Thursday, September 26, 2019


राज्य उत्पादन  शुल्क विभागाची करडी नजर
            नांदेड,26:- .जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, यांच्या मार्गदर्शनानुसार व मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, म.रा.मुंबई यांच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुक 2019 च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, विभाग नांदेड यांच्यामार्फत निवडणूक काळातील अवैध मद्य विक्री , अवैध वाहतुक व अवैध उत्पादन रोखण्यासाठीखालील प्रमाणे उपाययोजना करण्यात आलेली आहेत. 
जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या मतदानाच्या दिवशी, मतदान संपण्यापुर्वीपासून 48 तास अगोदर व मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवण्याबाबत नियमात तरतुद असल्याने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडून आदेश प्राप्त करून घेण्यात येऊन बंद ठेवण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांना ते बजावण्यात येणार आहेत. कोरड्या दिवसाच्या कालावधीत मद्य विक्रीच्या कोणत्याही अनुज्ञप्तीचे व्यवहार सुरु राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात येईल.
मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या विवरणपत्रात नमुद केलेल्या ठिकाणीसीमातपासणी नाकेकार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यानुसार मौ.भक्तापूर ता.देगलूर जि.नांदेड व मौ.कार्ला फाटा ता.बिलोली जि.नांदेड येथे उभारण्यात आलेल्या सीमातपासणी नाक्यांवर वाहन तपासणीचेकामकाज सुरु झाले आहे.
उपरोक्त कार्यान्वित केलेल्या सीमातपासणी नाक्यावर नेमणूककरण्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी अहोरात्रकार्यरत राहण्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. सदर नाक्यावर नेमणूककरण्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या तात्पुरत्या नेमणुकीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. निवडणुकीच्यावेळी संबंधित मतदार संघाच्या निवडणुक निरीक्षकांना (Observer) गुन्हा अन्वेषनाची माहिती वेळोवेळी देण्यात येईल. मद्य निर्माण्या, घाऊक व किरकोळ विक्रेत्यांच्या व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. व लक्ष ठेवण्यात येईल.
मद्य निर्मीतीकरणाऱ्या घटकांनी (PLL / CL-I / BRL) घाऊक विक्रेते (FL-I / CL-II इत्यादी) या अनुज्ञप्तीधारकांनी सीसीटीव्ही (CC TV) जर बसविले नसलेल्या घटकांनासुचना देण्यात आले आहे. यापुर्वीच बसविलेले असतील परंतूतेकार्यरत अशा घटाकंनातरतेकार्यरत करण्याबाबत देण्यात आलेले आहेत. व कार्यरत असल्याचीखात्रीकरण्यात आलेली आहेत.
या विभागा मार्फत चार विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात येवून निवडणूक कालावधीमध्येकुठल्याही प्रकारची अवैधरित्या निर्मिती, वाहतूक, विक्री व वितरण होणार नाही याबाबत दक्षता घेतली आहे. त्यांचे मार्फत रात्रीची गस्त गळती जात आहे. तसेच संशयित वाहनांची तपासणीकेली जात आहे.
दिनांक 23 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे अध्यक्षतेखाली सिमालगत भागातील तेलंगना राज्यातील अदिलाबाद, निर्मल, निझामाबाद, कामारेड्डी जिल्ह्यातील व तसेचकर्नाटक राज्याच्या बिदर जिल्ह्यातील, पोलीस अधीक्षक, महसूल अधिकारी, राज्य परिवहन अधिकारी व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे अवैध मद्य नांदेड जिल्ह्यात येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
तसेचतेलंगना व कर्नाटक राज्यातीलसीमालगर भागातील 5 कि.मी. अंतरावरील अनुज्ञप्त्या मतदानाच्या 48 तास अगोदर व मतमोजणीच्या दिवशी बंद ठेवण्याबाबत कोरडा दिवसा (dray day) आदेश निर्गमित करण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबई दारुबंदी कायदा 1949 चेकलम 93 अंतर्गत दाखले केलेल्या 58 प्रस्तावावर उपविभागीय अधिकारी यांचेकडून बंधपत्र घेण्याचेकामकाज चालु असून अशा आरोपींच्या हालचालींवर देखील बारीक नजर ठेवली जात आहे.
जिल्ह्यातील हातभट्टीची ठिकाणेतसेच अवैध मद्यविक्रीची ठिकाणे यांचे मॉपिंगतयारकेले असून विशेष माहिमे अंतर्गत अशा ठिकाणांवर कारवाई करण्यात येत आहे.
अवैध दारु विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगांवर करडी नजर ठेवली जात असून वेळोवेळी त्यांचेवर कारवाई देखीलकरण्यात येत आहे. नांदेड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000



Wednesday, September 25, 2019


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 सप्टेंबर 2019 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 ऑक्टोंबर 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000



विधानसभा निवडणूक अनुषंगाने
प्रकाशक, मुद्रकांची आज बैठक
नांदेड, दि. 25 :- नांदेड तालुक्यातील 87- नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रकाशक व मुद्रक यांची 87-नांदेड दक्षिण विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे कार्यालयात गुरुवार 26 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वा. निवडणूक विषयक प्रकाशन व छपाई याविषयावर चर्चा / मार्गदर्शन करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी सर्व प्रकाशन व मुद्रक यांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.  
00000

Tuesday, September 24, 2019


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमीत      
नांदेड, दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची दिनांक 21 सप्टेंबर 2019 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्‍ह्यात विधानसभेच्‍या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून नांदेडचे जिल्‍हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश 21 सप्टेंबर 2019 रोजी निर्गमीत केले आहेत.  
ध्‍वनीक्षेपक, ध्‍वनिवर्धकाचा वापर  
कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सक्षम प्रधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरत्‍या वाहनांवर ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिर्धकाचा वापर करता येणार नाही. महाराष्‍ट्र शासन पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्रमांक ध्‍वनीप्र 2009/प्र.क्र.12/08/ता.क.1, दिनांक 31 जुलै, 2013 नुसार ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर ध्‍वनि प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून करावी. ध्‍वनिक्षेपक व ध्‍वनिवर्धकाचा वापर सकाळी 6 वाजेपुर्वी आणि रात्री. 10 वाजेनंतर करता येणार नाही.
कार्यालये, विश्रामगृहे परिसरातील निर्बंध
कार्यालये, विश्रामगृहे इत्‍यादी परिसरात कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने, कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर निर्बंध राहतील.
शासकीय वाहनाच्‍या गैरवापरास प्रतिबंध
निवडणूकीचे कालावधीत कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने (Cars/Vehicles) वापरण्‍यास या आदेशाव्‍दारे प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलके,
झेंडे लावणे इत्‍यादी बाबीस काही प्रतिबंध
फिरत्‍या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्‍या डाव्‍या बाजुला विंड स्‍क्रीन ग्‍लासच्‍या पुढे राहणार नाही आणि तो त्‍या वाहनाच्‍या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्‍त राहणार नाही. प्रचाराच्‍या फिरत्‍या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्‍या आसनामागे वाहनाच्‍या डाव्‍या व उजव्‍या बाजुनेच लावण्‍यात यावा. इतर कोणत्‍याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्‍या वाहनावर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी यांच्‍या वाहना व्‍यति‍रीक्‍त इतर कोणत्‍याही वाहनावर लावता येणार नाही.
निवडणूक कालावधीत विश्रामगृह वापरावरील निर्बंध
शासकीय व निवडणूकीच्‍या कामावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्‍या व्‍यतीरिक्‍त, इतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस विश्रामगृहात थांबण्‍यासाठी संबंधित खात्‍याने दिलेला अधिकृत परवाना असल्‍याशिवाय किंवा सक्षम अधिकाऱ्याच्‍या पूर्व परवानगीशिवाय जिल्‍ह्यातील शासकीय/निमशासकीय विश्रामगृहात अथवा त्‍या परिसरात प्रवेश करता येणार नाही.

सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पक्ष कार्यालय स्‍थापन करण्यास निर्बंध
निवडणूकीचे कालावधीत धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे चित्रे,
चिन्‍हांचे कापडी फलके, भाषण देण्याबाबतचे निर्बंध
निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकणी पक्षांचे चित्रे, चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
शासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध  
निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
शस्‍त्र परवानाधारकाकडील शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यावर बंदी  
निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्‍य पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचारी, बँके सुरक्षा गार्ड यांचे व्‍यतिरिक्‍त इतर सर्व परवाना धारकास परवान्‍यातील शस्‍त्रास्‍त्रे वाहून नेण्‍यास या आदेशान्‍वये बंदी घालण्‍यात आली आहे.
वरील सर्व आदेश नांदेड जिल्‍ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अनुषंगाने विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राहद्दी पर्यंत आदेश निर्गमीत झाल्‍याचा दिनांक 21 सप्‍टेंबर पासून गुरुवार 24 ऑक्‍टोंबर 2019 रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहतील. 
नामनिर्देशनपत्र दाखल करताना
 अवलंब करावयाची कार्यपद्धत
निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन मोटारगाड्या/वाहने यांचा ताफ्यात समावेश असावा. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्‍यक्‍ती उपस्थित राहतील या व्‍यतिरिक्‍त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्‍या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे/ वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक‍ प्रचार करणेस प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
हा आदेश नांदेड जिल्‍हयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अनुषंगाने 27 सप्‍टेंबर 2019 ते 4 आक्‍टोंबर 2019 रोजी मध्यरात्री पर्यंत अंमलात राहील.
मतदान केंद्र परिसरात 144 कलम
मतदानाच्‍या दिवशी सोमवार 21 आक्‍टोंबर 2019 रोजी जिल्‍ह्यातील सर्व मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागु राहील. ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे त्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्तीस प्रवेश करण्‍याकरीता सोमवार 21 आक्‍टोंबर, 2019 रोजी प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
हा आदेश मतदानाच्‍या दिवशी सोमवार 21 ऑक्‍टोंबर 2019 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून मतदान संपेपर्यन्‍त अंमलात राहील.
मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम
नांदेड जिल्‍ह्यातील 83-किनवट, 84-हदगाव, 85-भोकर, 86-नांदेड (उत्‍तर), 87-नांदेड (दक्षिण), 88-लोहा, 89-नायगाव, 90-देगलूर, 91-मुखेड विधानसभा मतदार संघाच्‍या मुख्‍यालयी गुरुवार 24 ऑक्‍टोबर, 2019 रोजी मतमोजणी शांततेत पार पडावी आणि कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी या दृष्‍टीकोणातून मतमोजणीच्‍या दिवशी मतमोजणी केंद्रापासून 200 मिटर परिसरात सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेशास प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.
हा आदेश गुरुवार 24 ऑक्‍टोबर,2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यन्‍त अंमलात राहील.
0000

Monday, September 23, 2019

नांदेड विधानसभा निवडणुकी विषयी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन सभागृहात विविध शाखा प्रमुखाची बैठक आणि प्रशिक्षण आयोजित केले होते, या दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध शाखेने पार पाडण्याची जबाबदारी तसेच कर्तव्ये संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले यावेळी माननीय जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध टीम ला मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल , पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर; अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिह परदेशी ,जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, तसेच विविध शाखा प्रमुख उपस्थित होते.



  

वाहन योग्यता प्रमाणपत्र
नुतनीकरणासाठी आवाहन
नांदेड, दि. 23 :-  नांदेड जिल्हयातील सर्व वाहन चालक, मालकांनी सोमवार 23 सप्टेंबर 2019 पासून ज्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी अपॉईंटमेट घेतले आहे, अशाच वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी तपासणी करण्यात येईल. तसेच वाहन धारकांनी ज्या दिवशी अपॉईंटमेंट घेतले आहे त्याच दिवशी वाहन ब्रेक टेस्ट ट्रॅकवर  तपासणीसाठी आणावेत इतर दिवशी वाहन ब्रेक टेस्ट ट्रॅकवर आणू नये अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी कळविले आहे.
0000


नांदेड उत्तर विधानसभा निवडणूक
कामकाजाबाबत बैठक संपन्न
नांदेड, दि. 23 :- 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक  निर्णय अधिकारी याचे कार्यालयात व विविध पथकातील अधिकारी,  सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी, पोलीस अधिकारी व झोनल अधिकारी यांची बैठक नुकतीच संपन्‍न.
श्री. सदाशिव पडदुणे, निवडणूक निर्णय अधिकारी, 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ, यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  बचत भवन जि.आ.का. नांदेड येथे दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी 86-नांदेड उत्‍तर  विधानसभा मतदारसंघातील निवडणूक  निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात  व विविध पथकातील अधिकारी/  सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी, पोलीस अधिकारी व झोनल अधिकारी यांची बैठक घेण्‍यात आली. 
या बैठकीसाठी सहायक निवडणुक अधिकारी श्रीमती वैशाली पाटील  तहसिलदार, संगोयो, प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार, (सामान्‍य), र. वै. मिटकरी, सहायक जिल्‍हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार संजय बिरादार  व  नायब तहसीलदार, सुनिल माचेवाड, श्रीमती उषा इजपवार, श्रीमती संजीवनी मुपडे, श्रीमती प्रिया जांभळे पाटील, लेखाधिकारी आदी सर्व  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
नांदेड तालुक्‍यातील 86 नांदेड येथे विधानसभा  मतदार संघातील निवडणुक विषयक कामे सुरळीत व कालमर्यादीत पार पाडण्‍यासाठी उत्‍तर संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्‍या सेवा लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1951 मधील कलम 134 तरतुदीनूसार सदर नमुद अधिकारी व कर्मचारी यांनी त्‍यांच्‍या नावासमोर दर्शविलेल्‍या  कामकाज अतिशय काळजीपूर्वक  बिनचुक व  विहीत कालमर्यादेत पार पाडावे. याबाबत  मा. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी  बैठकीत सुचीत केले.
आदर्श आचांरसंहितेचे सर्व कार्यालय प्रमुख यांनी तंतोतंत पालन करावे. अशा सुचना निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिल्‍या.  
      सर्व अधिकारी / कर्मचारी यांना  नेमून दिलेल्‍या निवडणूक प्रक्रियेतील  अनुषंगीक कामे वेळेत व पारदर्शक करण्‍याच्‍या सुचना   सदाशिव पडदुणे, निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपजिल्‍हाधिकारी  (रोहयो) नांदेड यांनी दिल्‍या.
0000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...