Monday, September 23, 2019


नांदेड उत्तर विधानसभा निवडणूक
कामकाजाबाबत बैठक संपन्न
नांदेड, दि. 23 :- 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक  निर्णय अधिकारी याचे कार्यालयात व विविध पथकातील अधिकारी,  सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी, पोलीस अधिकारी व झोनल अधिकारी यांची बैठक नुकतीच संपन्‍न.
श्री. सदाशिव पडदुणे, निवडणूक निर्णय अधिकारी, 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ, यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  बचत भवन जि.आ.का. नांदेड येथे दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी 86-नांदेड उत्‍तर  विधानसभा मतदारसंघातील निवडणूक  निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात  व विविध पथकातील अधिकारी/  सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी, पोलीस अधिकारी व झोनल अधिकारी यांची बैठक घेण्‍यात आली. 
या बैठकीसाठी सहायक निवडणुक अधिकारी श्रीमती वैशाली पाटील  तहसिलदार, संगोयो, प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार, (सामान्‍य), र. वै. मिटकरी, सहायक जिल्‍हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार संजय बिरादार    नायब तहसीलदार, सुनिल माचेवाड, श्रीमती उषा इजपवार, श्रीमती संजीवनी मुपडे, श्रीमती प्रिया जांभळे पाटील, लेखाधिकारी आदी सर्व  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
नांदेड तालुक्‍यातील 86 नांदेड येथे विधानसभा  मतदार संघातील निवडणुक विषयक कामे सुरळीत व कालमर्यादीत पार पाडण्‍यासाठी उत्‍तर संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्‍या सेवा लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1951 मधील कलम 134 तरतुदीनूसार सदर नमुद अधिकारी व कर्मचारी यांनी त्‍यांच्‍या नावासमोर दर्शविलेल्‍या  कामकाज अतिशय काळजीपूर्वक  बिनचुक व  विहीत कालमर्यादेत पार पाडावे. याबाबत  मा. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी  बैठकीत सुचीत केले.
आदर्श आचांरसंहितेचे सर्व कार्यालय प्रमुख यांनी तंतोतंत पालन करावे. अशा सुचना निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिल्‍या.  
      सर्व अधिकारी / कर्मचारी यांना  नेमून दिलेल्‍या निवडणूक प्रक्रियेतील  अनुषंगीक कामे वेळेत व पारदर्शक करण्‍याच्‍या सुचना   सदाशिव पडदुणे, निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपजिल्‍हाधिकारी  (रोहयो) नांदेड यांनी दिल्‍या.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...