Friday, August 3, 2018


राष्ट्रीय जंतनाशक दिनाची मोहिम शंभर टक्के यशस्वी करावी
--- अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील
           नांदेड दि. 3 :-   राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या पूर्वनियोजनाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभागांनी मोहिम शंभर टक्के मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले .
अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले की, राष्ट्रीय जंतनाशक दिन 10 ऑगस्ट रोजी साजरा होत असून याचा उद्देश एक वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील मुलां - मुलींना शाळा व शाळाबाह्य अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती बालकांच्या जीवनांचा व शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा आहे. ज्या बालकांना राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या दिवशी गोळी दिली गेली नसेल त्यांना दिनांक 16 ऑगस्ट , 2018 रोजी मॉप अप दिनाच्या दिवशी गोळी द्यावयाची आहे.  नांदेड जिल्ह्यातील एकूण लाभार्थी संख्या (डिएचओ, सीएस, मनपा) 10 लाख 15 हजार 594 आहेत.  आवश्यक औषधी साठा उपलब्ध आहे.
            सदर राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या पूर्वनियोजनाबाबतची ( समन्वय समितीची ) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गुंटूरकर , मनपाचे वैद्यकीय अधिकारी सुमती ठाकरे, डॉ. बदीयोद्दीन , जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झीने, शिक्षणाधिकारी , महिला बाल कल्याण अधिकारी , समन्वय समितीचे पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिनासंदर्भात प्रास्ताविक केले.
            मोहिम कालावधीत प्रतिकुल घटना घडल्यास त्याबाबतच्या व्यवस्थापकीय मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत. त्या-त्या तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नियोजन करावे. तसेच दिनांक 9 ऑगस्ट, 2018 रोजी शिक्षणाधिकारी यांना प्रभात फेरी काढण्याबाबतही निर्देश देण्यात आले असे अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.
***


No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 35 11 जानेवारीपासून वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेड दि. 9 जानेवारी : छत्रपती संभाजीनगर विभागातील संचाल...