्मविश्वास व डॉक्टराचे प्रयत्नातून 65 वर्षाचा वयोवृध्द कोरोनातून बाहेर

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- लोहा तालुक्यातील जोमेगाव या लहानश्या गावातील सुमारे 65 वर्षाचे कोंडजी शिंदे हे शेतकरी. भौतिक सुविधा व आजच्या जगात हाती असलेल्या मोबाईलपासून कोसोदूर.  उगवत्या सुर्याला नमस्कार घालायचा आणि शेतीच्या कामात स्वत:ला दिवसभर झोकून द्यायचे असा या बाबाचा शिरस्ता. पंधरा दिवसापूर्वी  त्यांना त्रास व्हायला लागला. तपासण्या झाल्या. सिटीस्कॅनचा स्कोअर थेट पंचवीसवर.जवळच्या नातलगांनी त्यांना उचलून नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील कोविड रुग्णालयात दाखल केले. वय आणि सिटीस्कॅनचा स्कोअर हे सारेच अधिक असल्याने उपचार करणारे डॉक्टर सुरवातीला चिंतेत होते.

 

एक आव्हान म्हणून जिल्हा रुग्णालयातील टिमने त्यांच्यावर उपचार सुरु केले. एरव्ही श्वास घ्यायला जिथे बाबांना त्रास होत होता तो हळूहळू काही दिवसांत फुलायला लागला. कोविड रुग्णालयातील त्यांच्या आजूबाजूचे सारे रुग्ण बाबांचा स्कोअर ऐकून जीथे धास्तीत होते, तेवढेच हे बाबा निर्धास्त होते. मोबाईलपासून कोसोदूर, बाह्य जगात काय चालू आहे यांच्या फारश्या भानगडीत न पडता डॉक्टर जे काही सांगतात ते श्रध्दा ठेवनू ऐकायचे आणि कोणतेही प्रश्न न विचारता दिलेल्या गोळया घ्यायच्या या बाबाच्या स्वभावामूळे उपचार करणाऱ्या टिमलाही त्यांचे विशेष अप्रुप झाले.  

 

चौदा दिवसांचा कालावधी या  बाबाला खूप मोठा झाला. दोन दिवसापूर्वीच त्यांचे ऑक्सीजन जेव्हा काढले  तेव्हा हे बाबा आता मला घरी जावू द्या म्हणून डॉक्टराच्या मागे लागले. डॉक्टरांनी त्यांना बळजबरी दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवून सर्व खातरजमा झाल्यानंतर आज ‍रुग्णालयातून सूट्टी देण्याचा निर्णय घेतला. आजवरच्या कोविड उपचारात जिल्हा रुग्णालयातील ही सर्वोच्य सिटीस्कॅनची स्कोअर असलेली केस यशस्वी झाल्याने इतर रुग्णांचे आणि वैद्यकीय टिमचे मनोबल वाढावे, त्यांच्या अथक प्रयत्नांना शाबासकी द्यावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांची भेट घेवून त्यांना रुग्णालयातून शुभेच्छासह निरोप दिला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालक अधिकारी तथा विभागीय उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

00000

 

   

1 हजार 232 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 769 व्यक्ती कोरोना बाधित 24 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

 1 हजार 232 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 769 व्यक्ती कोरोना बाधित

 24 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 662 अहवालापैकी 769 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 617 तर अँटिजेन तपासणीद्वारे 152 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 78  हजार 701 एवढी झाली असून यातील 65  हजार  14  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  11  हजार  917 रुग्ण उपचार घेत असून 192 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 26 ते 28 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 507 एवढी झाली आहे. दिनांक 26 एप्रिल रोजी आश्विनी रुग्णालय येथे बिलोली येथील 59 वर्षाचा पुरुष, दिनांक 27 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे पावडेवाडी नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 81 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 60 वर्षाची महिला, कुष्णूर तालुका नायगाव येथील 55 वर्षाचा पुरुष, चांभरा तालुका हदगाव येथील 55 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 50 वर्षाचा पुरुष, हदगाव येथील 88 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 26 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे नवीन मोंढा नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, चिकाळा तालुका मुदखेड येथील 65 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 40 वर्षाचा पुरुष, खडकपुरा नांदेड येथील 60 वर्षाची महिला, गाडीपुरा नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, बारसगाव तालुका अर्धापूर येथील 60 वर्षाचा पुरुष, नारायण रुग्णालय येथे कहाळा तालुका नायगाव येथील 70 वर्षाची महिला, स्वामी विवेकानंद रुगणालय येथे बंजरंग कॉलनी नांदेड येथील 51 वर्षाचा पुरुष, आश्विनी रुग्णालय येथे कंधार येथील 56 वषार्चा पुरुष, संजिवनी रुग्णालय येथे कैलास नगर नांदेड येथील 71 वर्षाचा पुरुष, दिनांक 28 एप्रिल रोजी सांगवी नांदेड येथील 70 वर्षाची महिला, मालेगाव तालुका बिलोली येथील 48 वर्षाचा पुरुष, उमरी तालुका नांदेड येथील 65 वर्षाची महिला, इंदिरा रुग्णालय येथे सातेगाव तालुका नायगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, साईकृपा रुग्णालय येथे समता नगर नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष,  यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.60 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 285, बिलोली 44, हिमायतनगर 13,उमरी 26, नांदेड ग्रामीण 30, अर्धापूर 40, भोकर 18, देगलूर 4, धर्माबाद 3, हदगाव 27, हिमायतनगर 13, कंधार 7, किनवट 1, लोहा 13, मुदखेड 17, मुखेड 6, नायगाव 47, परभणी 8, यवतमाळ 4, सोलापूर 1, असे एकूण 617 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 24, बिलोली 2, माहूर 12, हिमायतनगर 8, नांदेड ग्रामीण 1, कंधार 12, मुदखेड 3, मुखेड 4, अर्धापूर 19, धर्माबाद 31, किनवट 19, नायगाव 7, उमरी 1, हदगाव 5, लोहा 2, नागपूर 1, उस्मानाबाद 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 152 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 232 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 13, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 724, धमार्बाद तालुक्यातंर्गत 35, देगलूर कोविड रुग्णालय 9, अर्धापूर तालुक्यातंर्गत 10, उमरी तालुक्यातंर्गत 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 19, मुखेड कोविड रुग्णालय 47, बिलोली तालुक्यातंर्गत 100, किनवट कोविड रुग्णालय 23, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 38, नायगाव तालुक्यातर्गत 6, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 10, हदगाव कोविड रुग्णालय 1, कंधार तालुक्यातंर्गत 1, माहूर तालुक्यातंर्गत 9, लोहा तालुक्यातंर्गत 41, खाजगी रुग्णालय 119 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 11 हजार 917 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 195, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 91, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 161, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 98, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 90, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 121, देगलूर कोविड रुग्णालय 48, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 45, बिलोली कोविड केअर सेंटर 87, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर 33, उमरी कोविड केअर सेंटर 54, माहूर कोविड केअर सेंटर 27, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 58, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 77, कंधार कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 87 , मुदखेड कोविड केअर सेंटर 17, अर्धापूर कोविड केअर सेंटर 15, बारड कोविड केअर सेंटर 10, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 15, मांडवी कोविड केअर सेंटर 17, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 50, एनआरआय कोविड केअर सेंटर 67, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 39 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5 हजार 153, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 3 हजार 56 , खाजगी रुग्णालय 2 हजार 175, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 11 हजार 917 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 35 खाटा उपलब्ध आहेत.

 

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 54 हजार 591

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 66 हजार 779

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 78 हजार701

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 65 हजार 14

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 507

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.60 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-19

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-35

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-380

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 11 हजार 917

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-192

00000

Tuesday, April 27, 2021

1 हजार 364 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 1 हजार 4 व्यक्ती कोरोना बाधित 29 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

                                                     1 हजार 364 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 4 व्यक्ती कोरोना बाधित

 29 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 416 अहवालापैकी 1 हजार 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 753 तर अँटिजेन तपासणीद्वारे 251 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 77  हजार 932 एवढी झाली असून यातील 63  हजार  782  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  12  हजार  405  रुग्ण उपचार घेत असून 249 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 25 ते 27 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 29 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 483 एवढी झाली आहे. दिनांक 25 एप्रिल रोजी मुखेड कोविड रुग्णालय मुखेड तालुक्यातील सकनुर येथील 50 वर्षाचा पुरुष, व्हिजन रुग्णालय येथील एस.व्ही.एम कॉलोनी किनवट येथील 45 वर्षाचा पुरुष, मुदखेड तालुक्यातील डोणगाव येथील 60 वर्षाचा पुरुष, झेंडा चौक नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, अपेक्षा रुग्णालय येथील आर्शीवाद नगर नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष दिनांक 26 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील भोकर तालुक्यातील धामदरी येथील 50 वर्षाचा पुरुष, मुदखेड तालुक्यातील  धनज येथील 65 वर्षाचा पुरुष, मुदखेड येथील 47 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 82 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे कंधार तालुक्यातील शिराढोण येथील 85 वर्षाची महिला, पाक्जा नगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला,हदगाव तालुक्यातील ठाकूरवाडी येथील 55 वर्षाचा पुरुष, धर्माबाद येथील 55 वर्षाची महिला, सापंच नगर नांदेड येथील 59 वर्षाची महिला, भोकर येथील 65 वर्षाची महिला, नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथील 65 वर्षाची महिला, लोहा कोविड रुग्णालय येथे टेळकी तालुका लोहा  येथील 60 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुग्णालय येथे शहापूर तालुका देगलूर येथील 71 वर्षाची महिला, गोदावरी कोविड रुगणालय येथे नाईक नगर नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, फिनिक्स कोविड रुग्णालय येथे आशीर्वाद नगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, डेल्टा रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील रुई येथील 45 वर्षाचा पुरुष दिनांक 27 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे गोपालचावडी तालुका नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 66 वर्षाचा पुरुष, किनवट कोविड रुग्णालय येथे किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील 71 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुगणालय येथे हदगाव येथील 60 वर्षाचा पुरुष, साईकृपा रुग्णालय येथे भोकर तालुक्यातील सावरगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, तिरुमला रुग्णालय येथे तरोडा नाका नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, निर्माया रुग्णालय येथे गणेशनगर नांदेड येथील 72 वर्षाची महिला, श्री गणेश रुग्णालय येथे देगलूर येथील 59 वर्षाची महिला   यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.84 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 153, बिलोली 12, हिमायतनगर 16, माहूर 8, नांदेड ग्रामीण 21, देगलूर 33, कंधार 47, मुदखेड 38, अर्धापूर 35, धर्माबाद 22, किनवट 70, मुखेड 70, भोकर 3, हदगाव 99, लोहा 21, नायगाव 66, उमरी 6, परभणी 5, हिंगोली 15, पुणे 1, यवतमाळ 6, निर्मल 3, लातूर 3  असे एकूण 753 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 24, बिलोली 1, उमरी 1, माहूर 9, उसमानाबाद 1, नांदेड ग्रामीण 4, देगलूर 4, कंधार 16, मुदखेड 41, हिंगोली 4, अर्धापूर 4, धर्माबाद 67, किनवट 38, मुखेड 12, परभणी 3, भोकर 6, हदगाव 4, लोहा 8, नायगाव 3, नाशिक 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 251 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 364 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 12, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 930, धमार्बाद तालुक्यातंर्गत 23, देगलूर कोविड रुग्णालय 1, अर्धापूर तालुक्यातंर्गत 4, उमरी तालुक्यातंर्गत 32, मालेगाव टीसूयु कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 26, मुखेड कोविड रुग्णालय 56, बिलोली तालुक्यातंर्गत 22, किनवट कोविड रुग्णालय 30, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 15, नायगाव तालुक्यातर्गत 6, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 7, हदगाव कोविड रुग्णालय 34, कंधार तालुक्यातंर्गत 15, माहूर तालुक्यातंर्गत 15, लोहा तालुक्यातंर्गत 21, खाजगी रुग्णालय 123 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 12 हजार 405 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 215, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 177, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 98, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 83, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 120, देगलूर कोविड रुग्णालय 51, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 56, बिलोली कोविड केअर सेंटर 78, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर 31, उमरी कोविड केअर सेंटर 56, माहूर कोविड केअर सेंटर 35, भोकर कोविड केअर सेंटर 9, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 53, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 88, कंधार कोविड केअर सेंटर 17, धर्माबाद कोविड केअर सेंटर 81 , मुदखेड कोविड केअर सेंटर 19, अर्धापूर कोविड केअर सेंटर 18, बारड कोविड केअर सेंटर 15, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 11, मांडवी कोविड केअर सेंटर 17, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 29, एनआरआय कोविड केअर सेंटर 90, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 46 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5 हजार 324, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 3 हजार 225 , खाजगी रुग्णालय 2 हजार 266, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 12 हजार 405 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 25 खाटा उपलब्ध आहेत.

 

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 51 हजार 221

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 64 हजार 221

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 77 हजार 932

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 63 हजार 782

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 483

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.84 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-35

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-27

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-391

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 12 हजार 405

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-249

00000

जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

                                                         जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह

पाऊस व गारपीट होण्याची शक्यता

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 27 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार 27 एप्रिल ते 2 मे 2021 या काळात जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

 

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...