Tuesday, December 8, 2020

 

मानवी हक्क दिनानिमित्त गुरुवारी विविध उपक्रमांच्या आयोजनाचे निर्देश 

नांदेड (जिमाका), दि. 8 :- जिल्ह्यात गुरुवार 10 डिसेंबर 2020 रोजी मानवी हक्क दिन साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहेत. 

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण, कारागृह, बालसुधारगृह अनाथालय आदी विभागांनी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करावी असे राज्य मानवी हक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे सूचित केले आहे. 

या कायदाअंतर्गत समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान व्हावे त्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार न्यायालय, विद्यापीठ, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभाग, पंचायत, ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, महसूल विभागाची सर्व कार्यालये, शिक्षणाधिकारी, कारागृह अधीक्षक, बालगृह मुलांचे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती करावी याविषयी पत्राद्वारे निर्देशीत केले आहे.

00000

 

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न

यावर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास भरभरुन योगदान द्यावे

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

 नांदेड (जिमाका) दि. 8 :- सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनात देशप्रेमाच्या भावनेतून नांदेड जिल्ह्याने नेहमीच चांगला पुढाकार घेऊन निधी संकलनात भरीव योगदान दिले आहे. यावर्षीच्या ध्वजनिधी संकलनातही शासनातील विविध विभागांसह समाजातूनही देशप्रेमाच्या भावनेतून भरीव निधी दिला जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला. या आर्थीक वर्षाच्या ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ नियोजन भवनात नुकताच संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

गतआर्थीक वर्षासाठी शासनाने जिल्ह्याला 35 लाख 50 हजार एवढे उद्दीष्ट दिले होते. नांदेड जिल्ह्याने हे उद्दीष्ट 124.14 टक्क्यांनी पूर्ण केले. या आर्थीक वर्षासाठीही शासनाने तेवढेच उद्दीष्ट दिले असून नांदेड जिल्ह्यातून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक निधी जमा करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे यांनी माजी सैनिक व त्यांच्या महिलाबचतगटास सर्वेातोपरी मदत करण्याचे सांगीतले. ध्वजनिधी जमा करण्याविषयी "हाच संकल्प हिचसिद्वी" उपक्रम राबवून प्रत्येक अधिकारी कर्मचारी व नागरीकांना आवाहन करुन निधी जमा करण्यात येईल असे आश्वासित केले. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सेवारत सैनिक किंवा माजी सैनिक यांच्या काही पोलीस संरक्षण किंवा अतिक्रमणाबाबतच्या तक्रारी आहेत. त्यासाठी प्राथमिकतेने लक्ष देवून निपटारा करण्यात येईल असे  माजी सैनिकांना सांगितले. 

यावेळी जिल्ह्याला दिलेले उद्दीष्ट वेळेच्या आत पूर्ण करुन गत आर्थीक वर्षात निधी शासनास जमा केल्याबद्दल शासनाच्यावतीने जिल्हा प्रशासनाचा स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. या निधी संकलनात जिल्ह्यातील शासकिय कार्यालय, शाळा तथा महाविद्यालयांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचाही प्रातिनिधीक सत्कार जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुस्तक भेट देऊन करण्यात आला.   

कार्यक्रमाची सुरुवात शहिदांना श्रद्वांजली वाहून करण्यात आली. यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी  प्रास्ताविकात ध्वजदिन निधीचे महत्व सांगून संकलीत झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती दिली. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी सी. एस. डी कॅण्टीन, मुलींचे वसतिगृह व पूर्व प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे सुरु करण्याबाबत विनंती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना केली. 

स्वंयरोजगारासाठी माजी सैनिक महिला बचतगटांना सुविधा केंद्र प्राथमिकतेने आंवटीत करण्यात येतील.  या कार्यक्रमाचे औचित्य साधून संजीवनी माजी सैनिक महिला बचतगट यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यामधून  शासकीय पुर्ननियुक्त माजी सैनिक कर्मचारी संघटना, भारतीय माजी सैनिक संघटना, विरसैनिक ग्रुप यांनी उत्साहने भाग घेतला. कार्यक्रमात विरनारी, विरमाता व विरपिता यांचा सत्कार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधिक्षक नांदेड यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.  याप्रसंगी आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले.  माजी सैनिक पाल्य धनंजय माधव केन्द्रे यास या वर्षीचा एअर मार्शल व्ही. ए. पाटणकर पुरस्कार माजी सैनिक विधवा पाल्य यांनी इयत्ता 10 वीमध्ये लातूर विभागात 96 प्रतिशत मार्कस प्राप्त केल्याबाबत प्रदान करण्यात आला. 

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी केले.  हा कार्यक्रम  यशस्वीपणे पार पाडण्याकरिता कार्यालयाचे  बुधसिंग शिसोदे, सुभे काशिनाथ ससाने,  सुर्यकांत कदम, सुरेश टिपरसे, माधव गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. 000000







Monday, December 7, 2020

 32 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू 34 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी


नांदेड (जिमाका) दि. 7 :- सोमवार 7 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 32 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 16 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 667 अहवालापैकी 632 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 626 एवढी झाली असून यातील 19 हजार 539 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 342 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 20 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. रविवार 6 डिसेंबर रोजी लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 551 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, मुखेड कोविड रुग्णालय 2, कंधार तालुक्यांतर्गत 16 असे एकूण 34 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.72 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 11, धर्माबाद तालुक्यात 3, अर्धापूर 1, परभणी 1 असे एकुण 16 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, देगलूर तालुक्यात 1, मुखेड 1, उत्तर प्रदेश 1, भोकर 1, लोहा 1, गुजरात 1 असे एकुण 16 बाधित आढळले.

जिल्ह्यात 342 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 30, मुखेड कोविड रुग्णालय 24, किनवट कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 70, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 145, खाजगी रुग्णालय 22 आहेत.

सोमवार 7 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 190, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 79 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 58 हजार 436
निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 33 हजार 864
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 626
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 539
एकूण मृत्यू संख्या- 551
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.72 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-394
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-342
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-20.

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
000000

 

17 तंबाखू विक्रेत्यावर कारवाई

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण कक्षास प्राप्त तक्रारीवर पथकामार्फत 5 डिसेंबर रोजी मुसलमानवाडी पाटी, स्वारातीम विद्यापीठ गेट व शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गेट येथे अचानक धाडी टाकून 17 तंबाखू विक्रेत्यावर कारवाई करुन 12 हजार 900 रुपये दंड आकारला आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास व कोरोना संक्रमनास प्रतिबंध करण्यास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील मुजळगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.  सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यास अथवा धुम्रपान केल्यास कोरोना संक्रमनाचा धोका वाढतो. स्वारातीम विद्यापीठ गेट व शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गेट तसेच मुसलमानवाडी पाटी परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात नोडल अधिकारी             डॉ. पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. अर्चना तिवारी , मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री. चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक श्री पठाण आदी होते.

00000

 

आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी

9 डिसेंबरला विकेल ते पिकेल कार्यशाळा 

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  ‘विकेल ते पिकेल’ अभियानातंर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, प्रधानमंत्री सुक्ष्‍म खाद्य उद्योग उन्‍नयन योजना, केंद्र पुरस्‍कृत कृषि पायाभुत विकास निधी योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्‍प या योजनेची जिल्‍हास्‍तरीय कार्यशाळा बुधवार 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्‍हा नियोजन सभागृह, येथे जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली येथे होणार आहे.   

या कार्यशाळेसाठी जास्‍तीत जास्‍त आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी उपस्थित राहावे असे, आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक आत्‍मा रविशंकर चलवदे यांनी केले आहे. या कार्यशाळेसाठी जिल्‍हयातील नाबार्ड, पशुसंवर्धन, जिल्‍हा उद्योग केंद्र, माहिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्‍हा उपनिबंधक, मत्‍स्‍यविभाग, दुग्‍धव्‍यवसाय, जिल्‍हा अग्रणी व्‍यवस्‍थापक, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागातील अधिकारी यांची उपस्थिती आहे, असेही या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी 8 डिसेंबर 2020 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

Sunday, December 6, 2020

 

35 कोरोना बाधितांची भर तर

29 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  रविवार 6 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 35 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 29 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 6 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 29 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या 771 अहवालापैकी 703 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 594 एवढी झाली असून यातील 19 हजार 505 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 345 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 550 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, मुखेड कोविड रुग्णालय 1, माहूर तालक्यांतर्गत 1 असे एकूण 29 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.71 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 17, लोहा तालुक्यात 4, कंधार 2, लातूर 1, नांदेड ग्रामीण 2, भोकर 1, मुखेड 2 असे एकुण 29 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 3, मुखेड तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1, लोहा 1 असे एकुण 6 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 345 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 33, मुखेड कोविड रुग्णालय 29, किनवट कोविड रुग्णालय 2,  हदगाव कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 79, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 138, खाजगी रुग्णालय 18 आहेत. 

रविवार 6 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 190, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 78 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 57 हजार 909

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 33 हजार 181

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 594

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 505

एकूण मृत्यू संख्या- 550

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.71 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-586

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-345

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-18. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

000000

वृत्त क्रमांक   मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत वाढ   वाढीव कालावधीचा ...