वृत्त क्रमांक 538
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नांदेड विमानतळावर आगमन
नांदेड दि. 26 मे :- केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज दुपारी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही आगमन झाले. यावेळी विविध मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण,
दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल
सावे, पशुसंवर्धन
मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री
मेघना बोर्डीकर-साकोरे, माजी
मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण
केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार हेमंत पाटील, आमदार डॉ. तुषार
राठोड, आमदार
भीमराव केराम, आमदार
जितेश अंतापूरकर, आमदार
श्रीजया चव्हाण, सचखंड
गुरुद्वाराचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग, जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, तसेच पदाधिकारी आदीची उपस्थिती होती.
000000
No comments:
Post a Comment