नांदेड विधानसभा निवडणुकी विषयी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन सभागृहात विविध शाखा प्रमुखाची बैठक आणि प्रशिक्षण आयोजित केले होते, या दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध शाखेने पार पाडण्याची जबाबदारी तसेच कर्तव्ये संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले यावेळी माननीय जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध टीम ला मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल , पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर; अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिह परदेशी ,जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, तसेच विविध शाखा प्रमुख उपस्थित होते.
Monday, September 23, 2019
वाहन योग्यता प्रमाणपत्र
नुतनीकरणासाठी आवाहन
नांदेड, दि. 23 :- नांदेड जिल्हयातील सर्व
वाहन
चालक, मालकांनी सोमवार 23 सप्टेंबर 2019 पासून ज्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी अपॉईंटमेट घेतले आहे, अशाच वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी तपासणी करण्यात येईल. तसेच वाहन धारकांनी ज्या दिवशी अपॉईंटमेंट घेतले आहे त्याच दिवशी वाहन ब्रेक टेस्ट ट्रॅकवर तपासणीसाठी आणावेत इतर दिवशी वाहन ब्रेक टेस्ट ट्रॅकवर आणू नये अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उप
प्रादेशिक
परिवहन
अधिकारी,
नांदेड
यांनी
कळविले आहे.
0000
नांदेड उत्तर विधानसभा निवडणूक
कामकाजाबाबत बैठक संपन्न
नांदेड, दि. 23 :- 86
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक
निर्णय अधिकारी याचे कार्यालयात व विविध पथकातील अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी, पोलीस अधिकारी व
झोनल अधिकारी यांची बैठक नुकतीच संपन्न.
श्री. सदाशिव पडदुणे,
निवडणूक निर्णय अधिकारी, 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ, यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जि.आ.का. नांदेड येथे दिनांक 22 सप्टेंबर
2019 रोजी 86-नांदेड उत्तर विधानसभा
मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे
कार्यालयात व विविध पथकातील अधिकारी/ सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी, पोलीस अधिकारी व
झोनल अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीसाठी सहायक
निवडणुक अधिकारी श्रीमती वैशाली पाटील
तहसिलदार, संगोयो, प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार, (सामान्य), र. वै. मिटकरी,
सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार संजय बिरादार व नायब
तहसीलदार, सुनिल माचेवाड, श्रीमती उषा इजपवार, श्रीमती संजीवनी मुपडे, श्रीमती
प्रिया जांभळे पाटील, लेखाधिकारी आदी सर्व
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नांदेड तालुक्यातील 86
नांदेड येथे विधानसभा मतदार संघातील
निवडणुक विषयक कामे सुरळीत व कालमर्यादीत पार पाडण्यासाठी उत्तर संबंधित अधिकारी
कर्मचारी यांच्या सेवा लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 134 तरतुदीनूसार
सदर नमुद अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कामकाज अतिशय काळजीपूर्वक बिनचुक व
विहीत कालमर्यादेत पार पाडावे. याबाबत
मा. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी
बैठकीत सुचीत केले.
आदर्श आचांरसंहितेचे
सर्व कार्यालय प्रमुख यांनी तंतोतंत पालन करावे. अशा सुचना निवडणुक निर्णय अधिकारी
यांनी दिल्या.
सर्व अधिकारी / कर्मचारी यांना नेमून दिलेल्या निवडणूक प्रक्रियेतील अनुषंगीक कामे वेळेत व पारदर्शक करण्याच्या
सुचना सदाशिव पडदुणे, निवडणूक निर्णय अधिकारी, तथा
उपजिल्हाधिकारी (रोहयो) नांदेड यांनी
दिल्या.
0000
Sunday, September 22, 2019
दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या
परवान्यासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22:- दिपावली
उत्सव दिनांक 27 ऑक्टोंबर 2019 ते 29 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत साजरा होत आहे. नांदेड
महानगरपालिका हद्दीतील तात्पुरते फटाका परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महापालिका
हद्दीतील तात्पुरते फटाका परवाना जिल्हादंडाधिकारी तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय
दंडाधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरता फटाका विक्री परवाने देतील.
त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. इच्छुकांचे
विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 23 सप्टेंबर, 2019 ते 07 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत
विक्री व स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख 07 ऑक्टोंबर 2019
आहे. तात्पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्यात खाली नमुद कागदपत्रांसह
अर्ज आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत, असे जिल्हादंडाधिकारी
नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड महानगरपालिका
हद्दीतील तात्पुरता फटका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड
यांच्यामार्फत व जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्या कार्यक्षेत्रातील
तात्पुरते फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनियम नुसार दिनांक 23 सप्टेंबर, 2019 ते
07 ऑक्टोबर, 2019 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.
तात्पुरता फटाके विक्री परवानासाठी
विहित नमुन्यात पुढील कागदपत्रांसह अर्ज आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत. नमुना AE-5 मधील
अर्ज, परवाना घेण्याच्या दुकानाचा नकाशा ज्यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण,साठवणूक क्षमता, त्याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्यादी
तपशील दर्शविण्यात यावा. The Explosive Rules 2008 मधील
नियम 84 अन्वये सदर दुकानातील एकमेकापासून किमान अंतर 03
मीटर असावे तसेच संरक्षीत क्षेत्रापासूनचे अंतर 50 मीटर असणे आवश्यक आहे. सदर
नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा तसेच नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित
केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो.लायसन फीस रूपये 500/- चलनाची
प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिक रित्या दुकाने टाकण्यात येत असल्यास
संबंधीत अर्जदारास देण्यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment
Letter). आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड/मुख्याधिकारी
नगरपरिषद, नगरपंचायत / ग्रामपंचायत कार्यालय यांचे नाहरकत
प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र.
जागेच्या मालकी हक्काचा
पुरावा. नोंदणीकृत/मान्यताप्राप्त असोसिएशन मार्फत तात्पूरता फटाका परवानासाठी
अर्ज केल्यास या कार्यालया मार्फत देण्यात येणा-या परवान्यातील नमूद ज्या अटी
व शर्तीनूसार सबंधित दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहिल तसेच कोणत्याही विस्फोटक
नियमांचे व परवान्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन होवून कोणताही अनूचित प्रकार घडल्यास
त्याची सर्वस्वी जबाबदारी सबंधित असोसिएशनची असेल या बाबत सबंधित असोसिएशन कडील
शपथपत्र.दुकानाच्या ठिकाणी करण्यात आलेली व्यवस्था तपशील1.अग्निशमन दल
2.सुरक्षा रक्षक इ.इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.
अर्जदाराने विहित
नमुन्यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्याची खात्री झाल्यानंतर सबंधीत
कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्यात येईल. चलनद्वारे फिस शासन जमा झाल्यानंतर
चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्या अनुषंगाने दिनांक 12 ऑक्टोबर,
2019 व 14 ऑक्टोबर,2019 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्हादंडाधिकारी
नांदेड यांच्या मार्फत तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्या हद्दीतील परवाने
सबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्फत निर्गमित केले जातील.
दिपावली
सण-उत्सवाच्या कालावधीत The
Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्वये एकाच ठिकाणी 50
पेक्षा जास्त दुकानास अनुज्ञाप्ती दिली जाणार नाही. विहित केलेल्या साठा व
विक्री परिणामापर्यतचाच व्यवहार करता येईल याबाबत The Explosive Rules
2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv
मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करून ती तपासणीसाठी उपलब्ध
ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्वये अनाधिकृतपणे
विस्फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्वरूपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी
कार्यालयाने कळवले आहे.
0000
Friday, September 20, 2019
बालशक्ती पुरस्कार, बालकल्याण पुरस्कार-2019 साठी
अर्ज स्वीकारण्याची 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
नांदेड दि. 20 :- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो.
बालशक्ती पुरस्कार ज्या मुलांनी (वय पाचपेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
वैयक्तिक पुरस्कार मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवा उदात्त भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
संस्था स्तरावर बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
बाल शक्ती पुरस्कार 2019 व बालकल्याण पुरस्कार 2019 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत होती. आता ती दिनांक 30 सप्टेंबर, 2019 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नांदेड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
Thursday, September 19, 2019
शासकीय अध्यापक
महाविद्यालयात
मराठवाडा मुक्ती
संग्राम, विद्यापीठ वर्धापण दिन साजरा
नांदेड, दि. 19 :- शासकीय
अध्यापक महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन
नुकताचा साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांच्या हस्ते
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वज
फडकावून राष्ट्रगीत व विद्यापीठ ध्वज फडकावून विद्यापीठ गीत घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या
अध्यक्षा प्राचार्या डॉ. रोडगे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास
मांडला तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश स्पष्ट
केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल
घोनशेटवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. शाकेर, डॉ.
शेख, डॉ. मुरुमकर, प्रा. राऊत, डॉ. राठोड, मु. लि. गच्चे, व. लि. जाधव, सर्वश्री
हंबर्डे, सोनाळे, श्रीमती जाधव, श्रीमती राठोड, श्री. केंद्रे, श्रीमती होळकर आदी
कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन मारोती अक्कलवाड यांनी केले. कार्यक्रमाला बी. एड. प्रशिक्षणार्थी
उपस्थित होते.
00000
नवरात्र उत्सवात
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 19 :- जिल्ह्यात 19
सप्टेंबर ते 10
ऑक्टोंबर
2019 या कालावधीत नवरात्र
उत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर
दुर्गादेवी, शारदादेवीची स्थापना व विसर्जन करण्यात येते. त्याकरीता या कालावधीत
शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणुन पोलीस अधीक्षक विजयकुमार
मगर
यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये
प्राप्त अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी, सर्व
पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 29
सप्टेंबर ते
10 ऑक्टोंबर 2019 च्या मध्यरात्रीपर्यंत
वरील कलमान्वये पुढील अधिकार प्रदान केला आहे.
रस्त्यावरील किंवा
रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी
वर्तवणूक किंवा वागणुक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका
या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू
नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी,
उपासनेच्यावेळी, कोणत्याही रस्त्यावर,
सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा
अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश
देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाट किंवा घाटावर,
सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या,
कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये,
देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य
ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे
व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर
कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते
आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक
करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे
विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम
प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33, 35, 37 ते 40,
43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही
आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
कोणीही इसमांनी हा
आदेश लागू असेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस
स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे
नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ,
जाहिर सभा, मोर्चे, मिरवणुक, निर्दशने, पदयात्रा
इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व
वेळ सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात
दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्वपरवानगी शिवाय आयोजित करु
नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावेत. सदर जाहीर सभा, मिरवणुक, पदयात्रेत, समयोजित
घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा
देऊ नये.
हा आदेश लग्नाच्या
ठिकाणी, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस
कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक विजयकुमार
मगर
यांनी जारी केले आहेत.
00000
Subscribe to:
Posts (Atom)
केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...


