Monday, May 26, 2025

वृत्त क्रमांक 540

बियाण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू 

नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था करता येतील अर्ज 

नांदेड दि. 26 मे : खरीप हंगाम सन 2025 मध्ये शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषिक्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थानी पिक प्रात्यक्षिकाच्या लाभासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बियाण्यांसाठी आजच महाडीबीटीवर अर्ज करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

खरीप हंगाम सन 2025 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तुर, मुग व उडिद पिकांसाठी (10 वर्षाच्या आतील अधिसुचित वाण) व राष्ट्रीय खा‌द्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत सोयाबीन पिकासाठी (5 वर्षाच्या आतील अधिसुचित वाण) योजनेअंतर्गत पिक प्रात्यक्षीकांसाठी 31 मार्च 2024 च्या पुर्वी नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बियाण्यासाठी महाडीबीटीवर https://mahadbt.maharashtra. gov.in/Farmer/AgriLogin अर्ज करण्याची प्रक्रिया 26 ते 29 मे 2025 पर्यंत चालु आहे. 

प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर गटांची निवड करण्यात येणार आहे. सदर पिक प्रात्यक्षिके ही सुधारीत लागवड तंत्रज्ञान आधारीत राबविण्यात येणार असुन त्यामध्ये बियाणे व इतर कृषि निविष्ठा अर्थसहाय्यीत दराने उपलब्ध करण्यात येणार आहेत. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी सपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

00000

वृत्त क्रमांक 539 

हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या

पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

 

·  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती 

 

नांदेड दि. 26 मे :- हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

 

नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक येथे पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण, बाळासाहेब ठाकरे हरिद्रा  (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुसिंग महाराज राठोड, आमदार बाबुराव कदम, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी उपस्थित होते.  

 

प्रारंभी मंचावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर श्री. शाह यांनी कळ दाबुन पुतळ्याचे अनावरण केले. तसेच त्यांच्या हस्ते नामफलकाचेही अनावरण करण्यात आले. याप्रसंगी बंजारा समाजाच्यावतीने श्री. शाह व श्री. फडणवीस यांचा पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे नागरिक उपस्थित होते.  

 

हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक परिसरात उभारला आहे. नऊ फूट उंचीच्या या पुतळ्याचे वजन सुमारे 700 किलो आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी रुपये 13 लक्ष 99 हजार एवढा खर्च आला आहे. 232.60 चौ.मी. जागेत या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली आहे. सुशोभिकरणाचे अंदाजे 69 लाख रुपयांची कामे आहेत.

00000


























वृत्त क्रमांक 538

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नांदेड विमानतळावर आगमन 

नांदेड दि. 26 मे :- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही आगमन झाले. यावेळी विविध मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. 

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार हेमंत पाटील, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार श्रीजया चव्हाण, सचखंड गुरुद्वाराचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग, जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, तसेच पदाधिकारी आदीची उपस्थिती होती.

000000

 






















25.5.2025

 वृत्त क्रमांक 536

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा

नांदेड दि. 25 मे -- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. 26 मे 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार 26 मे 2025 रोजी दुपारी 2.10 वा. नागपूर येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.55 वा. श्री गुरु गोविंद सिंहजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. दुपारी 3 वा. मोटारीने स्व. वसंतराव नाईक चौक, नागार्जुना हॉटेल जवळ, आनंदनगर, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वा. स्व. वसंतराव नाईक चौक, नागार्जुना हॉटेल जवळ, आनंदनगर नांदेड येथे आगमन. दुपारी 3.10 वा. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाच्या लोकार्पण सोहळयास ते उपस्थित राहतील.

दुपारी 3.25 वा. मोटारीने नवा मोंढा मैदान, नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.35 वा. नवा मोंढा मैदान, नांदेड येथे आगमन. दुपारी 3.40 वा. जाहीर सभा. सायंकाळी 5.10 वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह, स्नेहनगर नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.15 वा. शासकीय विश्रामगृह, स्नेहनगर, नांदेड येथे आगमन. सायं. 5.15 वा. शिष्टमंडळा समवेत भेट. सायं. 6.30 वा. मोटारीने नाना-नानी पार्क समोर, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.35 वा. नाना-नानी पार्क समोर, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड येथे आगमन. सायं. 6.35 वा. भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगर कार्यालयाचे उदघाटन. सायं. 6.50 वा. मोटारीने आनंद निलयम, शिवाजीनगर, नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.55 वा. आनंद निलयम, शिवाजीनगर नांदेड येथे आगमन. रात्री 8.30 वा. मोटारीने श्री गुरु गोविंद सिंहजी विमानतळ, नांदेडकडे प्रयाण. रात्री. 8.40 वा. श्री गुरु गोविंदसिंहजी विमानतळ, नांदेड येथे आगमन. रात्री 8.45 वा. विमानाने मुंबईकडे ते प्रयाण करतील.
0000

Sunday, May 25, 2025

 वृत्त क्रमांक 535 

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा 

नांदेड दि. 25 मे :- राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या सोमवार 26 मे 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

सोमवार 26 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून विमानाने दुपारी 12 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळयाच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- नागार्जुन कॉर्नर वसंतराव नाईक चौक नांदेड. दुपारी 3.35 वा. खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन स्थळ- तुळजाई कॉम्पलेक्स भाग्यनगर नांदेड. दुपारी 3.50 वा. नवामोंढा मैदान नांदेड येथे आगमन. दुपारी 4 वा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर जनसभेस उपस्थिती. सायं. 5.35 वा. नवामोंढा मैदान येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं 5.40 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं 7 वा. भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालयाकडे रवाना स्थळ- नाना-नानी पार्क नांदेड. रात्री 7.25 वा. खासदार अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानाकडे रवाना. रात्री 7.30 वा. खासदार अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. रात्री 9 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेडकडे रवाना. रात्री 9.15 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. रात्री 10 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथून मुंबईकडे रवाना होतील.

000

वृत्त क्रमांक 534

सांगवी बु. येथील आजचा आठवडी बाजार राहणार बंद  

नांदेड दि. 25 मे :- मौ. सांगवी बु. येथील सोमवार 26 मे रोजीचा नियोजित आठवडी बाजार बंद राहणार आहे. हा बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार 27 मे रोजी भरवण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमीत केले आहेत.

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे सोमवार 26 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. बाजाराच्या या भागात मोठया प्रमाणात दुकाने लागुन खरेदी विक्रीसाठी मोठया प्रमाणात नागरिक येत असतात. त्‍यामुळे वाहतुक मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून मौ. सांगवी बु. येथील सोमवार 26 मे रोजीचा नियोजित आठवडी बाजार बंद राहणार आहे. हा आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार 27 मे 2025 रोजी भरवण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर अॅक्‍ट 1862 चे कलम 5 प्रमाणे निर्गमीत केले आहेत.

0000

हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण

प्रति,

मा. संपादक / आवृत्ती प्रमुख/

विशेष प्रतिनिधी / जिल्हा प्रतिनिधी / इलेक्ट्रॉनिक मिडीया, नांदेड.  

विषय :- हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा

सन्माननीय महोदय,

महापालिकेच्या वतीने हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री मा.ना.श्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या अनावरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री देवेंद्र फडणवीस तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री मा.ना.श्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्थळ:- कै.वसंतराव नाईक चौक, नागार्जुन हॉटेल जवळ, नांदेड येथे सोमवार दिनांक 26 मे 2025  दुपारी 3.10 वा. तरी सदरील आयोजित कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.  

धन्यवाद !

आपला स्नेहाकिंत

 स्वा/-

गिरीश कदम,

अतिरिक्त आयुक्त,

नां.वा.श.म.न.पा.नांदेड

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...