Friday, August 3, 2018


अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे
ऑनलाईन फार्म भरावेत
--- शिक्षणाधिकारी (माध्य.)
नांदेड दि. 3 :-  अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार  सन २०१८-१९  साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनचे ऑनलाईन अर्ज  भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
          सन २०१८-१९  या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन २०१८-१९   या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे  अर्ज  विद्यार्थ्यांचे नुतणीकरण  म्हणून भरावयाचे आहेत. तसेच नवीन विद्यार्थ्यांचे  अर्ज नवीन विद्यार्थी म्हणून भरावयाचे आहेत. प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरावयाची मुदत  नवीन विद्यार्थीसाठी दि. २३ जुलै, २०१८ ते ३० सप्टेंबर, २०१८ अशी आहेत. तर   नुतनीकरण  विद्यार्थीसाठी    दि. २३ जुलै २०१८ ते ३० सप्टेंबर, २०१८ अशी आहे.
शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. या बाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.)  यांनी केले आहे.
****  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 35 11 जानेवारीपासून वित्त व लेखा विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेड दि. 9 जानेवारी : छत्रपती संभाजीनगर विभागातील संचाल...