Saturday, February 3, 2018

रेशीम कायदा मसुदावर
सुचना सादर करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 3 :- रेशीम कायदा मसुदाची मराठी व इंग्रजी प्रत जिल्हा रेशीम कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कायदाबाबत  सुचना, हरकती, अभिप्राय असल्यास नागरिकांनी लेखी स्वरुपात रविवार 18 फेब्रुवारी 2018 पुर्वी जिल्हा रेशीम कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
राज्यासाठी "The Maharashtra Silk Worm Seed, Cocoon And Silk Yarn (Regulation of Production, Supply Distribution And Sale) Act & Rules 2017" या नावाने रेशीम ॲक्टचा मसुदा शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. त्याबाबत जनतेच्या सुचना / अभिप्राय व हरकती तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत सुचीत करण्यात आले आहे.  त्यानुसार रेशीम किट बिजांचे उत्पादन व नियमन, रेशीम किटक संगोपन, रेशीम धाग्याचे ताबा आदी, रेशीम कोषांचे विलेवाट लावणे, रिलिंगसाठी रेशीम कोष खरेदी व विक्री, रिलिंग, रेशीम धागा खरेदी विक्रीचे नियमन, परवान्यासाठी अर्ज, कोष बाजाराची स्थापना, कोष रेशीम धागा बाजाराची स्थापना, संशोध आणि विकास माहिती मिळविण्याचे, प्रवेशाचे, तपासणीचे आणि जप्तीचे अधिकार, दंड प्रोत्साहन, काही गुन्ह्यांना दखल पात्र ठरवीणे, परवाना निलंबीत करणे किंवा रद्द करणे मालमत्तेची जप्ती आणि दंड करणे आदी आपसी समजोत्याने अपराधाचा निपटारा, कायद्याअंतर्गत खटले चालविणे व गुन्ह्याची दखल घेण्यास सक्षम न्यायालय या कायदा अंतर्गत कार्य करणाऱ्या व्यक्तीचे स्वंरक्षण, थकबाकी वसूल करण्याची पद्धत, अधिकारी हे सरकारी सेवक नेमणे, विकास व किंमती स्थीरीकरण निधीची स्थापना, नियम बनविण्याचा शासनाचा अधिकारी आदी बाबत तरतुदी प्रस्तावित केल्या आहेत, असे रेशीम विकास अधिकारी, नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000
नवीन इमारतीसाठी आवाहन
नांदेड, दि. 3 :- येथील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयासाठी सरकारी अखत्यारीतील 3 हजार स्केअर फुट इमारतीची आवश्यकता आहे, संबंधितांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शास्त्रीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल शाहू यांनी केले आहे.

000000
आजपासून कर्करोग जागृती पंधरवडा
कर्करोग रुग्णांचा मोफत उपचार
नांदेड दि. 3 :- जागतिक कर्करोग दिनानिमित्त उद्या दि. 4 फेब्रुवारी पासून ‘कर्करोग जागृती पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. याकाळात कर्करोग तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत तपासणी अंती निश्चित निदान झालेल्या रुग्णाचे हैद्राबाद येथील कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सतीश पवार, डॉ. एन. एस. गुलाटी व डॉ. मोरे हे 16 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे सर्व प्रकारच्या कर्करोग रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी या तपासणी व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे. 
जिल्ह्यात जागतिक कर्करोग दिन व पंधरवाडा  4 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त श्री गुरु गोबिंद सिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कर्करोग दिन व पंधरवाडा दिनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोनार्क कॅन्सर हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. एन. एस गुलाटी यांनी कार्कारोगाबद्दल मार्गदर्शन केले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर तोंडातील लालसर चट्टा, तोंड उघडता न येणे, अन्न नलीकेचा त्रास होणे, स्त्री स्तनास गाट असणे, गर्भाशयाचा कर्करोग या विविध प्रकारच्या कर्करोगांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती दिली.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी, ईएनटी सर्जन डॉ. रहेमान डॉ. लोकडे डॉ. व्ही. एस. पवार, डॉ. सबा खान, डॉ. सुजाता राठोड, डॉ. प्रदीप बोरसे उपस्थित होते. कार्यक्रमास रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. साईप्रसाद शिंदे यांनी केले तर  सुवर्णकार सदाशिव यांनी आभार मानले.

000000
  दिव्यांग शिष्यवृत्तीचे प्रस्ताव
दाखल करण्यास 9 फेब्रुवारीची मुदत 
नांदेड, दि. 3 :- प्राथमिक, माध्यमिक शाळेतील तसेच महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शालांतपूर्व व महाविद्यालयीन मॅट्रीकोत्तर दिव्यांग शिष्यवृत्ती प्रस्ताव विद्यालय, महाविद्यालयांनी जिल्हा समाज कल्याण विभाग जि. प. यांचेकडे शुक्रवार 9 फेब्रुवारी पर्यंत दाखल करावीत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
मुख्याध्यापक, प्राचार्यांनी परिपुर्ण प्रस्ताव ऑफलाईन आवश्यक कागदपत्रासह जसे विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, बँक पासबुक, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्राच्या सत्यप्रती सोबत दाखल करावेत. विलंब झालेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही याची जबाबदारी मुख्याध्यापक, प्राचार्यांची राहील, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

00000
एसएसबी मुलाखतीच्या
तयारीसाठी प्रशिक्षण उपलब्ध
नांदेड दि. 3 :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायूदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण आयोजित केल्याचे, नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळवले आहे. 
प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हीसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल इंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे. अशा उमेदवारांना सर्विसेस सिलेक्शन बोर्ड एसएसबी मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर नाशिक रोड नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे.
सन 2018 मधील दहा दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. फेब्रुवारी तिसरा आठवडा, मार्च दुसरा, जुन पहिला, जुलै चौथा, ऑग्स्ट तिसरा व नोव्हेंबर तिसरा आठवडा याप्रमाणे एसएसबी मुलाखतीच्या तयारीसाठी क्लासेस आयोजित करण्यात आले आहे.
इच्छूक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, तहसिल कार्यालयाजवळ नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.                        

000000

Friday, February 2, 2018

महाराष्ट्राला सकारात्मक व सौहार्दपूर्ण बनविणारा
सोशल मीडिया ‘महामित्र’
गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसेंदिवस त्याचा आवाकादेखील वाढतच चालला आहे. आज तरुणाईच्या हातात असलेले स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोनला आपसूकच चिकटलेल्या ‘सोशल मीडिया’ ने जग एका क्लिकवर जवळ आणले आहे.  सोशल मीडियाच्या या अद्भूत चमत्काराने आज धावपळीच्या आणि धकाधकीच्या पण काहीशा एकसुरी आयुष्यात जणू चैतन्यच अवतरले आहे. विविध सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून संवादाचे एक आभासी विश्व निर्माण निर्माण झाले आहे. बघता-बघता कुटूंबीय, शाळा, सोबत्यांचे, ऑफिस मधील सहकाऱ्यांचे असे एकेक ग्रुप आकार घेऊ लागले आणि या आभासी विश्वात आपण अधिकाधिक जवळ येत गेलो, अधिक ‘सोशल’ झालो. सोशल मीडियाचा सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तिंची दखल घेऊन त्यांच्या प्रयत्नांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.
सोशल मीडियाचा वापर संवादासाठी वाढला असला तरी सोशल मीडियाचा विधायक उपयोग देखील होत आहे. एकदा शेजारच्या  गावात वाटमारी  झाली, वाटमारीत सहभागी असणारे चोरटे चोरी करुन गावच्या दिशेने निघाले, तितक्यात गावच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर त्या शेजारच्या गावातील एका मित्राचा वाटमारीबाबत माहिती देणारा व चोरांच्या गाडीचे वर्णन सांगणारा मेसेज येऊन धडकला. त्यामुळे लागलीच गावातील तरुण मंडळ सावध झाले, त्यांनी त्या चोरांना पकडण्यासाठी गावातील चौकात जोरात फिल्डिंग लावली, आणि आश्चर्य काही वेळातच ते चोर अलगद येऊन तरुणांच्या हाती सापडले. मग काय तरुणांनी त्या चोरांना मनसोक्त चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.  कदाचित इथे ते चोरही गोंधळले असतील की  इतक्या कमी वेळात आपण पकडले गेलो तरी कसे ? खरं तर ही सर्व कमाल नव्या तंत्रज्ञानाची व सोशल मीडियावरील संवादाची म्हणावी लागेल.
वरील घटना म्हणजे  सोशल मीडियाच्या विधायक ताकदीचे एक उदाहरण आहे. आज ही ताकद  समाजाच्या विधायक फायद्यासाठी वापरणे गरजेचे आहे.  परंतु सध्या समाजातील काही अपप्रवृत्तीकडून या सोशल मीडियाचा गैरवापर सुरु आहे. त्यांच्याकडून सामाजिक शांतता भंग करुन समाजात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.  जाणीवपूर्वक अफवा पसरवून सामाजिक संघर्ष घडविण्यासाठी खोटी माहिती पसरवणे , जाती-धर्मात तेढ वाढेल अशा प्रकारचा गैरवापर या माध्यमाचा होत आहे, अशा प्रकारांवर आणि अपप्रवृत्तींवर कायदेशीर वचक ठेवण्याबरोबरच समाजातील एक सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण देखील हा प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे.
आज सोशल मीडियाचा चांगला व सकारात्मक उपयोग करणारे देखील मोठ्या प्रमाणात सुज्ञ नागरिक आहेत. जे कुठल्याही अयोग्य गोष्टींचा आधार न घेता कुठलेही टोकाचे राजकारण न करता केवळ आनंद पसरावा , समाजात चांगल्या गोष्टींची सुरुवात व्हावी, एखाद्या चांगल्या प्रयोगाला , उपक्रमाला लोकांपर्यंत आणावे अशा सद्हेतुने सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियाचा अशा पध्दतीने सकारात्मक व समाजोपयोगी वापर करणाऱ्या व्यक्तींची दखल घ्यावी , त्यांच्या प्रयत्नांना मोठे व्यासपीठ मिळावे अशा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  ‘सोशल मीडिया-महामित्र’ नावाचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.
काय आहे हा उपक्रम?
ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ही बाब समोर ठेऊन सोशल मीडियाचा सदुपयोग समाजात अधिक विवेकवादी आणि सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा म्हणून करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा फायदा काय?
*  ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रमात पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना मिळणार मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र.
*  सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवादाची,सेल्फी घेण्याची मिळणार संधी
या उपक्रमात मी कसा सहभागी होऊ?
*  ‘महामित्र’ उप्रकमासाठी दिनांक 1 ते 18 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येईल.
*  ‘गुगल प्ले स्टोअर’/ ‘ॲप स्टोअर’ वरुन महामित्र (Maha Mitra) हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्या.
*  राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
*  अ‍ॅप्लिकेशनमध्ये नाव, वय, पत्ता हे तपशील देऊन नोंदणी करा
कशी होणार निवड?
*  प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) निवडले जाणार प्रत्येकी 10 ‘सोशल मिडिया महामित्र’.
*  या 10 जणांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाणार. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाजमाध्यमाच्या सदुपयोगाबाबत होणार गटचर्चा.
*  या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी एका महामित्राची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी होणार निवड.
*  जिल्हास्तरावरील कार्यक्रम अंदाजे होणार 5 ते 17 मार्च या कालावधीत.
*  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्यस्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना केले जाणार आमंत्रित.
*  याच कार्यक्रमात ‘सोशल मिडिया महामित्र’ पुरस्काराने होणार गौरव.
*  उपस्थितीत मान्यवरांशी साधता येईल संवाद
‘महामित्र’ निवडीचे निकष काय?
*  विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप 5 ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्या. (5 गुण)
*  फोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्या. (15 गुण)
*  किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म / मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेत. (10 गुण)
*  सहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मते (20 गुण)
*  सोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेत (15 गुण)
*  आलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. (10 गुण)

वरील गुणांकन ॲपमध्ये ऑनलाईन दिले जाईल. त्याप्रमाणे  एकूण सर्व सहभागींच्या तुलनेत आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल.  निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी  निवड करण्यात येईल.   गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन  या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
सोशल मीडियाचा सकारात्मक व अभिनव उपयोग करणाऱ्यांसाठी ‘सोशल मीडिया-महामित्र’ हे नाविन्यपूर्ण व्यासपीठ महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करुन दिले आहे. तेव्हा, चला महाराष्ट्राला सकारात्मक व सौहार्दपूर्ण बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी ‘महामित्र’ उपक्रमात सहभागी  होऊ या...!

- शरदमणी मराठे / अभिजित झांबरे-पाटील

00000
ग्रामपंचायत निवडणुकीचे ऑनलाईन
नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 2 :-  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासह सर्व सदस्य पदांसाठी, रिक्त पदांच्या पोट निवडणुकासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑनलाईन संगणकीकृत नामनिर्देशपत्रे 5 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2018 या कालावधीत सादर करावयाची आहे.  
तसेच पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे पारंपारिक पद्धतीऐवजी संगणकीकृत ऑनलाईन स्विकारण्यात येणार आहेत. पोटनिवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. ऑनलाईन नामनिर्देशनपत्रे 5 ते 10 फेब्रुवारी 2018 या कालावधीत संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावीत, असे अवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

000000

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...