Thursday, March 13, 2025

गाळमुक्त धरण, संपन्न शिवार ! #नांदेड जिल्ह्यात 13 प्रकल्पांतून 1.41 लाख घनमीटर गाळ काढून 201 शेतकऱ्यांच्या शेतात पोचवला! यंदा 53 प्रकल्पांतून 5.80 लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट. #जलसंधारण #शेतीसमृद्धी

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक योजना ! अल्पभूधारक, विधवा, अपंग, व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान. 2.5 एकर क्षेत्रासाठी 37,500 रुपयांपर्यंत मदत. #शेतकरीहित #गाळयुक्तशिवार



 शाश्वत शेतीसाठी ठोस पाऊल ! गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान, गाळ व्यवस्थापनासाठी मदत. जलसंधारण आणि मृदसंवर्धनाचा हा उत्तम उपक्रम! #सेंद्रियशेती #कृषीविकास

 जनसहभागातून जलसंधारण ! नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स, भारतीय जैन संघटना यासारख्या सेवाभावी संस्था गाळमुक्त धरण अभियानात पुढे! एकत्र येऊ, पाणीटंचाईवर मात करू! #SaveWater #sustainablefarming

Wednesday, March 12, 2025

 वृत्त क्रमांक 291

जिल्हा परिषद शाळांच्या मालकीच्या नोंदींसाठी विशेष मोहीम;

मुख्‍यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा पुढाकार

नांदेड, 12 मार्च:- नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या जागेत असलेल्या शाळांची अधिकृत नोंद नमुना नंबर 8 व सातबारा उताऱ्यावर करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात असून, या प्रक्रियेसाठी गुगल शिटच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1 हजार 864 शाळांची माहिती संकलित करण्यात आली असून उर्वरित शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 193 जिल्हा परिषद शाळा स्‍वत:च्‍या मालकीच्‍या आहेत. त्या सर्वांच्या मालकी हक्काच्या नोंदी शासन दरबारी होण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दोन बैठका मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या प्रमुख उपस्थितीमध्‍ये घेण्‍यात आल्‍या आहेत. 

 मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी या मोहिमेसाठी सक्रिय सहभागी झाले आहेत. भोकर तालुक्यातील 125 शाळांची मालकीची जागा व क्षेत्रफळ नमुना नंबर 8 वर नोंदविण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांनी हे काम यशस्वीरित्या पार पाडले. आता सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्याचे कामही तालुक्यात सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी उर्वरित 15 तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना भोकर तालुक्याच्या धर्तीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

 या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांच्या जागेवर झालेले अतिक्रमण रोखण्यास मदत होईल. तसेच शाळेसाठी दानपत्राव्‍दारे मिळालेल्या जागांची अधिकृत नोंद नमुना नंबर 8 व सातबारा उताऱ्यावर होणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पुढाकार घेतला आहे. शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, धनंजय गुम्मालवार-वरिष्ठ सहाय्यक व राजू केंद्रे-कनिष्ठ सहाय्यक हे या माहिती संकलनाच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ज्या शाळांना काही अडचणी असतील त्यांनी त्‍यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांच्या मालकी हक्काच्या जागांची अधिकृत नोंदणी पूर्ण होऊन शाळांची मालमत्ता सुरक्षित होण्यासाठी मदत होईल.

०००००

मुख्यमंत्री #रोजगार निर्मिती..
#नांदेड



 

वृत्त क्रमांक 290

जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत 

13 प्रकल्पातून आतापर्यत 1 लाख 41 हजार 846 घनमीटर गाळ काढला

                                                                                                                                                                         •100 दिवसात 1 लाख 52 हजार घनमीटर गाळ 

 यावर्षी एकूण 53 प्रकल्पातून 5 लाख 80 हजार 721 घ.मी. गाळ काढण्याचे उद्दिष्ट

                                                                                                                                                                        नांदेड दि. 12 मार्च :- नांदेड जिल्ह्यात सन 2023-24 या वर्षात 13 प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर 1  लाख 41 हजार 846 घनमीटर गाळ काढला असून यामुळे प्रकल्पांच्या मुळ साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. 13 प्रकल्पातून काढण्यात आलेला गाळ अनुदानपात्र 201 शेतकऱ्यांच्या शेतात पसरविण्यात आलेला आहे. यावर्षी 53 तलावातून गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भातील  माहितीसाठी संबंधितानी जिल्हा संधारण अधिकारी, चैतन्यनगर, नांदेड यांचे कार्यालयाशी तसेच दूरध्वनी क्रमांक 02462-260813 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो संजीव भोरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस.एस. कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी द.रा. कळसाईत, तंत्र अधिकारी के.एम जाधव, कार्यकारी अभियंता पाटबंधारे आ.शी. चौघुले, जिल्हा जलसंधारण अधिकारी जि. प अशोक भोजराज आदींची उपस्थिती होती. 

राज्य शासनाने दिलेल्या कृती आराखड्यानुसार 100 दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यात 1 लाख 52 हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षात एकूण 53 प्रकल्पातून 5 लाख 80 हजार 721 घ.मी. गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पातून गाळ काढण्याचे काम नाम फाऊडेशन, टाटा मोटार्स, भारतीय जैन संघटना तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. 

तसेच मृद व जलसंधारण उपविभागासाठी कार्यालय प्रमुखाचे नाव भ्रमणध्वनी क्रमांक दिले आहेत. जिल्ह्यातील 53 तलाव वगळता इतर तलावातून गाळ काढावयाचा असल्यास पुढील दिलेल्या तालुका निहाय अधिकारी यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क करावा. मृद व जलसंधारण विभागाच्या नांदेड विभागात नांदेड, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यासाठी आर. वाय. मुरमुरे यांचा मो. क्र. 8007262021 , मुखेड तालुक्यासाठी एच.जी.कानडे यांचा मो. क्र. 9423347886, नायगाव विभागात नायगाव, धर्माबाद, उमरी तालुक्यासाठी बी.एस.मोरे यांचा मो.क्र.9421854513, भोकर विभागात भोकर, मुदखेड, अर्धापूर तालुक्यासाठी डी. डी. गायकवाड यांचा मो. क्र. 9049888753, कंधार विभागात कंधार व लोहा तालुक्यासाठी यु.डी. गायकवाड यांचा मो. क्र. 9049888753, किनवट विभागात किनवट व माहुर तालुक्यासाठी ङिए. गडदे यांचा मो. क्र. 7276167441 आणि देगलूर विभागात देगलूर व बिलोली तालुक्यासाठी टि. ए.मुरुमकर यांचा मो. क्र. 9421321402 संपर्क क्रमांक आहेत.  

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थाना यंत्रसामग्री आणि इंधन यांचा खर्च देणे प्रस्तावित आहे. तसेच अल्प व अत्यल्पभुधारक, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपुर लाभ घेता येईल यासाठी अनुदान देणे प्रस्तावित आहे. अशासकीय संस्थाना गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्र सामुग्री आणि इंधन यासाठी 31 रुपये प्रती घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी 35.75 प्रती घनमीटर प्रमाणे 15 हजारच्या मर्यादा व 2.5 एकरसाठी 37 हजार 500 रुपयापर्यत अनुदान दिले जाणार आहे. 

00000





केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...