Friday, August 3, 2018


बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रासाठी
ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
नांदेड, दि. 3:- बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 41 अंतर्गत बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांना ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबतचे प्रस्ताव  दि.20 मे, 2018  व ऑफलाईन प्रस्ताव दि.23 मे, 2018 पर्यंत  शासनास सादर करण्याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती.
शासनाचे परिपत्रक दि.27 जुलै, 2018 नुसार ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि.30 ऑगस्ट, 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहेत.
महिला व बाल विकास आयुक्तालय,  पुणे यांच्या स्तरावरुन करण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्र प्रस्तावाच्या छाननी पत्राची प्रत महिला व बाल विकास विभागाच्या संकेतस्थळ  womenchild.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर  बातम्या व सूचना या सदराखाली उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
ज्या संस्थांनी यापुर्वी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेले आहेत अशा संस्थांनी womenchild.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आपल्या संस्थेशी संबंधित छाननी पत्रात नमूद त्रुटींची पुर्तता करुन त्रुटी पुर्तता अहवाल आयुक्त महिला व बाल विकास, 28 राणीचा बाग, पुणे                   411001 यांच्याकडे हस्ते पोहोच किंवा पोस्टाने दि.30 ऑगस्ट, 2018 पर्यंत पोहचतील या पध्दतीने सादर करावा. कोणत्याही संस्थांना त्रुटीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही आणि दि.30 ऑगस्ट, 2018 नंतर कोणत्याही संस्थेचा त्रुटी पुर्तता अहवाल स्विकारला जाणार नाही .
            ज्या  संस्थांनी यापुर्वी प्रस्ताव सादर केलेले नाही अशा संस्था दि.30 ऑगस्ट, 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करु शकतील.  सदरचा अर्ज शासनाच्या womenchild.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच नवीन अर्ज केलेल्या संस्थांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेनंतर अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह महिला व बाल विकास आयुक्तालयास  दि.3 सप्टेंबर, 2018 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
त्या अनुषने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शास्त्रीनगर, भाग्यनगर कमानीचे आत, नांदेड येथे दि.06 ऑगस्ट,2018 रोजी दुपारी 3-30 वाजता महिला व बाल विकास विभागांतर्गत सर्व संस्था चालकांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,नांदेड यांनी कळविले आहे.
****

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...