Friday, October 11, 2019



86 - नांदेड विधानसभा उत्‍तर मतदार संघात
मतदार जनजागृती नाटीका सादर
नांदेड,दि. 11:- 86- नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघात आगामी विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी स्‍थापीत स्‍वीप कक्षाचे माध्‍यमातून दिनांक 11 ऑक्‍टोबर, 2019 रोजी शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे राष्‍ट्रमाता इंदिरा हायस्‍कुल, नांदेड व विधी महाविद्यालय, नांदेड येथील विद्यार्थी चमू यांनी मतदार जनजागृती नाटीका सादर केली. नाटीकेच्‍या माध्‍यमातून  मतदान का करायला हवे? ही बाब विद्यार्थ्‍यांनी पटवून दिली. तसेच सर्वांनी आवर्जुन मतदान करण्‍याचे आवाहन केले. त्‍यास उपस्थितांनी टाळ्यांच्‍या गजरात प्रतिसाद दिला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी  रोहयो सदाशिव पडदूणे यांनी नाटीकेत सहभागी मुलांना पुष्‍पगुच्‍छ देवून कौतुक केले. 
या कार्यक्रमास तहसिलदार सं.गां.यो श्रीमती वैशाली पाटील, सहायक जिल्‍हा पुरवठा अधिकारी मिटकरी आर डब्‍ल्यू, तहसीलदार सामान्‍य प्रसाद कुलकर्णी, नायब तहसिलदार श्री.पाटे हे उपस्थित होते.
पथनाट्य सादरीकरण करण्‍यासाठी श्री नरवाडे मुख्‍याध्‍यापक व शिक्षकवृंद, राष्‍ट्रमाता इंदिरा हायस्‍कुल, नांदेड व प्राचार्य, विधी महाविद्यालय, नांदेड यांनी सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमाचे नियेाजन 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ स्विप कक्षातील रुस्‍तुम आडे, प्रसाद शिरपूरकर, श्री गणेश रायेवार, श्रीमती सारीका आचमे, श्रीमती कविता जोशी व श्रीमती अनघा जोशी यांनी केले.

0000



मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्‍न
मतदान अधिकारी यांनी निवडणुकीचे काम निष्पक्षपणे, चोखपणे करावे
--- निवासी उपजिल्‍हाधिकारी - डॉ. सचिन खल्‍लाळ

नांदेड, दि.11:- सार्वत्रीक निवडणुक-2019 अंतर्गत 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघामध्‍ये नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या मतदान केंद्राध्‍यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व ईतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण डॉ. शंकरराव चव्‍हाण सभागृह, नांदेड येथे आयोजीत करण्‍यात आले होते.
या प्रशिक्षणास जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे व अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली             डॉ. सचिन खल्‍लाळ, निवासी उपजिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी मतदान अधिकारी यांनी निवडणुकीचे काम निष्पक्षपणे, चोखपणे करावे असे दुसऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. तसेच सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना पी.पी.टी.व्‍दारे प्रशिक्षण व प्रत्‍यक्ष ई.व्‍ही.एम. व व्‍ही.व्‍ही.पॅट हताळणी करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) सदाशिव पडदुणे यांनी प्रशिक्षण दिले.
            या यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी वैशाली पाटील, प्रसाद कुलकर्णी, आर.डब्‍लु. मिटकरी, कक्ष प्रमुख नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, विजयकुमार पाटे, श्रीमती संजिवणी मुपडे, प्रिया जांबळेपाटील, गट शिक्षण अधिकारी रुस्‍तुम आडे, अभियंता सुनिल देशमुख, सर्व क्षेत्रीय अधिकारी, मास्‍टर ट्रेनर सचिन राका, विकास देशमुख यांचे व्‍यासपिठावर उपस्थिती होती.  
निवडणुक निर्णय अधिकारी, 86-नांदेड उत्‍तर वि.स.म.सं. कार्यालयातील अव्‍वल कारकुन गणेश नरहिरे, गोपाल धसकनवार, बालाजी बंगरवार, गिरिष येवेते, रामेश्‍वर सावते,  सुचीता बोधगिरे, विद्या सुरुगवाड, एस.के. शहाणे, मनिषा वांगीकर, संतोष गज्‍जेवार, एस.व्हि. पेद्देवाड, माधव देमगुंडे, सुनिल माडजे, दिपक कुलकर्णी, गणेश सोनटक्‍के, नागेश स्‍वामी, माधव पवार, आनंदा कांबळे, विशाल पेंडकर, रोशनसिंह ग्रंथी, दत्‍तात्र्य लिंबेकर, रविकांत दहिवाल, अनिल धापसे, बाळासाहेब भराडे, नामदेव धांडे, अनिता काळे, विजयकुमार चौथवे, ज्‍योती कदम, दिपक गुरनुळे तलाठी सय्यद मौसिन आदिनी प्रशिक्षण यशस्‍वी करण्यासाठी प्रयत्‍न केले.
            या प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्‍या मतदान केंद्राध्‍यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व ईतर मतदान अधिकारी यांना लोक प्रतिनिधीत्‍व कायदा 1950 चे कलम 134 अन्‍वये नोटीस काढण्‍यात आली असुन संबंधीतास 24 तासाच्‍या आत खुलासा सादर करण्‍यास सांगीतले आहे. विहीत मुदतीत खुलासा सादर न केल्‍यास संबधीतांविरुध्‍द नियमानुसार फौजदारी कारवाई करण्‍याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहे. सदर प्रशिक्षण यशस्‍वी करण्‍यासाठी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, नायब तहसिलदार, क्षेत्रिय अधिकारी, मास्‍टर ट्रेनर, अव्‍वल कारकुण, मंडळ अधिकारी, लिपीक व तलाठी यांनी परीश्रम घेतले.    
0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...